बिग बँग थेअरी - द सिरीयल

Submitted by aschig on 12 March, 2012 - 19:56

बिग बँग थेअरी वर येथे चर्चा झाली आहे का? असल्यास सांगा - तिथे उडी मारेन.

आत्ता हे आठवायचे कारण म्हणजे सध्या स्टिफन हॉकींग कॅलटेकला आहेत (त्यांचा वार्षीक दौरा) आणि ते चक्क ५ एप्रीलच्या बिग बँग थेअरीच्या प्रकरणात अवतरणार आहेत.

http://www.cbs.com/shows/big_bang_theory/photos/62583/behind-the-scenes/...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे जण शेल्डनला ड्रायव्हिंग शिकवायचा प्रयत्न करतात तो एपिसोड पाहिलाय का कोणी ???
फुल Rofl आहे !
त्यात डीएमव्हीच्या काऊंटरवरची बाई बहूतेक ऑक्टीव्हिया स्पेन्सर होती !

बहुतेक नाही, तीच आहे.
शेल्डन घरात सिम्युलेटरवर प्रॅक्टिस करतो तोच एपिसोड ना? भारी आहे. पेनी त्याच्या तोंडावर उशी मारते ते भारी आहे एकदम Proud

नी त्याच्या तोंडावर उशी मारते ते भारी आहे एकदम फिदीफिदी >>>> हां तेच.. Proud

मी सध्या चौथा सिझन बघतोय.. बर्नाडेट आणि एमी लई बोर आहेत !!! आणि एकंदरीतच पहिल्या तीन सिझन इतका चांगला नाही वाटला..

बादवे नवीन सिझन सुरु होणर का ह्या फॉलमध्ये ?

सगळे जण शेल्डनला ड्रायव्हिंग शिकवायचा प्रयत्न करतात तो एपिसोड पाहिलाय का कोणी ???
फुल आहे ! >>>>>> +१०००

शेल्डनला सारखा एखादा प्राणी आस्तिवात आहे.... यावर विश्वास बसत नाही..... पण ते charcter मस्त आहे..... !!!!!!! सही SERIAL आहे !!!!

बर्नाडेट आणि एमी लई बोर आहेत >>> हॉवर्ड आणि त्याची कायम किंचाळणारी आई पण बोर.
बर्नाडेट तरी एकवेळ ठीक पण एमी तर महाबोर.

पेनी १ नंबर (तीच एक बिचारी आणि नॉर्मल आहे सगळ्या लोकांमध्ये Happy ).

प्रिया गेली का? तिचे एपिसोड्स येणार आहेत का अजून Wink

शेल्डन चांगला (होता) पण आता त्याची तीचतीच नर्डगिरी कंटाळवाणी व्हायला लागली.

अरे शेल्डनची आई आवडणारे आहे की नाही कोणी..........शेल्डनच्या कॅरॅक्टरला 'अशी' आई देण्याबद्दल खरे तर कौतुकच करायला पाहिजे लेखकांचे. Proud

तिचा subtle racial stereotyping तुफान आहे अक्षरशः.............. Biggrin

>>subtle racial stereotyping
सटल कुठे हो निशदे, चांगली खुलेआम करते, आणि तेही इतक्या भाबडेपणानं! Proud ते 'थर्ड वर्ल्ड डीमन्स्'वालं वाक्य आठावलं का?

शेल्ड्न त्याच्या मांजरींना त्याच्या आवडत्या संशोधकांची नावं देतो आणि मग त्याची आई त्याला भेटायला येते आणि तिच्या तोंडी "काय ह्या मांजरांना ज्युईश लोकांची नावं देवून ठेवलीयेत" अशा अर्थाचं वाक्य आहे.... ह्या सगळ्याचा फक्त एवढ्या छोट्या वाक्यात भन्नाट विनोद निर्माण करणार्या लेखकांची खरच कमाल आहे...

