Submitted by बयो on 9 August, 2012 - 06:53
पाऊस गच्च धारांचा
पाऊस कच्च झाडांचा
त्याच्या तिच्या मनातल्या
टपटप पागोळ्यांचा...
पाऊस अवखळ मनाचा
पाऊस अल्लड वयाचा
थेंबाथेंबातून नाचून
थरारलेल्या नभाचा...
पाऊस भिजल्या पापणीचा
पाऊस थकल्या डोळ्यांचा
वाट पाहता पाहता
निजल्या उदास रातीचा...
पाऊस चिंब रानाचा
पाऊस व्याकूळ प्राणाचा
दूरच्या गूढ वाटेसारखा
माझाही एकटेपणाचा...
-स्मिता
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.. पण ड्ब्बल ड्ब्बल.
छान.. पण ड्ब्बल ड्ब्बल.
आवडलीच! पुलेशु
आवडलीच!
पुलेशु
वा छानच ............दोनदा
वा छानच
............दोनदा प्रकाशित झालीय ही कविता !
नितांतसुंदर !
नितांतसुंदर !
सुरेख....
सुरेख....
मस्तं... आवडलीच.
मस्तं... आवडलीच.
धन्यवाद सुधाकर, रीया, वैभव,
धन्यवाद सुधाकर, रीया, वैभव, अमित, योगुली, दाद.
नेट गडबडीमुळे दोनदा प्रकाशित झाली. कशी डिलीटू एक कविता, कुणी सांगेल काय मजला?
खूप छान
खूप छान
छानच!
छानच!
बयो म्हटल्यावर धावत आलो. मी धाकट्या बहीणीला लाडाने बयो म्हणतो.