मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नोकिया चा ५२३३ / ५२३० बघितलाय. जास्त फोन बूक आणि एसेमेस कपॅसिटी ही मेन रिक्यायरमेन्ट आहे.

टच स्क्रिन किती चांगली / वाईट? टच स्किन फोन घ्यावा का?

डुआय, टचस्क्रीन चांगली की वाईट हे नाही सांगता येणार. पण एसेमेस टाईप करणं सुरुवातीला कठीण जातं. टचस्क्रीन मधे Capacitive & Resistive असे दोन प्रकार येतात. जास्त मोबाईलमधे Resistive असतो, कारण ती तंत्रप्रणाली स्वस्त आहे. यामधे टच करताना थोडा दाब द्यावा लागतो आणि म्हणुन अशा मोबाईलमधे Stylus दिलेले असते. Samsung Corby 3650 हा कमी किंमतीचा असला तरी त्यात capacitive technology वापरली आहे. नोकीआ आणि सॅमसंग यामधे तुलना केलीस तर Samsung चांगले फिचर्स कमी किंमतीत देतं. `उदा. Nokia 5230 जो साधारण ७०००-७२५० मधे येतो, त्यापेक्षा चांगले फिचर्स तुला Samsung Star NXT (6400-6500) मधे मिळु शकतात. उत्तम उपाय म्हणजे ज्या मित्रांकडे असे फोन आहेत त्यांच्याशी बोलुन ठरव. आणि घेतल्यावर ईथे तुझा अनुभव शेअर कर,म्हणजे ईतरांसाठी उपयोगी ठरु शकेल. Happy

थॅन्क्स भ्रमर Happy अरे माझी मेन रिक्यायरमेन्ट टच स्क्रिन नाहीये. दुकानदाराने नोकिया एक्स ३ , ५२३३ , ५२३० वगैरे दाखवला.

capacitive technology नोकियात नाही का? सॅमसंग हा नोकियाच्या तुलनेत चांगला आहे का ? (सर्वार्थानं म्हणजे - जास्त फोन बूक आणि एसेमेस कपॅसिटी) I am not sure about the quality of samsung! Sad

एक तर आधीच स्वस्त असे मोटो / सोनी घेऊन मी वैतागलोय . त्यात आता हे येवढे ऑप्शन्स आहेत ना... की समजत नाही काय करू ते.

अवांतर : आत्ताच हा व्हिडियो पाहिला -http://www.youtube.com/watch?v=17ZrK2NryuQ&NR=1

दिपक, नोकीआ आणि सेंमसंगच्या साईट वर जाऊन माहिती घे. 91mobiles.com, fonearena.com,gsmarena.com ईथेही माहिती मिळेल. त्यात तुझी आवश्यकता पूर्ण करणारे मॉडेल्स बघ. नंतर त्या मॉडेल्सची तुलना कर आणि ठरव तुला कुठला घ्यायचा आहे. यात बजेट, बॅटरी लाईफ, फोनबुक, connectivity options (usb,bluetooth, wi-fi), downloadable applications या सर्व बाबी ध्यानात घे. Happy

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

आवश्यक सुविधा.

1. दोन सिम्स सेवा देणारा.
2. नेट कनेक्टिव्हीटी साठी सोईचा.
3. मराठी की पॅड आणि डिस्प्ले आवश्यक.
४) ३ मेगा पिक्सलपेक्षा जास्त - कॅमेरा
५) चांगल्या कंपनीचा असावा.

खालील सुविधाही असेल तर फारच उत्तम.

१. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
लिहिणे आणि संपादनाची सोय असेल तर त्याहूनही उत्तम.
२. पीडिएफ सुविधा.
३. ३ जी

चांगले मॉडेल सुचविल्यास आनंद होईल. Happy

(सध्या माझ्याकडे नोकिया एन ७३ आणि ७२३० आहे.)

चायनीजमध्ये या सुविधा असलेले मॉडेल आणि ब्रँडनेम सांगाना.

त्यात बरे न दिसण्यासारखे काय आहे?
मी सुद्धा दिसायला कुठे बरा आहे?
माझ्यापेक्षा त्याचा लूक चांगलाच असणार हे उघड आहे. Wink

माझा सेलफोन अचानक बंद पडलाय, आणि काही केल्या सुरु होत नाहीये. सगळे नंबर वगैरे फोनमेमरीमध्ये सेव्ड आहेत, सिममध्ये नाहीत. काही ट्रबलशूटींग करुन फोनमधील नंबर पुन्हा सिमवर घेता येतील का? कोणास ठाऊक असेल तर सांगाल का?

