घराचे नाव

Submitted by सुनिता on 9 August, 2012 - 03:49

घर तर बांधून झाले. आता त्याचे नामकरण करायचे आहे.
तर घराचे नाव ठरवताना घ्यावयाची काळजी काय घ्यावी ? व कशी घ्यावी ?
अक्षर स्टील ची असावीत की कास्टींग ची ?
या संदर्भातील प्रश्न या धाग्यावर विचारावेत.

(मायबोलीकरांनी सुचवलेली घरांची / बंगल्यांची मुख्य यादी इथे संकलीत आहे : वेमा)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिंपरी चिंचवड मध्ये असे कोणी घराचे नाव कास्टींग करणारे किंवा वेगळ्याप्रकारात देणारे आहेत का ? असल्यास पत्ता / फोन नं मिळेल का ?

सुनितातै

घराचे फोटो टाका इथे. नाव कुठे लावण्याचे निश्चित केलेय, रंग कुठला आहे हे कळल्याशिवाय काहीच सांगता येणार नाही. तुम्हाला लकी असलेले नाव, अक्षर, मानत असल्यास तुमच्या गुरुंनी सुचवलेले नाव असं काही निश्चित केलंय का हे ही लिहा. खूप जण आद्याक्षर काढून आणून त्यावरून नाव निश्चित करतात.

तुम्हाला आवडेल तेच नाव तुम्हाला आनंद देत राहील. मात्र श्रमसाफल्य हे नाव टाळाच Happy

( अलका जवळ कोहिनूर आर्टस प्रसिद्ध आहे. बंगल्यांच्या नावांसाठी)

'या'.

घराचे नाव 'स्वामी' असे देण्याचे निश्चित केले आहे. पण ते कोणत्या मटेरीयल मध्ये द्यावे असा प्रश्न आहे.

सुनिता

भिंतीच्या रंगावर कुठले मटेरियल उठून दिसेल ? पांढ-या भिंतींवर स्टीलची अक्षरे उठून दिसणार नाहीत. सरळ पॉवर पॉईंटमधे वर्ड आर्टच्या सहाय्याने वॉलकलर वर कुठली अक्षरे उठून दिसतील हे पहावे.

आजकाल प्लास्टिकची अक्षरे असतात. पावसापाण्यात खराबही होत नाहीत अन उन्हाने रंगही जात नाही. तुलनेने स्वस्तही आहेत.

सुनिता,अभिनंदन.

एक टाइल्स चा पर्याय देखिल आहे. नावाच्या स्पेलिग च्या चौकोनी टाइल्स वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये मिळतात. सुरेख दिसते.

सुनिताजी,
अक्षरे बनवून ती घरावर लावून देणे अशी कामे करणारे लोक वेगवेगळ्या शहरांत असतात. कुण्या दुकानावर, इमारतीवर अक्षरे दिसलीत तर तिथे कुठून बनवून घेतलीत असे विचारा. पत्ता/फोन मिळेल. पिंपरी चिंचवडमधील कुणाची अशी माहीती मला नाही, सबब क्षमस्व.

सर्वांना धन्यवाद. काल स्टारबजार मध्ये गेले होते. तिथे अशा प्रकारची नावे देण्याचे एक खास दालन आहे. तिथुन माझे काम होईल असे वाटते.
ईब्लिस अशा ठिकाणी विचारले होते पण त्यांनी दिलेला नंबर अस्तित्वात नाही असे उत्तर येते म्हणून ईथे विचारले. प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

घरासाठी नाव
सौख्य
स्नेह
डोंगर आणि समुद्र ह्याचे कॉम्बिनेशन>>
गिरीजा
गिरीराज
गाज

Kiran.
झालं कि नाही फायनल ?
पुण्यात नाव ठेवणारे सापडू नयेत ? >>>>>+++१११११११