"हुस्न-ए-कश्मीर" (६) — सोनमर्ग

Submitted by जिप्सी on 10 August, 2012 - 01:20

बर्फीली सर्दियों में किसी भी पहाड़ पर
वादी में गूंजती हुयी खामोशियाँ सूने
आँखों में भीगे भीगे से लम्हे लिए हुए
दिल ढूँढता है, फिर वही फुरसत के रात दिन....

"सोनमर्ग" म्हणजे सोन्याचे कुरण. काश्मिर भटकंतीत मला सर्वात जास्त आवडलेले ठिकाण. कश्मिरमधील स्वर्ग अनुभवला तो इथेच.कदाचित वरील काव्यपंक्ती गुलजारने इथेच लिहिल्या असाव्यात. Happy मलाही माझ्या आयुष्यातील फुरसत के काही दिन इथे व्यतित करायला नक्कीच आवडेल. सभोवती बर्फाच्या भव्य पहाडी आणि "त्यात ऐकु येणारी खामोशी" याचे वर्णन करण्यापेक्षा अनुभवण्यातच जास्त मजा आहे. काश्मीर व्हॅलीतील मोठी साठ मैल लांबीची नदी सिंध नल्लाह (सिंधू नदीची उपनदी) नावाने ओळखल्या जाणार्‍या या खळाळत्या नदीच्या काठाकाठाने जाणारा प्रवास म्हणजे स्वर्गात जाणारी वाटच जणु. पुन्हा पुन्हा भेट द्यावी अशीच हि जागा.
प्रचि ०१

=======================================================================
=======================================================================
या मालिकेतील आधीची प्रवासचित्रे. Happy
१. "हुस्न-ए-कश्मीर"
२. राजधानी दिल्ली - कुतुबमिनार

३. "राजधानी दिल्ली"
४. "हुस्न-ए-कश्मीर" (१) — श्रीनगर (दल सरोवर)
५. "हुस्न-ए-कश्मीर" (२) — मुघल गार्डन्स
६. "हुस्न-ए-कश्मीर" (3) — गुलमर्ग
७. "हुस्न-ए-कश्मीर" (४) — अवंतीपुर
८."हुस्न-ए-कश्मीर" (५) — पहलगाम
=======================================================================
=======================================================================
श्रीनगरहुन अंदाजे ९६-९८ किमी अंतरावर लेह-लडाखच्या रस्त्यावर सोनमर्ग वसले आहे. सारा प्रवास हा निसर्गाच्या सान्निध्यात होतो. अमरनाथ यात्रेचे "बाल्टाल" हे ठिकाण सोनमर्गपासुन अंदाजे १० किमी पुढे आहे.
सोनमर्गपासुन सुमारे ४-५ किमी अंतरावर निसर्गाची किमया "थाजिवास ग्लेशिअर्स" आहे. येथे पायी चालत किंवा घोड्यावरून जाता येते. घोडेवाल्यांशी इथे मात्र जबरदस्त घासाघीस करावी लागते. Happy सुरूवातीला त्यांनी आम्हाला १८०० रुपये प्रतीमाणशी सांगितले पण तेच घासाघीस केल्यानंतर ३०० रूपये प्रतीमाणशी झाले. Happy अर्थात त्यांची (आणि घोड्यांची) ती मेहनत, तो खडतर रस्ता पाहून आम्ही वर अजुन काही रूपये दिले. इथली माणसं खरंच खुप प्रेमळ आहेत. पर्यटकांची व्यवस्थित काळजी घेतात (घोड्यावरून जाताना :फिदी:). इथे आल्यावर पाऊस सुरू झाल्याने कॅमेरा बॅगेत ठेवला त्यामुळे जास्त काही फोटो काढता आले नाही. थाजिवास ग्लेशिअर्सला जाताना ही भरपूर पाऊस असल्याने कॅमेरा बॅग तेथील एका झोपडीवजा हॉटेलात ठेवून ग्लेशिअर्स पाहुन आलो. मस्त भुरभुरणारा पाऊस, बाजुला वाहात जाणारे खळाळले झरे, समोर बर्फाचा डोंगर आणि हातात गरमागरम कॉफीचा कप. अशा वातावरणात जर कुणी सोनमर्गच्या प्रेमात पडला नाही तर नवलच. Happy
=======================================================================
=======================================================================
सोनमर्गच्या वाटेतील झेलम नदीवरचा पूल
प्रचि ०२
सिंध नल्लाह नदी
प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
ग्लेशिअर्स
प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
स्वर्गीय सौंदर्य
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

=======================================================================
=======================================================================
(क्रमशः पुढिल "अंतिम" भागात "फ्लॉवर्स ऑफ कश्मिर")

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी, तुझ्या फोटोंबद्द्ल काय बोलायचं?

दिनेशदा, तुम्ही एवढे जग फिरून येता आणि आपल्या देशातल्या काश्मिरला भेट देऊ शकत नाही ? आश्चर्यच आहे ! Happy . खरंच आहे काश्मिरहून येताना फार फार वाईट वाटतं.

जिप्स्या .....पहिल्याच फोटोत दिल खुश केलास यार...कसला कडक फोटो आलाय.....:)
बास्स......
पण पहिल्याच फोटोत अपेक्षा जोरदार उंचावल्याने नंतरचे फोटो चांगले असूनही ठसा नाही उमटला...

८, ११ मस्त

सुंदर.

गुलजारजींच्या त्या ओळींनी भुरळच घातली अगदी....
त्यापुढील वर्णन व प्र चि दोन्हीही उत्तमच......
हे सर्व फोटो बघताना आपण तिथेच आहोत असं वाटतंय.......

सुं द र!!!!!!!!!!!!!!!!!! अजून तारीफ लिहायची आहे पण शब्द नैत पुरेसे..
इमॅजिन करून घे रे जिप्स्या Happy