मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यार, एक सॅमसंग गुरू अन एक मायक्रोमॅक्स टॅब असे दोन्ही मिळून ८ हजारात लै झक्कास मिळतं सगळं...

धन्स लोकहो. २० हजार वगैरे बजेट नाइये.

ई-ब्लीस, सामसुंग टॅब आहे माझ्याकडे. टॅबस् चा प्रॉब्लेम म्हणजे ब्याटरी ८ तास चालते. Happy

Sony Ericsson Xperia ray बद्दल कोणाला काही अनुभव आहे का?

९००० ते १०००० पर्यत मोबाइल घ्यायचा आहे Sony घ्यावा म्हण्तेय , पण माझा ह्यातला अभ्यास अगदीच कच्चा असल्याने गेला महिना भर नुसत घ्यायचा आहे असच म्हण्तेय , आता सध्या नोकिआ c ५ आहे , त्याचा सगळाच आनंद आहे !
जाणकारांन कडुन मदतीची अपेक्षा

बाबु मोबाइल घेतला का? कोणता?

माय्बोलीकर सुर्यकिरण कडे मायक्रोमॅक्स आहे अ‍ॅन्ड्रॉइड.
त्याला विचार त्याचा अनुभव कसा आहे. Happy

>> Sony Ericsson Xperia ray बद्दल कोणाला काही अनुभव आहे का?
त्याऐवजी सॅमसंग गॅलॅक्सी s-II घ्या. Xperia थोडा slow आहे असे ऐकलेय.

बित्तु, एक्सपिरीया सीरीज चांगली आहे, पण सोनी स्गळ्या गोष्टी प्रोपायटरी वापरते. त्यामूळे एकदा हाताळून बघ आणि मगच ठरव.

थंडे, फोनचा उपयोग फक्त बोलण्यासाठीच आहे की गाणी ऐकणे, गेम्स खेळणे, नेट धुंडाळणे, डाउनलोडींग वगैरे साठी करणारेस ?

अ‍ॅपल आय फोन ४ एस आणि सॅमसंग गॅलक्सी एस ३ यात बॅटरी बॅक अप कुणाचा चांगला आहे आणि किती आहे?
(३ जी, वाय फाय, गाणी आणि इतर अ‍ॅप वापरून)

सागर कोणत्याही स्मार्ट फोनमध्ये इतक्या प्रोसेसेस बॅक ग्राऊन्दला चालू असतात की १६००-१७०० एम ए ची बॅटरी दिवसभरही पुरत नाही. काही लोकाना दुपारी ४ वाजताच चार्जिंग करावे लागते . त्यासाठी टास्क किलरचे अ‍ॅप्स मोफत डाऊनलोड करून अ‍ॅपस्टोअरमधून मिळतात . त्याने सेलेक्ट करून अनावश्यक अ‍ॅप्स , प्रोसेसेस बन्द ठेवता येतात (व चालूही करता येतात.)३ जी नेटवर्क आवश्य नसेल तेव्हा नॉर्मलवर ठेवावे(९००-१८०० वगैरे. ऑटोमॅटिक वर ठेवू नये मॅन्युअली सेट करावे. ३ जी ने बॅटरी कंझुम होते खूप. नेट वापरायचे असेल अथवा व्हिडिओ कॉल च्या वेळी च ३ जी ठेवावे) अशाने दोन दोन दिवस बॅटरी चालवता येते. विशेषतः प्रवासात वगैरे...

एस-३ १२ तास चालतो साधारण गाणी, ३जी, गेम्स इ.चा फेअर युज केलात तर. एक्स्टेन्सिव युसेज ला करावे लागेल उत्तरदुपारी (!) चार्जिंग. त्यातही पॉवर सेवींग मोड ऑन ठेवलात तर बरेय. कारण बरीच पॉवर स्क्रीन खाते.
सिंक बंद ठेवावे नको तेंव्हा.
अ‍ॅप्पल चे माहीत नाही.
>> ३ जी नेटवर्क आवश्य नसेल तेव्हा नॉर्मलवर ठेवावे(९००-१८०० वगैरे. ऑटोमॅटिक वर ठेवू नये मॅन्युअली सेट करावे. ३ जी ने बॅटरी कंझुम होते खूप.
थँक्स बाजो. हे माहीती नव्हते. पहाते आता.
>> टास्क किलरचे अ‍ॅप्स मोफत डाऊनलोड
हे हव्या त्या प्रोसेसेस उडवून फोन क्रॅश नाही करायचे ना पण?