मॉडेल आणि ब्रँडनेम

चायनीज खरेदी करण्याची पद्धत..
शक्य असेल तर मनिष मार्केटमधे जावं किंवा रविवार पेठ, फॅशन स्ट्रीट ला जाऊन यावं... तिथं मोबाईलमधे काय पाहीजे ते सांगायचं ..तो दोन तीन मॉडेल्स समोर ठेवतो. ते घेऊन आनंदाने घरी यायचं. नसेल तर चार दिवसांनी या म्हणून सांगतो...
पिंपरीला सिंध्यांकडं जबरी पीस मिळतात. कॉलेजच्या पोरांकडं हेच पीस असतात. रॉकरटीव्ही हा एक ब्रँड होता तीन वर्षांपूर्वी. त्यात टीव्ही दिसायचा. ऑफीसमधे मॅचेस बघायला उपयोग व्हायचा...

चायनीज फोन्स मधे सुविधांची रेलचेल असते आणि टिकतातही चांगले..

मुटे साहेब, चांगल्या ब्रँडचा हवा असेल तर Samsung 5722 बघा. मराठी की-पॅड मात्र नसेल. बाकी Micromax/Fly/Spice यामधे देखिल दुहेरी सिमची सुविधा आहे.

शैला, फोन सुरु झाल्याखेरीज तू काही नाही करु शकत. नियमित बॅकप घेत रहावे.

@shailaja if ur handset is from samsung,nokia,sony thn try thr online support feature which is on their website. or jst run to company's service center & ask for backup. i thnk its dead cos of s/w issue.

नोकिया C7 बद्दल कोणि रिव्यु करु शकतं का, त्याचे टच स्क्रिन Capacitive आहे कि Resistive (वेबसाईट वर Capacitive लिहले आहे) आहे, कोणा कडे आहे का, त्याचे मार्केट रेट रु.१६०००/- आहे ते बरोबर आहे का

धन्स भ्रमर, किमंत ची मी चौकशी केलोय, बजेट पुर्व त्याचे रेट रु.१९०००/- होतं, आता रु.१६०००/- आहे, पण ईथे कोणि वापरलं आहे का.

नोकिया सी५-०३ पाहिला होता नोकियाच्या साईटवर. पण दोन तीन डीलर्सनी 'त्याचं शॉर्टेज आहे' असं सांगितलं. म्हणजे ह्याचा अर्थ नक्की काय? उत्पादन होत नाहीये? की उत्पादन होतंय त्यापेक्ष खप जास्त आहे? क्लेम लावून घ्यावा की नाही? मोबाईल्स कंपेअर करतो त्या साईटवर रिव्ह्यू चांगले आहेत.

गो फॉर नोकिया एनी टाईम Happy मी सी -५ घेतला सोनी इरीक्सन बदलून.

पूनम, नोकिया प्रॉयॉरिटी सेंटर मध्येही बघ मे बी तिथं असेल.

मी सी -५ घेतला आहे. फोन आल्यानंतर घेतला असता स्क्रीनवर Calling येत राहते. आणि फोन ठेवल्यावर Call duration ००:००:०० असे दिसते. Software upgrade करून पण प्रोब्लेम चालूच आहे. Nokia care मध्ये जाणार आहे. पण कोणाला असा अनुभव आला आहे का?

मित्रांनो, ब्लॅकबेरी बद्दल जरा सांगा ना. माझे रिलायन्स कार्ड आहे. ९३७ पासुन सुरु होणारा न> आहे. ते चालेल आसा मोबाइल पाहिजे. बाकी अपेक्षा, नेड, सोशल नेटवर्किंग साईट, कॅमेरा, व्हिडीओ दिसावेत (बच्चाकंपनी साठी), लूक corporate असावा, किति पर्यंत येइल?

..

मुग्धानन्द,,,,,,,,, आपन HTC बघा वापरुन........छान आहेत त्यात मॉडेल्स............मी सध्या HTC HD AND WILDFIRE हे दोन्ही वापरतोय..........मराठी वेबसाइट दिसतात जर आपन ओपेरा ब्राउजर मधे काही सेटिंग्स बदल्या तर............

सोशल नेट्वर्किन्ग...कॅमेरा ५ मेगा पिक्सल ..आनी स्क्रिन ५ इंच आहे ज्यात चित्रपट मस्त बघु शकतात......३२ जीबी मेमरी कार्ड वापरु शकतात दोन्ही मधे.............

धन्स, उदय, पण मी प्रचंड अज्ञानी असल्याने तुम्ही वापरलेले सगळे शब्द मला बाउन्स गेले,HTC HD AND WILDFIRE. जरा अधिक स्पष्टीकरण द्या. आणिक बजेट काय असावे यासाठी?

.

