सास बहु मंदिर

Submitted by मी अमि on 12 August, 2012 - 00:31

करुणाने जेव्हा मला सांगितले की आपल्याला सास बहु मंदिरात जायचे आहे, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एकता कपूरच्या सास बहु चमकून गेल्या. Happy

माझा जुना सहकारी मनिष आणि त्याची पत्नी करुणा सध्या ग्वाल्हेरमध्ये स्थायिक आहेत. त्यांना भेटायचा योग मध्ये आला होता. आमच्या हातात फक्त अर्धा दिवस होता. आग्र्याहून कारने जवळ जवळ १० वाजता ग्वालियर जवळच्या मुरैना य ठिकाणि पोचलो. ( पान सिंग तोमर पाहताना लक्षात आले की तो पान सिगचा एरिया आहे :))चहापानानंतर करूणा म्हणाली की, आपण सास बहु मंदिर आणि ग्वाल्हेर फोर्ट पहायला जाऊ. माझ्या मनात आले की, सास बहुचे मंदिर काय पहायचे? पण नंतर विचार केला की नक्कीच काहितरी मजेशीर प्रकार असावा.

तुम्ही एखाद्या गोष्टीची मनात काहीतरी प्रतिमा तयार करता आणि सत्य जेव्हा त्याच्या अगदी टोकाचे विरुद्ध असते तेव्हा तुम्हाला जे वाटलं असेल ना तेच माझ्या बाबतीत झालं. सास बहु मंदीर हा एक अतिशय सुखद धक्का होत.

'सास बहु मंदिर' या परिसरात दोन मंदिरे आहेत. पहिले मंदिर :

photo0082.jpg

पुढे गेल्यावर दुसरे मंदिर दिसते
photo0083.jpg

दोन्ही मंदिरे अतिशय प्राचिन असून कोरीवकामाचा उत्कॄष्ट नमुना आहेत.
photo0084.jpgphoto0085.jpgphoto0086.jpgphoto0088.jpgphoto0089.jpg

शिवाची कोरीव प्रतिमा, त्यावर देवदूतही दिसत आहेत

photo0090.jpgphoto0092.jpg

पायर्‍याजवळील दगडी कोरीव काम
photo0093.jpgphoto0094.jpg

छतावरील कोरीव काम
photo0096.jpgphoto0097.jpg

आणखी काही कोरीव काम
photo0098.jpg

तिथे हा शिलालेख आढळला:
photo0101.jpg

फोटो मोबाईलने घेतले असल्याने खुप चांगले नाहीत. पण यावरून या वास्तुंच्या सौदर्याची तुम्हाला कल्पना यावी हा उद्देश आहे. या दोन्ही वास्तुंची नीट निगा राखली जात असावी असे वाटले नाही. मंदिराच्या बाह्या भागातच जेवढे फोटो घेता आले तेवढे घेतले कारण आत वटावाघळांची दुर्गंधी पसरली होती.

दुपारच्या विमानाने मी मुंबईला परत आले. पण सासबहु मंदिराबद्दलचे कुतुहल काही डोक्यातून जात नव्हते. म्हणून नेटवर शोधाशोध सुरू केली. तेव्हा कळले की 'सास बहू' हा सहस्त्रबाहू या शब्दाचा अपभ्रंश आहे. Happy

अवांतरः मुरैना इथे बनणारी गज्जक अतिशय चविष्ट असते. त्याचे टेक्चर वेफर बिस्किटसारखे असते.... म्हणजे थरयुक्त आणि अतिशय क्रिस्पी. मनिषने आम्हाला मुरैना इथे पिक करून ग्वाल्हेरला नेले. त्यामुळे ही दोन्ही ठिकाणे एकमेकांना लागुनच असावीत. म्हणजे ग्वाल्हेरला मुरैनाचे गज्जक मिळत असावे. ग्वाल्हेरला गेल्यास हे गज्जक जरूर खावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहेत फोटो, पण या दोघी कोण, कुठल्या ?

आणि इथले दर्शन झाल्यावर, सास बहुंचे चांगलेच पटते, असे काही आहे का Happy

जिप्सी, मी पहिल्यांदाच इतके फोटो टाकले आहेत. ते अपलोड होत नव्हते म्हणून लहान करून टाकलेत.

दिनेशदा, आणखी काही फोटो टाकलेत आणि सास बहू कोण आहेत तेही लिहिलय पहा Happy

मी देखील हे देऊळ पाहिले आहे. याचे मूळ संस्कृत नाव सहस्त्रबाहू म्हणजे विष्णुचे म.दिर आहे. असे एक देऊळ उदयपूर जवळही आहे, ते ही मी पाहिले आहे/ बोलीभाषेत याचा अपभ्रंश 'सासबहू' असा झाला आहे

छान!

फोटो थोडे मोठे असते तर अजुन मस्त वाटले असते.... माहिती शेयर केल्याबद्द्ल धन्यवाद!
असे एक देऊळ उदयपूर जवळही आहे,>>>> रेव्यु, उदयपूर जवळचे देवरानी जेठानी मंदिर पाहिले आहे सास-बहू मंदिर पण आहे का तिथे?

गेल्याच आठवड्यात पाहुन आले सासबहु मंदिर. उदयपुर वरुन एकलिंगजीला जाताना रस्त्यातच आहे ते.
एकलिंगजी पासुन साधारणपणे ७ ते १० किमी. खुपच स्वच्छता आणि शांतता होती. जवळच एक मोठे तळे आणि त्यात बरीच कमळे. मस्तच अनुभव होता तो. मंदिराची मांडणी आणि कलाकुसर जवळपास वरील मंदिरांसारखीच होती. तिकडे गेलात तर चुकवु नये असेच ठिकाण आहे ते.

एक गोष्ट इथे लिहायची राहून गेलीय. कोरलेल्या जवळ जवळ सर्व मुर्त्यांचे चेहरे नष्ट करण्यात आले आहेत. अतिक्रमणांचा परिणाम असावा असे त्या शिलालेखांवरुन वाटत आहे. Sad