अँड्रॉईड वर जे जीमेल अ‍ॅप्लिकेशन आहे त्यातून लॉग आऊट करायचा काही मार्ग आहे का??? तसेच कॉन्टॅक्ट्स मध्ये जीमेलचे सगळे कॉन्टॅक्ट्स दिसतात ते पण कसे काढायचे..

लॉगआउट नाही होउ शकत..........remove करावा लागतो.......आयडी जीमेल चा....... मुळातच जीमेल वरच चालतो फोन म्हणाल्यावर काय करणार Happy

लॉग आउट होत नाही, तर आयडी चेंज करता येतो. म्हणजे दुसरे अकाऊंट अ‍ॅड करता येते. एक फेक अकाऊंट करा, अन तिकडे लॉगिन करा.
दुसरी आयडिया म्हणजे, पासवर्ड बदला. (दुसर्‍या काँप्युटरवरून) इकडे याला लॉगिन होता येत नाही म्हणून बोंबलेल फक्त. (एरर दाखवेल) बाकी बसू द्या ओरडत Wink
कॉन्टॅक्ट्स मधे कोणते दिसावेत असा ऑप्शन असतो, त्यातून इतर दिसू नयेत अशी सोय करता येते.

बोंबलेल फक्त. (एरर दाखवेल) बाकी बसू द्या ओरडत
>>>
तसे होत नाही. अ‍ॅन्ड्रॉइड्,गूगल, जीमेल एकच फॅमिली असल्याने इथे फोनवर लॉगिन होऊ शकत नसल्यास गूगलचे कुठलेच अप्प्लिकेशन वापरता येत नाही उदा: गूग्ल प्ले(जुने मार्केट) तुम्ही उघडू व वापरू शकत नाहीत. वगैरे. यू ट्यूब वर कॉमेन्ट टाकू शकत नाही इत्यादी.

बाजो, सिरियसली माझ्या ग्यालेक्सीवर तसे होत नाही.
सगळे काही व्यवस्थीत होते हो

तो मोबाईल आहे का ईब्लीस ? Happy

टॅब आहे तो. ७" स्क्रीन, १ जीबी रॅम. दे दणादण आहे एकदम.

मला १९३०० ला पडला. सहा सुलभ हप्त्यात.

फक्त कानाला लावून बोलणं एकदम भयंकर दिसतं

स्क्रीन मोठा असल्याने रीझल्टस् चांगले 'भासतात' फ्लॅशही नाहीये कॅमेराला.

पण मस्त आहे वापरायला. मला दोन दिवस जाते ब्याटरी, जास्त वापर नसल्याने

जाउ दे...............त्यापेक्शा आपला टॅब बरा Happy

सॅमसंग नोटवाला...........टॅबसारखाच आहे.... :).....

टॅबसारखाच आहे पण टॅब नाही. Happy
वरती ईब्लीसनी ज्याचा फोटो टाकलाय तो टॅब आहे

शिवाय नोट ३३ हजाराला आहे हे ही विसरु नये.

बाबु...........खर्च एकदाच करायचा ..........मग पुढची किमान २-३ वर्ष तरी खिशात हात नाही घालायचा.. Happy या मताचा मी आहे..

बाबु,
याच्यावर सध्या कंपनीनेच ब्लूटूथ इअरफोन्स फुकट देऊ केलेत. सो ते हातात धरून बोलणे प्रकरण वाचेल. अन मला टॅबच हवा होता, सिम वर नेट चालेल असा. वरून डाँगल बोअर करतं. तसा आधीचा ३-४ वर्षं जुना गॅलॅक्सी-३ आहे माझ्याकडे ऑलरेडी. (one of the earliest android phones)
क्यामेर्‍याचं म्हणाल तर फोटू काढायला वेगळा क्यामेरा घ्यावा. मोबाईलचे फोटू टाईमपाससाठी बरे, अश्या मताचा मी आहे.
याची 'आडर' देण्यात आली आहे. उद्या येईल. मला १८,९०० ला पडणार आहे.