HTC HD........हा मॉडेल चे नाव आहे.............५ इंच स्क्रिन आहे फुल टच मोबाइल विन्डो ७ आहे यात....एक्सेल वर्ड पी डी एफ फाइल सगळे बघु शकतात...एडिट सुध्दा करता येतात..मीनी लॅपटोप म्हनु शकतात.......३००००/- पर्यन्त ची किंमत आहे बहुतेक.....आता कमी झाली असेल म्हनुन......
WILDFIRE....हे ही मॉडेल आहे.......यात ३.८ इन्च स्क्रिन फुल ट्च ...अनर्डोविड २.२ आहे यात.....एक्सेल वर्ड फाइल्स बघु शकतात......एडिट नाही करता येत पण.....याचे ट्च स्क्रिन सर्वात छान स्मुथ आहे........मी आता पर्यन्त इतके स्मुथ ट्च अजुन कोनत्या ही मोबाइल मधे अनुभवलेला नाही............

त्या 'शॉर्टेज' प्रकाराबद्दल काहीतरी प्रकाश>>उत्पादन होतंय त्यापेक्ष खप जास्त आहे असंच वाटतय. काही वेळेस मॉडेल एकदम फेमस होतं आणि त्याची मागणी वाढते, त्याप्रमाणात पुरवठा होत नाही.

पूनम, नोकिया सी५-०३ झकास दिसतोय एकदम... तोच घेतलास तर जीपीआरेस अ‍ॅक्टिवेट कर त्यावर. Happy

शॉर्टेज प्रकाराबद्दल नोकियाच्याच दुकानात जाऊन बघ ते काय म्हणताहेत ते...

मी नुकताच एल जी चा LG Optimus ME P350 अ‍ॅंड्रॉईड मोबाईल घेतला. खरतर नोकिया सी५-०३ घ्यायचा विचार चालू होता. पण तेवढ्याच किंमतीत जास्त फिचर्स असलेला हा मोबाईल मिळला. Happy नोकिया सी५-०३ची जमेची बाजू ईतकीच की त्याचा कॅमेरा ५ एम पी चा आहे आणि एलजी चा ३.१ एम पी चा.

मला तरी ईतर अ‍ॅंड्रॉईड फोनच्या तुलनेत स्वस्त आणि मस्त वाटला. मोठा स्क्रीन, पीडीफ, वर्ड फाईल व्हुअर, 3G सपोर्ट, ऊऑन स्क्रीन क्वेर्टी कीबोर्ड आणि बरेच अधिक ईथे... LG Optimus ME P350 किंमत रु. ८५००.
याहून कमी किंमतीचा मायक्रोमॅक्सचा A60 आहे पण त्याचे मॉडेल तितकसे आवडले नाही.

मला मोबाइल फोन घेण्यासाठी मदत हवी आहे. अपेक्षा खालील प्रमाणे:
१. ड्युअल सिम
२. चांगली बॅटरी लाइफ
३. टिकाउ (पडला तरी टिकणारा)

ड्युअल सिम मस्ट आहे. नेट कनेक्टिवीटी असावी वगैरे अशी काही गरज नाही.
मी सॅमसंग C6112 पाहिला आहे. अजून काही चांगले ऑप्शन असतील तर प्लीज सुचवा.

मी blackberry curve घेतला, परवा, नवर्‍यासाठी. ९७००/- ला मिळाला, २G,3mp camera, चांगला वाटतोय.
निलुतै, अभिनण्दन, मला स्वतःसाठी, तो optimus घ्यायचा आहे. आजुन डिटेल रिपोर्ट, वि.पु. मधे द्याना. आणी कुठुन घेतला ते पण सांगा. मुलुंड मधेच घेतला ना?

मला आयफोन ४ घ्यायची इच्छा आहे. तो आयफोन भारतात व दुबईतही वापरायचा आहे.

माझे काही प्रश्नः
१) भारतातल्या अ‍ॅपलच्या साईटवर बघितलं तर एअरटेल किंवा एअरसेलचं कॉन्ट्रॅक्ट/सर्व्हिस घ्यावी लागते असं दिसतंय. असं केलं तर तो फोन मला फक्त भारतातच वापरता येईल, दुबईत नाही. यावर काय उपाय कोणी माहितगार सांगू शकेल कां?
२) अ‍ॅपलच्या युएसच्या साईटवर बघितलं असता तिथे 'अनलॉक्ड आयफोन' चाही ऑप्शन दिसतोय, ज्यामुळे तो आयफोन त्या त्या ठिकाणचं सीमकार्ड घालून कुठेही वापरता येऊ शकेल. अ‍ॅपल स्टोअरमधूनच असा आयफोन घेतला तरी त्याची वॉरंटी असते कां?
३) हेच ऑप्शन भारतातही मिळतात कां?

फक्त फोन, फोटो आणि गाणी या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतील तर नोकिया किंवा सॅमसंग पैकी कोणता चांगला? इतर ब्रॅण्डचे असतील तर तेही सुचवा.

Pages