ऑफलाईन लेखन 'बरहा'मध्ये कसे कराल?
'ऑनलाईन' असताना 'मायबोली'त लेखन कसे करायचे, ते आपण इथे- http://www.maayboli.com/node/9728 पाहिले. आता 'ऑफलाईन' लेखन कसे करायचे ते पाहू.
विविध मराठी फॉन्ट आपल्याला उपलब्ध आहेत, जसे की 'मंगल', 'गार्गी' इत्यादी, जे वापरून आपण वर्डपॅड किंवा नोटपॅडमध्ये मराठीत लिहू शकतो. 'बरहा' हे सॉफ्टवेअर वापरूनही मराठीत उत्तम प्रकारे लिहिता येतं.
'बरहा'त कसे लिहायचे हे पायरीपायरीने पाहूया-
१) बरहा लिहिण्यासाठी 'बरहा' सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे लागते. www.baraha.com वर टीचकी मारा. तिथून बरहा संगणाकावर डाऊनलोड करा..
हे एकदा डाऊनलोड केलेत, की इतर कोणताही मराठी फॉन्ट नसला, तरी मराठीमधून लिहू शकाल.
२) या स्क्रीनशॉटमध्ये क्रमांक २ वर Download Baraha Unicode, BarahaPad, BarahaIME असे दिसत आहे. हेही अतिशय उपयुक्त आहे, आणि तेही संगणकावर उतरवून घ्या.
३) आता डेस्कटॉपवर 'New Baraha Document', 'Baraha IME' असे icons दिसायला लागतील. यातले 'Baraha IME' सुरू केलेत, की मराठी लिहायला सुरू होईल.. मग अचानक, ऑफिसच्या इन्ग्रजी वर्ड डोक्यूमेन्टमध्ये जन्क दिसायला लागेल ही बरहा आयएमईची कमाल. हे सुरू केलेत, की तुमचा डीफॉल्ट फॉन्ट मराठी होतो, त्यामुळे सगळीकडे वेगळेच काहीतरी दिसू लागते
हे disable करण्यासाठी f11 ही कळफलकावरची कळ दाबा, म्हणजे इन्ग्रजी हे इन्ग्रजीतच लिहाल. मराठीत लिहायचे असल्यास, परत f11 दाबा.. f11 हे इन्ग्रजी-मराठी टॉगल स्विच असल्यासारखे आहे 'बरहा'तले.
४) 'नवीन बरहा डॉक्यूमेन्ट' उघडलेत की ऑफलाईन मराठीत लिहायला सुरूवात करता येईल. यासाठी बरहा आयएमई मात्र बन्द ठेवा. फक्त हे नवीन डॉक उघडा. उघडलेत की असे दिसेल-
नवीन बरहा डॉक हे दोन भागात विभागलेले असते. यातला खालचा भाग आहे, ज्यात आपण इन्ग्रजीत लिहायचे असते. जिथे लाल गोल केला आहे, ते बटण दाबले, की वरच्या भागात त्याच इन्ग्रजी मजकूराचे मराठीकरण होईल.
त्याच बारमध्ये सर्वात शेवटी '?' हे चिन्ह दाबलेत, कि 'हेल्प', अर्थात मदत मिळेल. त्यात 'Transliteration Rules' आहेत. त्यात मराठी शब्द लिहिण्यासाठी कोणते इन्ग्रजी अक्षर वापरायचे हे दिलेले आहे..
'मायबोली'मध्ये आपण लिहितो, तसेच ९९% लिहायचे आहे, पण काही अक्षरे जबरदस्त बुचकळ्यात पाडतात, म्हणून इथे मला अवघड वाटलेली आणि त्या नियमांमध्येही न सापडलेली काही अक्षरे देते..
अ) रफार द्यायचा असेल, तर कळफलकावरचे '^' चिन्ह द्या.. उदा. 'वार्यावरची वरात' लिहायचे असेल, तर बरहात ते vaar^yaavarachee असे लिहा.. दिसताना ते 'र'चा पाय मोडल्यासारखे दिसते, पण पब्लिश केल्यानंतर बरोबर दिसते. मात्र, ते लिखाण मायबोलीत पेस्ट केलेत, तर 'र'चा पाय मोडलेलाच रहातो मायबोलीच्या नियमाप्रमाणे vaaRyaavarachee असे केलेत, की तेही ठीक होते.
ब) सर्वात छळतो तो 'ज्ञ'! हे अक्षर बरहात शोधायला फार कष्ट घ्यायला लागतात बरं 'ज्ञानेश्वर' लिहायचे असेल तर चक्क 'j~jaaneshwar' असे लिहा. थोडक्यात, ज्ञ=j~j
क) अनुस्वार Mने द्यायचा, .n बरहात चालत नाही.