सहावा सिझन बघतय की नाही कोणी ? मला एकही मिनीट बघता आलेलं नाहीये अजून.. !
मध्यंतरी पाचवा पूर्ण केला.. अ‍ॅमी, बर्नाडेट ने काही काही एपिसोडस मध्ये बरच बोर केलं.. पण बर्नाडेट नंतर बरीच सुधारली आहे...

वर शेल्डनच्या आईचा विषय आला आले.. लेनर्डची आई नाही का आवडत कोणाला.. किती स्थितप्रज्ञ दाखवली आहे.. Happy

मी एक एपिसोड पाहिला. मस्त होता. वोलोविट्ज ला स्पेस मिशन मधे इतर अ‍ॅस्ट्रोनॉट्स रॅगिंग करतात. Happy पेनी लेनर्ड बरोबर ब्रेकप चा विचार करते आहे हे सिक्रेट शेल्डन ला कळल्यावर त्याच्या एकेक रिअ‍ॅक्शन्स भारी Lol
पुढचा एपिसोड हिग्ज बोसॉन संबंधित काही तरी आहे म्हणे!

मी शेल्डनच्या मॉमचा जबरदस्त फॅन आहे. तिला आणखी वाव द्यायला हवा होता.

बिग बँग थिअरीचा एक unaired pilot इंटरनेटवर बघायला मिळतो. यात शेल्डन बराच नॉर्मल असतो. राज आणि हॉवर्ड ही पात्रं नाहीतच, आणि पेनीच्या रोलसाठी केली क्वोकोऐवजी दुसरीच एक खडूस दिसणारी आणि अजिबात विनोदी न वाटणारी ऍक्ट्रेस आहे. पात्रयोजना आणि पात्रांची आपसातली केमिस्ट्री एखाद्या सिरियलसाठी केवढी तारक किंवा मारक असते याचं उदाहरण आहे हा पायलट! अक्षरशः बघवत नाही. हाच फॉर्मॅट ठेवला असता तर सिरियल एक सीझनही चालली असती का याची शंकाच आहे.
सुदैवाने निर्मात्यांना आपली चूक समजली आणि त्यांनी योग्य ते फेरफार केले. मुख्य म्हणजे केलीला आणलं. द रेस्ट इज हिस्टरी.

पेनी लेनर्ड बरोबर ब्रेकप चा विचार करते आहे हे सिक्रेट शेल्डन ला कळल्यावर त्याच्या एकेक रिअ‍ॅक्शन्स भारी >>> सगळ्यात भारी डायलॉग्स पेनीच्या रुम मधे शेल्डन जातो तेव्हाचे आहेत. Lol

मी वॉलोविटज च्या लग्ना परेन्त पाहिले. पुढे पण एपिसोड्स आहेत का? टू ब्रोक गर्ल्स मधील आर्टिस्ट, मॅक्स चा कधी मधी बॉफ्रे. तो पहिल्यांदा बघितल्यावर जरा उंच लेनर्डच वाटला.

>>मी शेल्डनच्या मॉमचा जबरदस्त फॅन आहे. मी पण, मी पण!

>>लेनर्डची आई नाही का आवडत कोणाला.. किती स्थितप्रज्ञ दाखवली आहे.. Lol
ती त्याही पलिकडची केस आहे. लेनर्डच्या भावाला कशात बरं खूप यश मिळतं. त्यावर तिला, "यू मस्ट बी सो प्राउड!" म्हंटल्यावर ती किती शांतपणे, "कशाबद्दल प्राउड? या माझ्या नाही, त्याच्या अचिव्हमेन्ट्स आहेत" सांगते. Lol पेनी आणि तिच्यातले डायलॉग्ज फार फार भारी असतात.

सीबीएस डॉट कॉमवर बघा नवे दोन्ही एपिसोड्स.

