Submitted by सुप्रिया जाधव. on 26 August, 2012 - 00:13
नाती-गोती ठरती ढोबळ
गझलांची या सोबत केवळ !
एकाकी तू कुठे जीवना...
सुख-दु:खांची असता चंगळ !
दखल घेत जा कणा-कणाची...
थेंबे-थेंबे बनतो ओघळ !
माझ्यामधुनी मीच वगळता
उरतो हा जगण्याचा गोंधळ !
कोण-कुणाचे असते येथे...
आभासांवर जगतो अंमळ !
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान, पण -- ठोबळ? समजले नाही.
छान, पण -- ठोबळ? समजले नाही.
ठोबळ म्हणजे काय गं? का यमक
ठोबळ म्हणजे काय गं? का यमक म्हणून काहीही आपलं द्यायचं ठोकून. थेंबाथेंबी असा आहे का शब्द? थेंबे थेंबे ऐकला आहे.
ठोबळ = ?..........('ढोबळ'
ठोबळ = ?..........('ढोबळ' का?)
असो
काफिये एकापेक्षा एक सरस अन् वेगळे आहेत. आवडले
माझ्यामधुनी मीच वगळता
उरतो हा जगण्याचा गोंधळ !>>>>>>>>>मला हा शेर सर्वाधिक आवडला
गझल छान आहे
धन्यवाद!!
टायपो होता मंडळी धन्स !
टायपो होता मंडळी धन्स !
Mohini ताई सुटलातच एकदम! जरा तब्येतीन
भारीच लिहिलीये.... खूपच
भारीच लिहिलीये.... खूपच सुर्रेख.....
खूप छान! छोटुली पण अर्थ
खूप छान! छोटुली पण अर्थ महान.
एकेक शेर आवडलाय.
"थेंबे-थेंबे" असा बदल करता येईल ना! मला वाटतं छान वाटेल!
संपूर्ण गझल आवडलीये,
संपूर्ण गझल आवडलीये, सुप्रिया! मस्त मस्त....
माझ्यामधुनी मीच वगळता उरतो हा
माझ्यामधुनी मीच वगळता
उरतो हा जगण्याचा गोंधळ !<<<
सुंदर, क्या बात है
आभार!
आभार!
Mohini ताई सुटलातच एकदम! जरा
Mohini ताई सुटलातच एकदम! जरा तब्येतीन म्हणजे काय? तू कोण मला सांगणारी? म्हणे गझल झाली वश प्रियाला ध्येय जगण्याचे मिळाले. तुला जगण्याचे ध्येय मिळाले आणि मराठीला नवीन शब्द मिळाले होय का गं?
मोहीनीताई किती चिडाल ?
मोहीनीताई
किती चिडाल ?
सुन्दर
सुन्दर
दखल घेत जा
दखल घेत जा कणा-कणाची...
थेंबे-थेंबे बनतो ओघळ ! <<