मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

SAMSUNG ACE>>>>याबद्दलच विचार चालु आहे>> बॅटरी बॅकअप किती आहे हे बघ रे.
मलाहि अ‍ॅन्ड्रॉइड फोन घ्यायचा आहे सेम बजेट. पण दोन मित्रानी एस नको घेवु अस सांगितलय. त्यांच्यामते बॅटरी बॅकअप खुप कमी आहे.

idea चा zte blade फोन येतो, छान आहे तो मी वापरत आहे, android 2.2 आहे, resolution 480x800 खुपच छान आहे, प्राइस : ६५०० ला येइल. मस्त फोन आहे. बघुन घे एकदा.

जिप्सी, झकासराव, गॅलॅक्सी एस साठी एक स्क्रिप्ट मिळते, ते वापरले की बॅटरी साधारणपणे २ दिवस चालते [नियमित फोन कॉल्स, GPRS Internet use, संगीत ऐकणे वगैरे करून. No 3G and GPS usage]. मी गॅलॅक्सी एस गेली १.२ वर्षे वापरतोय. माझा अनुभव अतिशय चांगला आहे.

जिप्सी, झकासराव, गॅलॅक्सी एस साठी एक स्क्रिप्ट मिळते>> खरतर त्या रेन्ज मध्ये तोच अ‍ॅन्ड्रॉइडवाला चांगला फोन आहे. पण बॅटरी बॅकअपच चिन्तेचा विषय. तुम्ही सांगितलेला उपाय करुन बघता येइल.
दुसरा आहे वेव्ह पण त्यात बाडा आहे. त्यामुळे तो नकोय. मग १०k च्या आतील फोन आहेत.

मोबाईलमध्ये जे बाय डीफॉल्ट गेम्स असतात त्यातला एखादा डिलीट झाला तर तो पुन्हा घेण्यासाठी काय करावं लागतं??

बीझनेस युज साठी चांगला मोबाईल कोणता?? अनलिमिटेड मेल्स, समस, फोनबुक मेमरी, बॅटरीबॅक अप हे मेन फिचर हवेत. ब्लॅकबेरी, नोकिया, सॅमसंग मध्ये किंवा आणखी कोणता असेल तर कृपया सांगा.

पुश मेल्स हा प्रकार काय असतो??

मध्ये राज जैन भेटला होता.
तो टेक्नॉसॅव्ही माणुस आहे. त्याचा स्टडीदेखील चांगला आहे मोबाइल्स आणि कॉम्प्युटर बाबत.
त्याला सल्ला विचारला होता तर त्याने बजेट १० च्या पुढे नेउ नकोस असा सल्ला दिला.
कारण वर्षभरात टेक्नॉलॉजी भरपुर अपडेट होते. मग आपण घेतलेल्या १५ ते २० हजार रुच्या फोनच काय करायच वाटत राहत.
तसही सध्या १० ते २० मध्ये फोन चांगला असला तरी त्यात एक गोष्ट मिळते तर एक नाही अशी परिस्थिती आहे.
शिवाय सर्वोत्तम फोन म्हणावे असे फोन २५ के च्या पुढेच आहेत.
मी शेवटी विचार करुन एच टि सी एक्सप्लोरर घेतलाय. ८.५ के.
सेकंडरी कॅमेरा नाहिये. (तो तर २० केच्या सॅमसन्गला देखील नाहिये)
नेट वापरुन पाहिल. मस्त पळतय नेट. बॅटरी आपण नेट किती वापरतो त्यानुसार वापरली जाते.
नेट न वापरता आणि नॉर्मल कॉलिन्ग होत असेल तर मला २ दिवस जाते बॅटरी.
नेट वापरल तर लवकर संपेल.
कॅमेर्‍याला ऑटॉफोकस आणि फ्लॅश नाहिये.
पण तरिही फोन रिजॉल्युशन उत्तम असल्याने दिवसा काढलेले फोटो मस्त येतात.
कमी प्रकाशात तेवढे खास फोटो येत नाहियेत. (माझ्याकडे सोनी H7 दिजिटल कॅमेरा असल्याने फोटोसाठी ह्याचा उपयोग कमीच होइल)
ह्याची इन बिल्ट मेमेरी ही एक अडचणीची गोष्ट आहे.
ती फक्त ९० एमबीच मिळते. (५१२ रॅम मधली. थोडीफार वाढुन १०० ते १२० एमबी होइल)
पण जे अप्लिकेशन मुव्ह होत नाहीत मेमरी कार्ड मधेय अशी खुप अ‍ॅप्लिकेशन नाही साठवता येणार.
अर्थात फोन रुटिन्ग केले तर ते ही शक्य आहे. (ही फोन रुटिन्ग भानगड मला अजुनही कळालेली नाहिये म्हणा)