आम्ही सध्या बाकी बघण्यात प्रचंड व्यस्त झाल्यामुळे बिग बँग पाहिलं नाहीये. रेकॉर्ड होत असावेत एपिसोड बहुधा

चमनला प्रियावाचून बिग बँग मध्ये राम नाही वाटते >> हो हो!! शेल्डनला थोड्यावेळासाठी का होईना निरूत्तर करणारी तीच एक. मी फार एन्जॉय केले ते एपिसोड्स.
'पेनी-लेनर्ड्-प्रिया' लव ट्रँगल बॉलिवुडच्या संगम पासून हॉलिवुडच्या ट्वायलाईट सागा पर्यंतच्या स्टोरीजना पुरून ऊरेल असा भारी होता. Proud

>>'पेनी-लेनर्ड्-प्रिया' लव ट्रँगल बॉलिवुडच्या संगम पासून हॉलिवुडच्या ट्वायलाईट सागा पर्यंतच्या स्टोरीजना पुरून ऊरेल असा भारी होता. Lol

प्रिया हे एकमेव कॅरेक्टर बोर झालं होतं, आणि ती अ‍ॅक्टर पण! मात्र डॉ. आणि मिसेस कूथ्रपाली फार आवडले. Proud

त्यांनी कधीही मिसेस वालोविट्झ दाखवू नये.

अमामी.. वॉलोविट्झच्या लग्नाने पाचव्या सिझनचा शेवट झाला होता.. आता सहावा सुरु झाला आहे.
प्रिया पेक्षा अ‍ॅमी आणि बर्नाडेट जास्त बोर मारायच्या त्या सिझनला..
प्रिया परत येणार का ते माहित नाही.. पण राजला लव्ह लाईफ आहे म्हणे.. त्यामुळे कोणतरी नवी अ‍ॅक्ट्रेस येईल असं वाटतय..

मृ.. हो ते आठवतय लेनर्डच्या आईचं...
लेनर्ड त्याच्या आई बद्दल शेल्डनला सांगत असतो... म्हणे "मी आयुष्यातलं सगळ्यात पहिलं मशिन बनवलं ते हगिंग मशिन.. कारण माझी आई मला कधी जवळच घ्यायची नाही.. बट द साड पार्ट इज.. माय डॅडी युज्ड टू बॉरो इट फ्रॉम मी.." Lol

'पेनी-लेनर्ड्-प्रिया' लव ट्रँगल बॉलिवुडच्या संगम पासून हॉलिवुडच्या ट्वायलाईट सागा पर्यंतच्या स्टोरीजना पुरून ऊरेल असा भारी होता >> Lol roommate agreement वाला भाग जबरी होता Lol

कूथ्रपाली ला मधेच सप्तरंगी वळणावर न्यायला लावलेले कि काय असे वाटत होते

ठीक आहे नको आवडू देत, मला आवडते बास झालं Lol

'पेनी-लेनर्ड्-प्रिया' लव ट्रँगल स्टोरीमध्ये पेनी प्रियाला म्हणते,
'लेनी तू दिलेला सिल्क शर्ट वॉशरमध्ये टाकत होता, मी होते म्हणून तो शर्ट वाचला, वेंधळाच आहे नाही आपला लेनी'

त्या 'आपला' शब्दावर तिघांचे एवढे भारी एक्स्प्रेशन्स आहेत ना!! हहपुवा!

Lol चमनभौ, तुम्ही "प्रिया आवडते'"म्हणताच त्यावर, "मला अज्जिबाता नाही" असं काही सव्वाशेरी म्हणायला म्हणून नाही लिहिलं हो ते. कधीपासूनच, "प्रिया सहन होत नाही" लिहायचं होतं. Proud तुमच्या पोस्टीनंतर उफाळून येऊन लिहिल्या गेलं, इतकंच.

तुम्हाला असे वाटते का ?

बरेचदा शेल्डनला काही गोष्टि विशेषतः human interaction and relationship मधल्या उशिरा समजतात (म्हणजे युरेका moment). तेंव्हा त्याचे जे expressions असतात ते friends मधे joey चे chandler च्या जोक्स वर असायचे तसे वाटतात.

Pages