ड) k~ap k~ep = कॅप
k~op= कॉप
k~Mp= कँप
kA~Mp= काँप
बाकी, काना, मात्रा, वेलांटीचे नियम 'मायबोली'प्रमाणेच.
५) हे लेखन सेव्ह करा. वरच्या भागात जे मराठी झालेलं लेखन आहे, ते तसंच्या तसं मराठी (युनिकोड) सपोर्ट करणार्या कोणत्याही संकेतस्थळावर पेस्ट करू शकता- जसं ब्लॉगवर, मायबोलीवर वगैरे.
आधी म्हटलं तसं, सतत ऑनलाईन राहता येणं शक्य नसेल, तर बरहात लिहून सेव्ह करून, एकदमच लिखाण पूर्ण करून ते प्रकाशित करू शकता.
लिहिते व्हा,
शुभेच्छा.
त्यात एक आयडिया लढवायची- १५ला
त्यात एक आयडिया लढवायची- १५ला नवा धागा उघडून जुने त्यात पेस्ट करायचे. मग ते त्या दिवशीच्या नवीन लेखनात दिसतं >>>>>ओक्के
हे मस्त आहे.
हे 'बराहचे सोफ्टवेअरसाठी'
हे 'बराहचे सोफ्टवेअरसाठी' पैसे मोजावे लागतात काय?
बराह डाऊनलोड केले इन्स्टऑल
बराह डाऊनलोड केले इन्स्टऑल केल
सर्व झाले पण थोडे लिखान केले की विकत घेण्यासंबंधी मॅसेज येतो. आणि बराह बंद पडते नेहमी करीता फ्री बराह नाही काय?
पूर्वी "बरहा" विनामुल्य
पूर्वी "बरहा" विनामुल्य उपलब्ध होते, आता मात्र सलग लिखाण करण्याकरता ते विकत घ्यावेच लागते. अन्यथा पाच मिनिटाच्या कालावधी नंतर तुम्ही वर लिहलेला "संदेश" सतत येतच रहणार.
धन्यवाद विजय !
धन्यवाद विजय !
मी ’गमभन’चे ऑफलाईन व्हर्जन
मी ’गमभन’चे ऑफलाईन व्हर्जन वापरतो ऑफलाईन लिहिण्यासाठी. ते वापरुन थेट मायबोलीवर लिहीतो त्याच पद्धतीने लिहीता येते. बरहासाठी वापरल्या जाणार्या क्लुप्त्या वापरण्याची गरज पडत नाही.
आणि हे देखील मोफत उपलब्ध आहे.
http://www.gamabhana.com/?q=node/3
तुम्ही जर फायरफॉक्स वापरत असाल, तर गमभनचे फायरफॉक्स एक्स्टेंशनदेखील उपलब्ध आहे.
http://www.gamabhana.com/?q=node/32
फुकटचे बरहा हवे असेल तर हे
फुकटचे बरहा हवे असेल तर हे घ्या...ऑनला/ऑफला हवे तसे वापरू शकता.
https://docs.google.com/file/d/0B5kQcMTmbC1QYTcxYTc3MjUtNzM3YS00ZDYyLWEz...
गूगलचे जीपॅडही उपलब्ध आहे.
गूगलचे जीपॅडही उपलब्ध आहे.
धन्यवाद विशाल, देव काका एरर
धन्यवाद विशाल, देव काका एरर दाखवत आहे ते
मुक्तेश्वरा, एकदा रिसेंट
मुक्तेश्वरा,
एकदा रिसेंट व्हर्जन इन्स्टॉल केली की जुनी त्रास देते. फार्म्याट मार्लात तर चालेल ते. जुने बराहा सुंदर आहे.
गूगलचे ऑनलाईन व्हर्जन :
गूगलचे ऑनलाईन व्हर्जन : http://www.google.com/transliterate/marathi
हेच सॉफ्टवेअरस्वरूपात येथून उतरवून घेता येईल : http://www.google.com/inputtools/windows/index.html
मुक्तेश्वरा, आधी तुझे ते
मुक्तेश्वरा, आधी तुझे ते विकतचे व्हर्जन अॅड-रिमूव्ह प्रोग्राम्समध्ये जाऊन काढून टाक आणि मग मी दिलेले बरहा चालवून पाहा.
