धाप..

Submitted by बागेश्री on 23 August, 2012 - 03:38

गुंतलेले पाश सुटे होताना
श्वासांचही हलकं, हलकं होत जाणं..

गुंतणं नि सोडवणं
दोन विरुद्ध प्रक्रिया,
गुंतण्याची अधीरता
तर सुटतानाचे नि:श्वास
दोन्ही घडताना अपूर्णतेची धाप मात्र सारखीच...

आयुष्याच्या धावपट्टीवरचा हा टप्पा अन् सोबतीची ही धाप,
अपरिहार्यच!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

सुंदर!!
मात्र, आयुष्याच्या धावपट्टीवर हा एकच एक असा टप्पा नसतो ना? खरेतर आयुष्यातील प्रत्येक नात्यात कमी-अधिक तीव्रतेने अशी प्रक्रिया होतच असते.... आणि 'अपुर्णतेची धाप' लागण्याचा टप्पाही त्या त्या संदर्भानुसार बरेचदा येतो..........

गुंतलेले पाश सुटे होताना
श्वासांचही जड, जड होत जाणं..

लग्न आणि घटस्फोट
दोन विरुद्ध प्रक्रिया,
लग्नाची अधीरता
तर घटस्फोटाचे नि:श्वास
आंतरजातीय लग्नात आणि घटस्फोट घडताना
अपूर्णतेची खाप मात्र सारखीच...

संसाराच्या चोथा होण्याचा हा टप्पा अन् सोबतीची ही खाप,
अपरिहार्यच!

Proud

मला आवडली Happy

गुंतलेली नाती अशी तुटताना
आसमंतात विलीन होत जाणं..

जगणं नि मरणं
दोन विरुद्ध प्रक्रिया,
जगण्याची ईच्छा
तर मरनाच्या यातना
दोन्ही घडताना सोबतीची 'थाप' मात्र सारखीच...

आयुष्याच्या धावपट्टीवरचा हा टप्पा अन् सोबतीची ही 'थाप',
आवश्यकच!

बाग्ज, या कवितेला समजुन घेताना मलाही धाप लागली गं. Happy सुट्या सुट्या ओळी आवडल्या, समजल्या. पण एकसंध कविता वाचताना आशय पोचला नाही.

गुंतणं नि सोडवणं
दोन विरुद्ध प्रक्रिया,
गुंतण्याची अधीरता
तर सुटतानाचे नि:श्वास
दोन्ही घडताना अपूर्णतेची धाप मात्र सारखीच...

Equilibrium.. माणसाला हुलकावण्या देणारी एक संकल्पना.
नात्यामधलं संतुलन क्षणाचं, हेलकावे अनंतकाळचे.
त्या संतुलनाच्या शोधाला आपण सुखाचा शोध मानतो अन कायम धापावतो,खंतावतो .
जे अपूर्ण ते अपूर्ण म्हणून स्वीकारत नाही .

अचूक, बागेश्री.

मने, बोलूयात! Happy

अज्ञातजी, खूप दिवसांनतर तुमचा प्रतिसाद आला आणि माझ्याच जून्या कवितेचा फॉर्म (तुम्हाला आवडणारा) ह्यात राखल्या गेल्याचं जाणवलं! मनःपूर्वक आभारी आहे

भारती,
संतुलन क्षणाचं, हेलकावे अनंतकाळचे.>> त्या संतुलनाच्या शोधाला आपण सुखाचा शोध मानतो अन कायम धापावतो,खंतावतो >> वाह! समर्पक! धन्यवाद!

ए ए बागे मलापण झब्बू द्यायचाय............हा घे!!

लिहिणं नि वाचणं
दोन विरुद्ध प्रक्रिया,
लिहिण्यार्‍याची बधीरता
तर वाचणार्‍याची अधीरता
दोन्ही घडताना दुर्बोधतेची उघडझाप मात्र सारखीच
...!!
Rofl
____________

कविता खूप मस्तय बागे
"अपूर्णतेची धाप" तर केवळ अप्रतीम गं !!

धन्यवाद!!

मला वाटते गंडा घालणे हे जसे शागीर्दगीबाबत असते तसेच एखाद्याला गंडवणे या अर्थीही असते, असे उल्लेख ऐकल्यासारखे आठवत आहेत