साक्शीमी... बिझ्नेस यूज करता ब्लॅकबेरी मस्त आहे. पण ब्लॅकबेरी करता डेटा रेन्ट्ल वेगळं भरावं लागत. + वॉईस, एसएमेस चे पैसेही वेगळे. पण अमर्यादीत ईमेल्स, फोनबूक, एसेमेस सगळं येत त्यात. कुठल्याही मोबाईल डीवाईसवर १० ईमेल अकाऊन्टस ठेवता येतात. बीबी चा बॅटरी बॅकअप पण चांगला आहे.

हेच सगळे फायदे, आयफोन लाही मिळतात, पण जरा बॅट्री कमी चालते.

पुश्मेल्स ... जेव्हाही सर्वरवर मेल येते, ती तुमच्या फोन वर आपोआप पाठवली जाते, थोडक्यात पुशकेली जाते.
फेच मेल्स... तुमचा फोन सर्वरला कनेक्ट होतो आणि मग मेल्स चेक करतो... न्वीन मेल असेल तर मग ती फोन वर येते.
पहील्या प्रकारात मेल्स लवकर मिळतात, बॅटरी कमी वापरली जाते. दुसर्या प्र्कारात जरा वेळ लागतो, बॅटरीही जास्त लागते.

साहेब,सरळ Nokia घ्या. मी वापरतोय सध्या. आणि हा प्रतिसादही त्याच्यावरुनच देतोय. कारण माझ्याकडे कॉम्प्यूटर नाही .

त्यापेक्षा त्याच बजेट मधे HTC Sensation XL घ्यायचा होता.>>

जौदे स्वस्तातलला म्हणुन हा घेतला.
सेन्सेशनही मस्त आहे.

बाय द वे,
एक्सप्लोरर मध्ये मॅग्नेटोमीटर नसल्याने ह्यावर होकायन्त्र अ‍ॅप्लिकेशन चालत नाही.
साउन्ड क्वालिटी जबरदस्त आहे.

नोकियाची लुमिया सिरीज 900 ,800, 610 उत्तम आहे. विंडोज मोबाईल 7.5 OS आहे त्यांना. ल्युमिया 610, 710 ही स्वस्त विंडोज मॉडेल्स बहुधा जुनमध्ये येतील. 13000 च्या आसपास किंमत असलेला lumia 710 परफेक्ट बजेट स्मार्टफोन असेल. nl710.jpg

मला नविन मोबाईल घ्यायचा आहे,

1. Samsung Galaxy S 3
2. Samsung Galaxy Note
3. Apple I phone 4

या पैकी कोणता चांगला आहे ? वरील मोबाईलमध्ये मायबोली,लोकसत्ता या मराठी फॉन्ट वापरणारया वेबसाईट नीट दिसतील का ? तसेच मला मोबाईल वापरुन त्यामध्ये मराठी टाईप करता येइल का? कोणी वापरत असेल तर प्लिज आपले अनुभव शेअर करा

अजुन Apple I-phone 5 कुठे आलाय बाजारात?
मी तरी आयफोन ला पसंती देईन. मी सध्यापण वापरतो. सगळे मराठी पेपर्स तसेच मायबोली वाचतो. मायबोली वर २-३ ओळीचे प्रतिसाद पण देण्या इतपत टाईप करायची सवय झाली आहे.

