विषय क्र. २ गेल्या शंभर वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत झालेले बदल माझ्या नजरेतुन

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 13 August, 2012 - 03:28

चित्रपट समजायला लागल्या पासुन म्हणजे साधारणता १९८०-८५ पासुन मी चित्रपट पहायला सुरुवात केली तसा खेड्यात रहात असल्यामूळे तेथील एकमेव टॊकिजवर जुनेच चित्रपट लागायचे आ‌ईसोबत लेडिजचे दर कमी असल्याने म्हणजे ७५ पैसे लेडिजमध्ये बसुन पहाले पुढे त्यातील काही आठवणीतील म्हणजे मराठीतील बण्याबापु, आणि हिंदीतील दोस्ताना, लोकपरलोक अशी काही आठवतात. माझ्या गावात व्हीडी‌ओ सन ८५ मध्ये आला तिकिट रु. १ सोबत चहा मोफत यामध्ये तो साधारणता जितेंद्रचे चित्रपट दाखवायचा सर्व चित्रपटात जितेंद्र आणि श्रीदेवी किंवा जयाप्रदा असायची, यात हिंमतवाला, मवाली असे एकाच धाटणीतील चित्रपट यायचे विशेष गाण्यातील बदल सोडला तर बाकी मारधाड आणि नायक नायीकेची प्रेमकाही पुर्ण व्हायची. अशाही चित्रपटात करमणुक व्हायची पण अशा चित्रपटात अश्लिलता नसायची, गॄप डान्स क्वचितच असायचा, असला तरी तो लयबध्द होता.
Himmatwala sridevi jeetendra sreedevi.jpg
मी गेली १५ वर्ष् झाली असतील चित्रपट पाहीला नाही. पाहीला तो फक्त मी शिवाजी राजे भोसले बोलतोय आणि मुलाच्या आग्रहाखातर 'पा'
paa_movie_amitabh_abhishek_bachchan_0.jpg
परतु घरी जेव्हा कधी मुलासोबत टीव्हीसमोर बसलेलो असतो तेव्हा थोडाफार पाहतो. पुर्ण अजिबात पहात नाही. तरी यातुन जे काही बदल अनुभवायला मिळतात ते सुखावह नाहीत. प्रगती झाली पण गतकाळातील चित्रपटाणी दिलेला आनंद गाणि आज ही आठवतो तो या गेल्या १० काय २ वर्षातील चित्रपटातील एकही गाण ऎकण्यासारखे नाही.
पाश्चात्य संस्कॄतिचे अनुकरण करताकरता आपली चित्रपट त्यातील कलावंत आज पुर्वी सारखी मनावर अधिराज्य करीत नाहीत, मग तो शहारुख असो कि अमिर असो. आताच्या चित्रपटात रोमान्स, मारधाड, अश्लिलता, गॄपडान्स अशाच बाबींचा समावेश दिसतो कथानक पार हरविलेले दिसते. ७० ते ८० च्या दशकातील चित्रपट हे समाज, भावनाप्रधान होते. नंतर देवानंद, अभिताभ, राजेश खन्ना अशी काही मंडळी आली ती काही मारधाड वा प्रणय प्रधान चित्रपट घेऊन, यात अभिताभचा कुली हा एक चांगला चित्रपट होता हमालांची होणारी पिळवणुक, स्थानिक लोंकांची पिळवणुक यात दाखविली आहे.या कालखंडा नंतर मग जितेंद्रचे युग सुरु झाले. तो ही नुसता करमणुक प्रधान चित्रपट घेऊन आला. साजाजिक विषय कधी कोणी अंगीकारलेच नाहीत. cooliedvd.jpg
जंजीर ते कुली असा प्रवास चित्रपटात जरी थोड्या फार प्रमाणात कथानक एकसारखे असले तरी त्यातील गाणी चांगली असल्याने चित्रपट चालायचा. याराना त्यातील एक होय. आताची गाणीही निव्वळ एकसारखी आहे. तेव्हा एखादे गवताचे पाते घेऊन जाणारा देवानंदच गाण घ्या किती छान वाटत होते. आज तसे होतच नाही.
संगीतातील बदलही विशेष सुखावह नाहीत पुर्वीचेच संगीत सुमधुर होते. डॉल्ब जरी ठेका घेत असले तरी ते क्षणीकच. जुने संगीत अजुनही एकावेसे वाटते. तेव्हा वाद्य साहीत्य अपुरे होते, तेवढ्याच वाद्य साहीत्यातुन छान चाल लावली जायची. गाणी सुध्दा प्रसंगाला अनुसरुन असायची. जग हे बंदीशाळा हे गाणं आणि त्यात परांजपेंचा आणि सीमा देवचा अभिनय खासच होता.
आताची चित्रपटातील कलावंत अभिनयासाठी विशेष परिश्रम घेताना दिसत नाहीत. अगदी १ महिण्यात १ चित्रपट तयार होतो. यात करोडो रुपय खर्च होतात पण फार फार २ आठवडे तो चालतो. याल जरी दुरदर्शन हे कारण असले तरी दुरदर्शनवर ही लोक फार पाहात नाहीत. एक तर त्यासोबत दिसणार्‍या भरमसाठ जाहीराती.
एकंदर सर्वच बाबतीत माझ्या मते तरी जुनीच चित्रपट सरस होती.

