गणेशोत्सव २०१२: पूर्वतयारी आणि सूचना

Submitted by संयोजक on 14 August, 2012 - 17:34

मायबोलीकरांनो,

यंदाच्या गणेशोत्सवाला आता फक्त एक महिना राहिला आहे. संयोजक मंडळानी जोरदार तयारी सुरु केली आहे. तुमच्याकडूनही सूचनांचे स्वागत आहे.

जय गणेश!

व्वा! गणेशोत्सवाचे वातावरण तयार व्हायला लागलय Happy

संयोजक मंडळास शुभेच्छा!

यंदा कलाकुसर स्पर्धा नसावी कारण मागचे २ वर्ष ही स्पर्धा होती. आणि ठेवणार असाल तर पेंटिंग्स, ड्रॉईंग्स अशी करता येइल का?

पाककला स्पर्धा असेल तर मजा येइल. २ वर्षे झालेली नाही.

लहानमुलांसाठी प्रकाशचित्रण स्पर्धा ठेवता येइल का? वय ६ ते १५ वर्षे.

अजुन काही कल्पना / सुचना असतिल तर नक्की लिहेन.

१) घरच्या गणपतीच्या इकोफ्रेंडली मखरांचे फोटो आणि ते कसे व कशापासून बनवले याची सविस्तर माहिती मागवणे. सगळ्यात सुंदर आणि पर्यावरणाचा जास्तीतजास्त विचार ज्या मखरात केला गेला आहे त्याला पारितोषिक देणे.

२) बाप्पाच्य नैवेद्यासाठी कुठल्याही प्रकारचा विस्तव, इंधन न वापरता करण्याजोगी पाककृती मागवणे.

३) लहान मुलांसाठी आरती म्हणण्याची स्पर्धा. आरतीची ऑडिओ क्लिप मागवणे.

४) लहान मुलांसाठी चिकणमातीचा गणपती बनवणे स्पर्धा. बनवलेल्या गणपतीचा फोटो मागवणे आणि पालकांनी काय मदत केली त्याचा तपशील मागवणे.

५) लहान मुलांनी भाज्यांच्या टाकाऊ भागांपासून पासून बनविलेले छोटेखानी मखर उदा. शेंगांची टरफलं, मक्याच्या कणसांचे कव्हर / दांडा, लाल भोपळ्याची साल वगैरे.

६) गणेशोत्सवात नारळ खूप वापरले जातात त्यामुळे करवंट्या खूप उपलब्ध होतात. ह्या करवंट्यांपासून बनवलेल्या शोभेच्या किंवा उपयोगी वस्तूंचे फोटो मागवणे आणि त्या कश्या बनवल्या त्याबद्दल तपशील मागवणे.

मायबोलीचे सदस्य जगभर विखुरलेले असल्याने गणेशाची विविध देशातील/ प्रांतातील रुपे/ लेख बघायला/ वाचायला आवडले!

अजुन कल्पना:

- मुलांसाठी शास्त्रावर आधारीत एखादा प्रयोग / मॉडेल ... उदा. गुरुत्वाकर्षण, बॅटरी वापरुन प्रकाशकिरण कसे सरळच प्रवास करतात.. इ इ

- 'पाणी वाचवा' - या थीमवर काहितरी....

- प्रकाशचित्र कोलाज - एखादी थीम देऊन...

प्रचि झब्बु हव्वेच!!!!

मागच्या वर्षीच्या कल्पनाच वापरु नका शक्यतो. नाविन्य राहु दे. Happy
तसेच मुलांसाठी काही ठेवायच्या असल्यास थोडे फ्री फ्लोईंग राहिल्यास बरे.

स्पर्धा कुठल्याही ठेवा.. पण त्यांची संख्या मर्यादित ठेवा... गेल्यावर्षी इतक्या गोष्टी होत्या की नक्की कुठे लक्ष ठेवावे हेच कळत नव्हते.. आणि एकदा ते मागे पडले की मग ते वाचायचे बघायचे राहूनच जाते..