सॅमसंगचे फोन डिसप्ले (अ‍ॅम्लोइड स्क्रीन) आणि मल्तिमेडिया फास्ट प्रोसेसर आणि अद्ययावत अ‍ॅन्ड्रॉइड ओएसवर बाजी मारून जातात. बॉडी मात्र प्लास्टिकची. एच टी सी चे नवीन बरेच फोन आलेत ते सॅमसंचे मार्केट बरेच खातील असे वाटते

मोबाईल कॅमेर्‍याचा फारसा उपयोग होत नाहीच म्हणा. परवा आय पॅड ३ पाहिला. पाहिलाच फक्त. Happy
काय जबरी डिस्प्ले आहे! तसेच मॅकबुक प्रो रेटिना डिस्प्ले. आता याच्या पलिकडचे काही असू शकेल असे वाटत नाही.....

मायक्रोसॉफ्ट्वाले विंडो८ बेस्ड टॅब आणणार आहेत म्हणे ऑक्टोबर मध्ये. त्याने धूमच होइल असे वाटते.

बाजो,
विंडो ची मजा तिच्या अ‍ॅप्स मधे आहे. अन माज हिडन प्रोग्रामिंग हूक्स मधे.बाकी आता अँड्रॉईडमधेही वर्जन ४ पासून मल्टीटास्किंग बरे झाले आहे. So as an OS, windows already has many alternatives. And android is already established portable OS. मासॉने आधी एक विंडोज सीई आणली होती, पामटॉप्स वै.साठी. पोर्टेबल डिव्हाइसेस अ‍ॅप असं बरंच मार्केटिंग पण केले होते बहुतेक.
अँड्रॉईडवर एक्सेल, अन पॉवरपॉईंटला सशक्त पर्याय मिळाला तर विंडोजचे बरेच मार्केट खाल्ले जाईल असे वाटते. HDMI (High-Definition Multimedia Interface) आऊटपुटमुळे प्रोजेक्टर्सना बहुतेक सगळेच स्मार्टफोन्स जोडले जातात. अन मला तरी टॅब्ज हे काँपुटर्सचे भविष्य आहेत असे वाटते.
नेट बद्दल म्हणावे तर जावा अशीही विंडोजसोबत मिळत नाही, ना ही फ्लॅश. डॉट.नेट असं काहीतरी नवं आणल्याचा आव मासॉने आणलाय खरा, पण ते शेवटी व्हीबी.नेट् च आहे. पूर्वी आयईला पर्याय नसे. आजकाल तसे फारसे काही उरलेले नाही.
सारांश, मला तरी (माझ्या दयनियरित्या तोकड्या -pitifully inadequate- कंप्यूटर ज्ञानाला स्मरून) असे वाटते की मासॉ टॅब मार्केटमधे दणकून मार खाणारे. (Unless they bring something 'cheap' meaning cost effective, considering the BIG markets. meaning india and souteast asia.)

मोबाईल डिव्हाइस मध्ये सध्या अँड्रॉइडचं मार्केट शेअर जवळ्-जवळ ६४%, आयओएस १९%, सिंबियन ६%, आराआयएम ५% आणि मायक्रोसॉफ्ट ३% आहे. बट देअर इज अ रुम फॉर एव्हरीबडी. गुगलने मायक्रोसॉफ्टचा फंडा वापरुन अँड्रॉइड प्रॉलिफरेट (३००% ग्रोथ) केली. मायक्रोसॉफ्ट मागे पडली आहे, पण त्यांचा ईतिहास पहाता (मागुन येउन मार्केट डॉमिनेशन) ते गुगलला कडवी टक्कर देऊ शकतात.

विंडोज ८ चे रिव्युज झकास आहेत!

राजे, रिव्युज कॅन बी मॅनेज्ड ना?
अ‍ॅक्चुअली वापरून पाहिल्याशिवाय काय समजणार नाही. अन अँड्रॉईड अजूनही फुकटच आहे.. म्हणजे गिर्‍हाईक पॉईंट ऑफ व्ह्यू ने. हो की नाही?

फुकट = फ्री म्हणजे कॉस्ट फ्री कि फ्रिडम्/ओपन?

गुगल ला प्रत्येक अँड्रॉईड कॉपी साठी पेटंट फी अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांना ध्यावी लागते; मायक्रोसॉफ्ट पकडुन. Happy

बॉटमलाईन, तुम्ही जेंव्हा अँड्रॉईड बेस्ड फोन घेता तेंव्हा त्यात हि कॉस्ट विक्रीच्या किंमतीत धरलेली असते...