धन्यवाद.

(चित्र गुगलवरुन साभार)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>गेल्या शंभर वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत झालेले बदल माझ्या नजरेतुन
????
माफ करा पण...
लिहलय त्यातल काहीच कळल नाही

माफ करा पण...
लिहलय त्यातल काहीच कळल नाही>> मला हे सुचवायचे होते की बदला झालेला तो चांगला नाही, पुर्वीचे चित्रपट चांगली वाटत होती. (अपुर्‍या साधनातही)

>> जंजीर ते कुली असा प्रवास चित्रपटात जरी थोड्या फार प्रमाणात कथानक एकसारखे असले तरी त्यातील गाणी चांगली असल्याने चित्रपट चालायचा.
ह्या वाक्याशी सहमत!

तेव्हा एखादे गवताचे पाते घेऊन जाणारा देवानंदच गाण घ्या किती छान वाटत होते. आज तसे होतच नाही.<<<

Happy अगदी खरे मुक्तेश्वर, तेव्हाच्या गाण्यांइतकीच मेलडी तेव्हाच्या अभिनयात आणि चालण्याबोलण्यातही असायची

===========

संगीतातील बदलही विशेष सुखावह नाहीत पुर्वीचेच संगीत सुमधुर होते. डॉल्ब जरी ठेका घेत असले तरी ते क्षणीकच. जुने संगीत अजुनही एकावेसे वाटते. तेव्हा वाद्य साहीत्य अपुरे होते, तेवढ्याच वाद्य साहीत्यातुन छान चाल लावली जायची. गाणी सुध्दा प्रसंगाला अनुसरुन असायची. जग हे बंदीशाळा हे गाणं आणि त्यात परांजपेंचा आणि सीमा देवचा अभिनय खासच होता.<<<<

पूर्ण सहमत

आताची चित्रपटातील कलावंत अभिनयासाठी विशेष परिश्रम घेताना दिसत नाहीत. अगदी १ महिण्यात १ चित्रपट तयार होतो. यात करोडो रुपय खर्च होतात पण फार फार २ आठवडे तो चालतो<<< चित्रपट चालत नाहीत यामागे त्यांच्या सी डी आणि संगीताच्या सी डी चे हक्क विकले जाणे हेही असेल का? माहीत नाही.

या लेखातील सर्वात आवडलेली बाब म्हणजे दोन मित्रांनी बसून गप्पा माराव्यात त्या शैलीत आणि बोलक्या शब्दांमध्ये आढावा घेतला गेलेला आहे.