गेल्यावर्षी इतक्या गोष्टी होत्या की नक्की कुठे लक्ष ठेवावे हेच कळत नव्हते..
>>>> Happy संयोजकांचा अतिउत्साह अंगाशी आला की काय? Proud

माझं प्रामाणिक मत, या वेळी कुठल्याही स्पर्धा ठेउ नका, उपक्रम ठेवा फक्त ! :).
झालय काय कि गेल्या वर्ष भरा पासून मायबोलीवर ऑलरेडी स्पर्धांचा पाउस पडतोय .. माध्यम प्रायोजकांनी आयोजित केलेल्या निरनिराळ्या चित्रपटांच्या प्रमोशन च्या वेळी ऑलरेडी खूप स्पर्धा झाल्यायेत आणि चालु रहातील.
शिवाय मराठी भाषा दिवसाच्या निमित्तानेही असतात स्पर्धा आणि अगदी अत्ताच एक स्पर्धा चालुच आहे ऑलरेडी 'गाथा चित्रशती' ची.
पूर्वी इतक्या स्पर्धा नसायच्या त्यामुळे गणेश उत्सवाच्या स्पर्धांचं नावीन्य वाटायचं, पब्लिक वाट बघायचं !
म्हणून मला वाटतय कि फॉर अ चेन्ज स्पर्धा नको , फक्त उपक्रम ठेवा :).
ठेवल्याच तर अगदी सोप्या(जसे फोटोला कॅप्शन टाइप्च्या स्पर्धा) जिथे 'होमवर्क' किंवा फार तयारी लागणार नाही अशा !
गेल्या वर्षी टाकाउतून टिकाउ ला एकही एंट्री आली नाही.. हिम्स म्हणतोय त्याला अनुमोदन, असल्याच स्पर्धा तर संख्या कमी असावी !

गेल्या वर्षी गणपतीत आरोळी-चारोळी चा कार्यक्रम होता, तसेच यंदा म.भा. दि. च्या वेळी नाव-गाव-फळ-फूल चा कार्यक्रम अतिशय मनोरंजक वाटले होते. तश्याप्रकारच्या 'स्पॉट' स्पर्धा-कार्यक्रम अधिक रंगत आणतील असे वाटतेय.

आमच्या शहरातले पाच गणपती असा एक उपक्रम ठेवा. जेणेकरुन घरोघरीचे, दारोदारीचे गणपती पीसीसमोर बसून बघायला मिळतील. बाकी स्पर्धा, आरत्या, धागे खूप खूप झाले आहे. ते खरेच नको. तेच तेच तर मुळीच नको. नवीन जर काही नसेल तर खरच जुने ठेवू नका. त्यातला त्यात आपल्याकडचे गणपती बघायला छान वाटतात.

मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवता येतील का? माबो करांचे सादरीकरण. रोज एक असे १० कार्यक्रम आता सुरू वात केली तर रेकॉर्ड करता येतील. उदा: रैना - सुश्राव्य गायन, उभ्या उभ्या विनोद चा एखादा खास माबो स्पेसिफिक कार्यक्रम, कथाकथन, परदेशातील मराठी लोकांचे विविध गुणदर्शन बघायला खरेच आवडेल. एखादा नृत्य प्रकार( लावणी नव्हे, भरतनाट्यम किंवा क्लासिक, साल्सा इत्यादी पण चालेल. ) लाजोंची नव्या नैवेद्यांची व्हिडिओ क्लिप एक दिवस, चित्र प्रदर्शन. माबो वरील कलाकारांचे. नाटक/ स्किट बसवून ते ही सादर करता येइल. कविता प्रेमींसाठी दर्जेदार कवितांचे कविता संमेलन. नाट्यवाचन, you ask for clips and upload the three best in each category.

१. नैवेद्य स्पर्धा - यामध्ये काही ठराविक पदार्थ देउन त्यापासुन बनवलेली पाककृती इथे फोटोसहित सादर करायची

२. आरती-गीत स्पर्धा - श्रीगणेशावर स्वतः लिहीलेली आरती किंवा एखादे गीत इथे सादर करायचे

३. पुरातन श्रीगणेश मंदिर माहिती व प्रचि स्पर्धा - या मध्ये काही पुरातन श्रीगणेश देवस्थांनांची माहिती व त्या संदर्भातील प्रचि सादर करता येतील

४. गणेश चित्रकला स्पर्धा (माझ्या आवडीचा विषय आला Happy ) - या मध्ये दोन किंवा तीन विभाग करता येतील अ. १२ वर्षाखालील मुलांचा ब. १२ ते २० वर्ष क. खुला गट - २० वर्षावरील कोणीही किंवा सरळ १८ वर्षाखालील व त्यापेक्षा मोठा वर्ग