@ उदयन

Samsung Galaxy Note मध्ये मराठी वेबसाइट नीट दिसतात का? त्यात मराठी टाइप करता येते का? तुम्ही सध्या तो वापरत आहात का? मला स्वत:ला अ‍ॅपल घ्यावासा वाटत आहे पण नेट वर सर्फ केल्यावर Samsung Galaxyla खुप जणानी प्रेफरन्स दिला आहे असे दिसते. तसेच Samsung Galaxy Note चे फिचर्स तर खुप मस्त वाटत आहेत, त्याची Screen Size,Photo Video Editing फिचर्स चांगले वाटत आहेत, कोणी वापरत असल्यास तुम्हाला कसा वाटत आहे ते सांगा......

ओपेरा मधे तुम्हाला मराठी दिसेल........ काही सेटिंग्स केल्यावर... बाकी मराठी फाँट त्यात नाही आहे...
.
.
.
.
.
वर्षा मॅडम ...............ते उद्यन नाही हो ...............उदयन आहे .....:(
.

Lol
.
.
नोट मधे अँड्रोईड आहे जो आता ४.० मधे अपडेट सुध्दा होतो...त्याच बरोबर त्यात प्रोसेसर आणि रॅम चांगली आहे...बॅटरी बॅकअप नेट चालु असताना किमान ५-६ तास देतो...अन्यता २-३ दिवस आरामात जातो...

Samsung-Beam-.jpg

'Samsung Beam', हा मोबाईल कुणी वापरतय का? याची प्रोजेक्शन रेंज कीती आहे.

विजय...................... याचा वापर अत्यंत मर्यादीतच होतो... प्रोजेक्टर आपण फक्त चित्रपट बघताना वापरतो..जास्त करुन त्यात ही चित्रपट काही चांगला दिसत नाही..:) हा असेल २५ हजारच्या पुढे ... Happy

iphone 4.3.5 च tethered jailbreak म्हणजे काय ?
tethered jailbreak केलं असेल तर रिबूट करताना s/w ची गरज भासते का ?

मी स्वस्त आणि मस्त samsung Galaxy Ace Duo घेतला. १३२००. खरेच मजा आली. मायबोली उत्तम चालते.

Galaxy Y Duos देखिल सुंदर आहे, थोडा छोटा स्क्रीन पण किंमतही ८६०० फक्त.

मी परत नवीन मोबाईल घ्यायचा विचार करतोय. आत्ता सामसुंग बी ७७२२ वापरतोय. फोन चांगला आहे. एक दोन छोटेसे प्रॉब्लेम सोडले तर.

नवीन घ्यायची कारणं

१. अ‍ॅन्ड्रॉईड वापरल्यापासून बाकिच्या ओएस् वरुन मन उडालं.
२. ३.२ ईंची स्क्रीन छोटा वाटतोय. खास करुन पीडीएफ् वाचणे, नेट वापरणे.

हा फोन फार्फार तर दीड वर्ष वापरुनही आता त्याची बाय बॅक २.५ पर्यंतच मिळत्येय (खरेदी १२). आता १० च्या वरचा फोन घ्यायचा नाही हा कानाला खडा.

बजेट कमी असल्याने मायक्रोमॅक्स A85 किंवा A75 बघतोय.

कारणं

१. ३.८ च्या आसपासचा स्क्रीन.
२. अ‍ॅन्ड्रॉईड
३. वाजवी किंमत (९००० / ते ११०००/- )

व्हॉट से ?

मायक्रोमॅक्स ??????????

हम्म.........

सॅमसन्ग नंतर जरा जड जाइल वाटतय. ओव्हरऑल क्वालिटी बाबत बोलतोय मी..

हा फोन फार्फार तर दीड वर्ष वापरुनही आता त्याची बाय बॅक २.५ पर्यंतच मिळत्येय (खरेदी १२
>>> हल्ली कमी किमतीतही नवीन अपटुडेट फीचरवाले फोन उपलब्धझालेले असल्याने सेकंड हँड फोन कुणी घेतच नाहीत अशी मोबाईल विक्रेत्यांचीही तक्रार आहे.शिवाय प्रत्येक प्राईसरेन्ज मध्ये नवे फोन उपलब्ध आहेत. टच स्क्रीन, अँड्रॉईड सर्व खिशाना परवडेल असे उपल्ब्ध आहेत त्यामुळे सेकन्ड हँड फोनला अजिबात मार्केट नाही म्हणून मोबाईल विक्रेते ही किमती पाडून मागतात्.किम्बहुना जुने फोन आताशा ते घेतच नाहीत

कृपा करुन मायक्रोमॉक्स घेवु नका. मी रोज रडायचे त्या फोन मुळे. शेवटी १ दिवस पूर्ण मेला. मग मी ९०० रु. चा ZTE का अशाच काहीतरी नावाचा फोन वापरला. अतिशय उत्तम. पण micromax नकोच!!!