शुभेच्छा

प्रतिसादकांचे आभार !
(तसा चित्रपट माझा विशेष आवडीचा विषय नाही, त्यामुळे झालेल्या जडणघडणीत बारकाईने अभ्यासुन विशेष मुद्दे मांडता आले नाहीत.)

संगीतातील बदलही विशेष सुखावह नाहीत पुर्वीचेच संगीत सुमधुर होते. डॉल्ब जरी ठेका घेत असले तरी ते क्षणीकच. जुने संगीत अजुनही एकावेसे वाटते. तेव्हा वाद्य साहीत्य अपुरे होते, तेवढ्याच वाद्य साहीत्यातुन छान चाल लावली जायची. गाणी सुध्दा प्रसंगाला अनुसरुन असायची. जग हे बंदीशाळा हे गाणं आणि त्यात परांजपेंचा आणि सीमा देवचा अभिनय खासच होता.<<<<

पूर्ण सहमत सहमत सहमत......... Happy

चित्रपट चालत नाहीत यामागे त्यांच्या सी डी आणि संगीताच्या सी डी चे हक्क विकले जाणे हेही असेल का? माहीत नाही. >> तेही असु शकते, आणि दुसरे म्हणजे मल्टीप्लेक्सचे दर नवरा-बायकोनी जरी चित्रपट पहायचे ठरविले तर एक ३०० ते ४०० रुपये खर्च होतात. ८० रु चे तिकीट काठतो म्हटले तरी अगदी १० फुटावरुन चित्रपट पहावा लागतो.

छान लिहिलेय मुक्तेश्वरजी.
काही गोष्टी प्रकर्षाने जाणवताहेत.
सिने-गाण्यांमधली कविता एकीकडे हरवलीय एकीकडे बदललीय.आत्म्याचं संगीत ऐकायला मिळत नाही.
सिनेमाची कथा ही दुसरी हरवलेली गोष्ट.जग व्यामिश्र झालंय. नितळ कथानकांचा काळ मागे पडला.

स्वातंत्र्योत्तर काळातलं पहिल्या दुसर्‍या बहरातलं सुवर्णयुग निर्माण करणारी माणसं केव्हाच निमाली.

अरे पुनः आयुष्याच्या पेटवा मशाली असं चेतवणारं कुणी उरलं नाही..तुरळक प्रयत्न,प्रयोग लोकाश्रयाअभावी विझून जातात..

मुद्दे पटले सारे.. सर्वांच्या मनातील लिहिलेत.. खास करून मागच्या पिढीच्या याच भावना असाव्यात.. स्पर्धेसाठी शुभेच्छा.. Happy

अवांतर - एखादे नवीन चित्रपटातील गाणे आवडले की आई आज ही म्हणते की चाल जुन्या गाण्यासारखी आहे.. आणि तेच तिचे गाणे आवडायचे कारण असते.

माफ करा, पण बर्‍याच ठिकाणी नक्की काय म्हणायचे आहे तेच समजले नाही तर काही ठिकाणी शुद्धलेखनामुळे विरस झाला.
तरीही, प्रामाणिक प्रयत्न निश्चितच जाणवतो. पुलेशू.

प्रतिसादकांचे आभार !
हे लिखान टाईप करताना माझे जवळ बराह किंवा अन्य सॉफ्टवेअर नव्हते, ते येथुन डाऊनलोड केले. त्यात बरच टाईप झाल्यावर ते बंद पडले. मग विशालचे गबभन घेतले तिथे पुर्ण सेव्ह झाल्यवर फाईल मिळाली नाही मग नंद्याच्या लिंकवर पुन्हा टाईप करुन घेताना आधीच बरेच गाळले , पुन्हा टाईप करणेच जिवावर आले.
असो...... धन्यवाद !