आभासांवर जगतो अंमळ !

Submitted by सुप्रिया जाधव. on 26 August, 2012 - 00:13

नाती-गोती ठरती ढोबळ
गझलांची या सोबत केवळ !

एकाकी तू कुठे जीवना...
सुख-दु:खांची असता चंगळ !

दखल घेत जा कणा-कणाची...
थेंबे-थेंबे बनतो ओघळ !

माझ्यामधुनी मीच वगळता
उरतो हा जगण्याचा गोंधळ !

कोण-कुणाचे असते येथे...
आभासांवर जगतो अंमळ !

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठोबळ म्हणजे काय गं? का यमक म्हणून काहीही आपलं द्यायचं ठोकून. थेंबाथेंबी असा आहे का शब्द? थेंबे थेंबे ऐकला आहे.

ठोबळ = ?..........('ढोबळ' का?)
असो
काफिये एकापेक्षा एक सरस अन् वेगळे आहेत. आवडले

माझ्यामधुनी मीच वगळता
उरतो हा जगण्याचा गोंधळ !>>>>>>>>>मला हा शेर सर्वाधिक आवडला
गझल छान आहे
धन्यवाद!!

खूप छान! छोटुली पण अर्थ महान.
एकेक शेर आवडलाय.

"थेंबे-थेंबे" असा बदल करता येईल ना! मला वाटतं छान वाटेल!

Happy

आभार!

Mohini ताई सुटलातच एकदम! जरा तब्येतीन म्हणजे काय? तू कोण मला सांगणारी? म्हणे गझल झाली वश प्रियाला ध्येय जगण्याचे मिळाले. तुला जगण्याचे ध्येय मिळाले आणि मराठीला नवीन शब्द मिळाले होय का गं?

दखल घेत जा कणा-कणाची...
थेंबे-थेंबे बनतो ओघळ ! << Happy