आर् डी बर्मन फॅनक्लब

Submitted by सशल on 18 August, 2012 - 01:55

आर् डी बर्मन अर्थात पंचम ह्यांच्या उमद्या संगीताबद्दल, त्यातल्या चांगल्या-वाईट गोष्टींबद्दल चर्चा .. Happy

विशेषतः जुनं संगीत ऐकलंच नाही, आवडतच नाही असं म्हणणं असणार्‍यांसाठी .. Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बायदवे, इथे मी प़ण आहे बरका! माझ्यासाठी(मला ज्ञानप्राप्ती होण्यासाठी Proud ) कदाचित एसडी बर्मन फॅनक्लब काढावा लागेल. Wink

बायदवे, इथे मी प़ण आहे बरका! माझ्यासाठी(मला ज्ञानप्राप्ती होण्यासाठी Proud ) कदाचित एसडी बर्मन फॅनक्लब काढावा लागेल. Wink

मयेकर, आणखी जुने .. Happy

जोक्स् अपार्ट , पण आर् डी बर्मन १९९४ पर्यंत अ‍ॅक्टिव्ह होते त्याला आता २० वर्षं होतील .. मग "जुने" म्हणणं अगदीच वावगं ठरू नये .. Happy

काढाकी. एसडी बर्मन काढा, कुंदनलाल सैगल काढा- कोणाचाही काढा. आम्हाला लाज नाही. आम्ही येऊच. Happy

बस्के, तूच मा ख मै.
मी इथेसुद्धा आणि एसडी बर्मन फॅ क्ल निघाला तर तिकडे सुद्धा.

किती क्लब काढणार? Happy ज्यांना संगीत, सूर ह्याचा नाद आहे, आवड आहे, सच्च्या सुरांवर भक्ती, प्रेम आहे, त्यांनी तुलना कशाला करत बसायचं? जे उत्तम आहे, ते कालातीत असतंच की - नवं असो की जुनं.

हे बॉस होते/आहेत. ह्यांच्या पोतडीतून कुठली चीज ऐकायला मिळेल सांगता येत नाही. कारण अजुन ही सगळा आर्डी (हिंदी फक्त बंगाली हे वेगळे प्रकरण आहे) ऐकलेला नाहीये. Happy

बरं गाणी येऊद्या की..

इजाजत!! आहा! मोस्ट फेवरिट!! कतरा कतरा आणि छोटीसी कहानी से प्रचंड आवडतात!
१९४२, सागर, सत्ते पे सत्ता पण बेस्ट!

मेहबूबा ढापले थोडे त्याने.. Sad पण तरी मला त्याने ढापलेली असली तरी त्याचंच गाणं जास्त आवडते ओरिजिनलपेक्षा. Happy

शैलजा, अगं काढूया की भरपूर फॅनक्लब त्यात काय. आवडत्या गाण्यांना उजाळा मिळाला तर आवडणार नाही का? कम्पॅरिझनचे म्हणशील तर मी तरी करत नाही कम्पेअर. जे ते आपापल्या जागी बेस्ट आहे. वैयक्तिक आवडीनिवडी हा निराळा भाग.

आरडी चे नवे हटके प्रयोग सही असतात !
कटी पतंग च क्लब हिट Happy

मेरा नाम है शबनम
प्यार से लोग मुझे कहते है शब्बो
तुम्हारा नस्म क्या है
लीना मीना अंजु मंजु
या............ मधु :).

मेहबूबा चे ओरिजिनल. http://www.youtube.com/watch?v=4UJXgmPqAE4
मेहबूबाची सर नाही त्याला .. Happy
** रिक्षा आली **
मी खूप पूर्वी पोस्ट लिहीली होती ब्लॉगवर. http://bhagyashreee.blogspot.com/2012/03/sza-dzieweczka.html
** रिक्षा गेली**

जे ते आपापल्या जागी बेस्ट आहे. वैयक्तिक आवडीनिवडी हा निराळा भाग. >> +१०००

आणि बर्‍याचदा अगदी आवडत्या कलाकारांच्याही काही निर्मिती नाही आवडत. त्याने तरी काय फरक पडतो ?
ज्याक्षणी ज्याचं जे आवडेल त्याला उस्फूर्त प्रतिसाद...बस्स.

ढापण्यावरून आठवलं. स्वतः आरडीने सांगितलेला किस्सा. सिनेमा सागर. गाणं - सागर किनारे, दिल ये पुकारे... ह्या गाण्याची चाल त्यांनी म्हणे त्यांच्या वडिलांच्या एका गाण्यावरून ढापली आहे. आता ते गाणं आठवत नाही. पण ते गाणं सुद्धा सुपर हीट आहे. Happy बघा कुणाला आठवतं तर.
बाकी फॅनक्लब असो नसो... सिनेमाची गाणी ऐकत इथवर आलोय. शेवटावर पण तेच ऐकत जाणार. मग ती कोणतीही भाषा असो वा कोणताही संगीतकार. निकष एकच... कानातून मनापर्यंत जाते ते गाणं खरं गाणं. Happy

, पण आर् डी बर्मन १९९४ पर्यंत अ‍ॅक्टिव्ह होते त्याला आता २० वर्षं होतील .. मग "जुने" म्हणणं अगदीच वावगं ठरू नये >>> या वर्षी रिलिज झालेल्या 'पान सिंग तोमर' मधल्या 'मामय्या केरो केरो' पासून गेल्या वीस वर्षातील शेकडो जाहिराती, रिमीक्समधे ज्याचे संगीत वाजते आणि गाजते आहे तो 'जुना'?????
आरडीला जुना करणे काळालाही शक्य झाले नाही, तुमच्या म्हणण्याने काय होणार!

Pages