अपेक्षा नको!

Submitted by आनंदयात्री on 9 August, 2012 - 08:18

अजून क्षणभर जगता यावे म्हणून मी रेंगाळत होतो
मुठीत आल्या वाळूलाही नजराणा मी समजत होतो!

कधी वाटले, प्रेम खुशीने झोळीमध्ये दिलेस माझ्या
कधी वाटले, भीक तुझ्या प्रेमाची कणभर मागत होतो

तळव्यावरती अलगद जपले होते अपुले रेशिमनाते
जपता जपता नकळत त्याला प्रेमाने चुरगाळत होतो

वर्तमान हा जगता जगता निसटुन गेला, कळले नाही!
गतकाळाचे बोट धरुन मी भविष्याकडे चालत होतो

'अपेक्षा नको', अपेक्षाच ही ठेवलीस ना अखेर तूही!
अपेक्षांमुळे नाते फुलते, हेच तुला समजावत होतो!

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/08/blog-post_6499.html)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सतीशजी ! आपला प्रतिसाद वाचला
(आवडला की नाही ते विचारू नका. !!)
निशिकांतजी ऐवजी नचिकेतजी असे हवे ....................पहिल्या ओळीमध्ये.

........................वैवकु
Happy

सर्वांना धन्यवाद! Happy

सतीशजी,
ही १६ गुरू असलेली ही मात्रावृत्तातली गझल आहे -
आपण सुचवलेल्या सूचनांमध्ये मात्रांची गडबड होते आहे!!

I will take it as a compliment! <<<<<<<<<< Rofl आय हॅव्ह स्पेशली मेन्शन्ड दॅट इट इज अ काँप्लिमेन्ट!

=============

निशिकांतजी! गझल छान आहे, आवडली! फक्त काही ठिकाणी –हस्वदीर्घाच्या चुका जरा खटकल्या ज्या गीतात चालून जातात, पण गझलेत नाही.<<<<<<<<<

प्रोफेसर साहेब, बरे व्हा! हे निशिकान्तजी नसून नचिकेतजी आहेत. तुम्हाल दोघांत साम्य वाटणे साहजिक आहेच.

निशिकांतजी कोण? कुठे आहेत?<<<<<<<<<<

मयेकर, तुमची निवृत्तीची वेळ आलेली आहे

आपण सुचवलेल्या सूचनांमध्ये मात्रांची गडबड होते आहे!!<<<<<<<<<<

नचिकेत, कामयाब शेर करा, मात्रा मोजू नका Light 1 ( Lol )

ही वाचनातून निसटली होती. फार सूक्ष्म लेखन. आनंद झाला,आनंदयात्री.

वर्तमान हा जगता जगता निसटुन गेला, कळले नाही!
गतकाळाचे बोट धरुन मी भविष्याकडे चालत होतो

'अपेक्षा नको', अपेक्षाच ही ठेवलीस ना अखेर तूही!
अपेक्षांमुळे नाते फुलते, हेच तुला समजावत होतो!

खूप शुभेच्छा.

अपेक्षा नको', अपेक्षाच ही ठेवलीस ना अखेर तूही!
अपेक्षांमुळे नाते फुलते, हेच तुला समजावत होतो! <<<क्या बात है ! >>>

Pages