देअर एंट नो सच थिंग अ‍ॅज फ्री लंच!

>>त्यात हि कॉस्ट विक्रीच्या किंमतीत धरलेली असते<<
हे बरोबर आहे तुमचं. पण तशी किंमत प्रत्येक मोबाइल सोबत त्याच्या ऑपरेटिंग सिस्टीम व प्रिइन्स्टॉल्ड अ‍ॅप्स ची असतेच.
पण जसं लॅपटॉप घ्यायला गेल्यावर 'याच्या बरोबर विन्डोज ७ फ्री' असं सांगितल्यावर बरं वाटतं, तसं ग्राहकाला तरी मोबाईलसोबत अँड्रॉईड फ्री असं वाटतंय.
अन दुसर्‍या अर्थाने ओपन ऑस असल्याने भरपूर व छान्छान फुकट अ‍ॅप्स मार्केट्/प्ले मधे उपलब्ध आहेत.

मायबोलि वर प्रथमच आलोय. ईतर पडिकान्चे विचार वाचुन आनन्द वाटला.
सम्सुन्ग गलक्ष्य अcए दोउस ६८०२ नविन्च घेटला (११.५ हजार)ऽन्द्रोइद आPP शोधत ईथपरन्त आलो.
ब्यटरि ब्यक अप सोडुन बाकि काहि अडचन गेलि नाहि.

दिलीप, बॅटरीसाठी किलर अ‍ॅप्स डाऊनलोड करा व ऑप्शन्स वापरून बर्याच प्रोसेस बन्द ठेवा स्क्रीन ब्राईटनेस कमीत कमी ठेवा(किमान ऑटो मोडवर तरी ठेवा). ३ जी असल्यास फक्त नेट साठीच ऑन ठेवा. २ दिवस बॅटरी जाईल Happy

फक्त मोबाईलच्या चर्चेसाठी

फक्त मोबाईलच्या चर्चेसाठी वेगळा ग्रूप सुरु केलाय. सगळी चर्चा एकाच घाग्यावर करण्यापेक्षा आता त्या त्या ब्रॅंड साठी वेगळे धागे/वेगळे प्रश्न उघडता येतील. त्यामुळे शोधणेही सोपे होईल.

धन्यवाद जोशी साहेब, करुन बघतो,किलर अ‍ॅप्स डाऊनलोड ची लिन्क द्याल तर बर. स्क्रीन ब्राईटनेस ऑटो मोड. मला माज़्या सम्सुन्ग गलक्षि एअस डुएअस ६८०२ मध्ये दिसला नाही.

सॅमसंगमध्ये कुठल्या फोन्समध्ये मराठी फोन्ट्/साईटस दिसतात?? टचस्क्रीन नसला/असला तरी चालेल. कमीत कमी ६-७ हजारामध्ये येणारा असावा.

साक्षीमी
गॅलेक्सी Y ड्यूओस घ्या. स्वस्तात मस्त फोन आहे. मराठी दिसते. लिहिताही येईल. २ सिम आहेत. अँड्रॉईड आहे, तुमच्या एक्झॅक्ट बजेटमधे आहे. (नुसता Y अधिक स्वस्त मिळेल)

माझ्याकडे सॅमसंग मॉन्टे आहे. २+ वर्षं झाली वापरतेय. आता पलिकडे ऐकणारे लोक तक्रार करतात खरखर येतेय म्हणून. तसं पाहिलं तर काहीही झालं नाहिये फोनला. पण बदलावा म्हणतेय.
कोणता घेऊ? Uhoh
सॅमसंग गॅलॅक्सी नोट २ मनात भरलाय, पण बजेट लईच मार खाईल Uhoh

कुठे मिळतो इझी इन्स्टॉलमेंटवर?
मुख्य म्हणजे शोशा साठी घेणं म्हणजे वेस्ट ऑफ मनी.
सध्याच्या फोनात ३G व्हिडिओ कॉलिंग वगैरे आहे पण मी एकदाही वापरलेलं नाही. इंटरनेट सुद्धा नाहि वापरत मी मोबाईलात.
२००० चा नोकिया घेऊ का एखादा? Proud

Pages