५. श्रीगणेश गीत गायण स्पर्धा - या मध्ये स्वतः गायलेली श्रीगणेशाच्या गाण्यांची ध्वनीफीत इथे सादर करायची

६. श्रीगणेश कला दर्शन स्पर्धा - या मध्ये वाद्यवाजन, रांगोळ्या- पारंपारिक, अपारंपारिक , फुलांच्या , हस्तकला, श्रीगणेशमुर्तीकाम - लाकडी, माती, स्फटिक,करवंटी, खडु, तसेच श्रीगणेशाशी संबधीत कोणतीही कला सादर करणे, जर वेगळी चित्रकला स्पर्धा घेतली नाही तर इथेच गणपतीची चित्रे सादर करता येतील ..... मायबोली संयोजक आपणांस विनंती आहे कि ही श्रीगणेशकलादर्शन स्पर्धा ठेवाच.... मायबोलीकरांमध्ये इतक्या सारया विविध कलाकौशल्य येणारया जाणकार व्यक्ति आहेत की ही स्पर्धा हिट होईल

७. श्रीगणेशदेवतेचे पुरातन मुळ, वेदकालीन वा त्यानंतरच्या काळातील या देवतेमध्ये झालेले बदल, त्याचा जणमानसावर पडलेला पगडा, श्रीगणेशाचे ऐतिहासिक महत्त्व, पेशवेकालीन गणपती अश्या वेगवेगळ्या विषयावर लेख मागवणे

८. इकोफ्रेंडली मखर व इतर सजावट स्पर्धा - या मध्ये आपल्या घरी किंवा आपल्या येथील श्रीगणेश मंडळातील मखर व इतर सजावट कश्या प्रकारे ईकोफ्रेंडली केले आहे याची माहीती व प्रचि सादर करायचे

९. एखादा ऑनलाईन सर्वांनी मिळुन खेळता येइल असा एखादा क्रियेटीव व मजेदार खेळ (गाण्याच्या भेंड्या नाहीत हां) एखादा सुचला की सांगेन तोपर्यंत तुम्ही देखील विचार करा---- ह्म्म मजेदार कोडी विचारणे पण अजुन थोडा हटके खेळ हवा.... सुचतय का बघा

मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळातील सर्व सदस्यांची संपूर्ण खरी नावे इथे अथवा त्यांच्या प्रोफाईल मधे जाहीर केलेली नाहीत. मंडळात सगळे नविन सदस्य असल्याने गेल्या वर्षी पासून हा नियम बनवण्यात आला आहे याची त्यांना कल्पना नसेल त्यामुळे ही आठवणरुपी सूचना.

आठवणीबद्दल धन्यवाद HH.

संयोजकांनी त्यांची खरी नावे आपल्या सदस्य खात्यात लिहिली आहेत. बाकी माहिती संयोजक मंडळातील सदस्यांना आणि प्रशासकांना दिलेली आहे.

गणेशोत्सोव हा सामाजिक ऊत्सव !!
तर 'मी समाजासाठी माझ्या परीने काय केले/करतो आहे' ह्याची ओळख करून देणारा एखादा कार्यक्रम असावा असे वाटते.
मायबोलीही गणेश चतुर्थीला सुरू झाली आणि ती नक्कीच आपल्यासाठी आपल्या समाजासाठी काही चांगल्या गोष्टी करीत आहे. समाजासाठी काही करणे म्हणजे समाजसेवाच करणे असे काही नाही. तर एखादी गोष्टं घेऊन मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचणे आणि त्या गोष्टीचा जनसमुदायाच्या जीवनावर चिंचोक्याईतका का होईना ठसा ऊमटवणे हे महत्वाचं आहे असं मला वाटतं.

बरेच मायबोलीकरही रोजचे व्याप सांभाळून असे काही तरी करत असतीलच. त्या मायबोलीकरांच्या कामाबद्दल आणि त्या कामातल्या त्यांच्या अनुभवांबद्दल वाचायला आवडेल.

किल्ले साफसफाई पासून एडस जागरूकता आणि योगासनं शिकवण्यापासून ते अंतरिक्षाबद्दल ओळख असे अगदी काहीही जे विना मोबदला किंवा ना-नफा-ना-तोटा तत्वावर पण योजनाबद्ध रितीने राबविल्या जात आहे त्या कामाबद्दल आणि त्यातील सहभागी मायबोलीकरांबद्दल वाचायला आवडेल.