कधीची गोष्ट आहे मुग्धानंद? मी मायक्रोमॅक्स वापरलाय. ब्रॅन्डपॉवर सोडून बाकी सगळं आहे त्यांच्याकडे. गेल्या वर्षापासून चांगली मुसंडी मारलीये मार्केटमध्ये. ईन्टरनॅशनल मार्केटमध्येही उअतरले आहेत असं कळतय.

शिवाय मित्राने वापरलाय A75. आवडलाय त्याला.

झॅक्स, मला स्वतःला मी वापरत असलेला सामसुंग अजिबात आवडला नाही. बेसिकमध्ये राडा आहे.
उदा. फोनबुक सर्च करताना फक्त 'नाव' वापरता येतं, आडनाव नाही. दोन्हींसाठी वेगवेगळी फिल्डस् वापरलेली असूनही.... रीयली अंडरयूज्ड. Sad अगदी प्रायमरी फोन्समध्येही नंबरवरुन नाव शोधण्याची सुविधा असलेली आठवत्येय.

दुसरं म्हणजे म्युझिक प्लेयर अगदीच बेसिक आहे.

फारसा कस्टमायझेबल नाहीये. शिवाय अ‍ॅन्ड्रॉईडच्या प्रेमात पडलोय Blush

मताचं स्वगतच आहे मुग्धानंद, त्यामगची कारणं जाणण्यासाठी तर प्रश्न विचारतोय. Happy

९ - १० हजाराची रिस्क घेतोय Happy दुकानदार नेहमीचा आहे. त्यानेही ग्रीन सिग्नल दिलाय. नेटवरतीही चांगले रीव्ह्यूज आहेत.

तरी आठवडा दोन आठवडे ढकलेनच.

१० हजाराच्या आसपास चांगले नेट कनेक्शन स्पीड देणारा, बर्‍यापैकी स्क्रीन, व मराठी साईट अगदी नीट पाहु शकतो असा मोबाईल सुचवा. शक्यतो फक्त टच स्क्रीन नकोये. ब्लॅकबेरीवर नेट मस्त चालते असे पाहिल्ये पण मराठी चालते का?
वरील चर्चा पण वाचत आहे. Happy
बागुलबुवा, तुम्ही घेतला की अनुभव सांगा.

मोनालिप (मुके ओठ ?) Light 1

बर्रेच माबोकर मोबायलावरुनच नेटतात हल्ली. आनंदमैत्री हजर व्हा आणि आपले अनुभौ मांडा.

बाबु मायक्रोमॅक्स मित्राचा हाताळुन बघ.
वापरुन बघ. आवडला तर घे. Happy

बेसिक अ‍ॅन्ड्रॉइड फोन मध्ये एच टि सीच घ्या अस माझं मत आहे. (८००० ते ९००० च्या रेन्ज मध्ये शोधत असाल तर)

बागुलबोवा , नम्बरवरून सॅमसंग मध्ये सर्च मारायचा असेल तर थेट डायलर ओपन करा जसजसे नम्बर टायपाल तसतशी नावे येत जातात. दोन तीन नम्बर कुठलेही पहिले, मधले, अथवा शेवटचे टाइप करा नावे येतात. एकापेक्षा अधिक नावे असतील तर एकूण नावांची संख्या येते व संख्यखाली ड्रोप्डाऊन मेन्यु त्रिकोणाच्या रूपात दिसतो. तो स्प्रेड करून हवे ते नाव निवदा व लग्गेच तिथेच डायल करा....

तुम्ही आयफोन चा ही विचार करू शकता की... सध्या भारतात ३जीएस, २०९०० ला लीगल, अनलॉक्ड पीस अवेलेबल आहेत. कुठल्याही नेटवर्क वर, कुठलंही सिम घालून चालतो. Happy

Pages