नंद्या, धन्यवाद. मस्त चालतेय
नंद्या, धन्यवाद. मस्त चालतेय ते गुगलचे सॉफ्टवेअर
मुख्य म्हणजे वर्ड, एक्सेल, सगळीकडे चालतेय. धन्स रे 
जुने बराहा सुंदर आहे.>>> अगदी
जुने बराहा सुंदर आहे.>>>
अगदी , माझ्याकडचे बरहा ७ मी जपुन ठेवले आहे. कधी कधी गमभनला पर्याय म्हणुन मी ते वापरतो.
धन्यवाद सर्वांना विशाल गमभन
धन्यवाद सर्वांना
विशाल गमभन चालुकेले लिखाने केले सेव्ह केले पण ते वाहुन गेले दिसत नाही काही ईलाज !
गमभन कसे इन्स्टॉल करायचे?
गमभन कसे इन्स्टॉल करायचे? त्या लिंकवरुन घेतले, पण त्यात क्लिक केले तर काही होत नाही.
अ आ औ ऑ हे बराहात जमते पण
अ आ औ ऑ हे बराहात जमते पण ’अ’ला इकार उकार वगैरे लावायला जमले नाही.
अ आ अशी बाराखडी कशी लिहायची ? ते बराहात किंवा इतर कोठे करता येते का?
बाकी देवनागरीसाठी बराहा वरदानच आहे.
मुकु, गमभन (ऑफलाईन) मला वाटते
मुकु, गमभन (ऑफलाईन) मला वाटते फक्त आय.ई. वर वापरले असता सेव्ह करता येते.
सेव्ह अॅज .html करावे लागते, डॉक फाईल सेव्ह होत नाही.
शेळी, गमभन इंस्टॉल करावे लागत नाही. फक्त ती झीप फाईल अनझीप करुन घ्या. त्या फोल्डरमध्ये index.html म्हणुन एक फाईल असेल. तिच्यावर क्लिक केले की गमभनचे पान उघडते. फारतर त्यावर राईट क्लिक करुन सेंड टु डेस्कटॉप करुन ठेवा, म्हणजे प्रत्येक वेळी फोल्डर शोधत बसावा लागणार नाही.
"वार्यावरची वरात" आणी
"वार्यावरची वरात" आणी ज्ञानेश्वराकरिता धन्यवाद अद्याप क्ष कसा लिहायचा हे समजले नाही. इतकी छोटी अपेक्शा पुर्ण करा.
"वार्यावरची वरात" आणी
"वार्यावरची वरात" आणी ज्ञानेश्वराकरिता धन्यवाद अद्याप क्ष कसा लिहायचा हे समजले नाही. इतकी छोटी अपेक्शा पुर्ण करा.>> बरहात का?
क्ष= kSha
अपेक्षा= apekShaa
गमभन/ गूगलवर कसं लिहीतात, कल्पना नाही.
बरहा त वर हेल्प आहे. तिथे
बरहा त वर हेल्प आहे. तिथे क्लिक केले तर सगळे उच्चार समजतील.
गमभन/ गूगलवर कसं लिहीतात,
गमभन/ गूगलवर कसं लिहीतात, कल्पना नाही.>>>
गुगलचं माहीत नाही, पण गमभन ड्रुपलवरच आधारीत असल्याने मायबोलीवर आपण जसे लिहीतो अगदी तसेच आहे. काहीही फरक नाही.
श्रीलिपी असेल तर कसे टाईप
श्रीलिपी असेल तर कसे टाईप करावे ?
बरहात टायपून वर्डात घातले तर
बरहात टायपून वर्डात घातले तर अक्षरे फुटतात. काय करावे?
एवढा खटाटोप करण्यापेक्षा
एवढा खटाटोप करण्यापेक्षा 'मायबोली' चा फाँट आणि सॉफ्ट-वेयर ही लोकं 'ऑफ लाईन' करता का उपलब्ध करून देत नाहीत? सशुल्क अर्थातच चालेल.
>>>> बरहात टायपून वर्डात
>>>> बरहात टायपून वर्डात घातले तर अक्षरे फुटतात. काय करावे?
रघु नावाचा फॉण्ट इन्स्टॉल्ड असेल तर तो काढून टाका.
पेस्ट स्पेशिअल करुन बघा
बाकि माहित नाही. पण पुढील सेटीन्ग्ज केली तर हा प्रॉब्लेम येऊ नये.
रिजनल सेटिन्ग्ज मधे लॅन्ग्वेज सेटींग मधे पहिला चौकोन (थाई सहित भाषान्चा) सिलेक्ट केला (ते करताना XP सिस्टिम डिस्क मागते) अन एरिअल युनिकोड अथवा मन्गल फॉण्ट इन्स्टॉल्ड असेल तर बरहा वापरुन युनिकोड मधे लिहीता येते असे मला नुकतेच कळले.
हे असे वर्डमधेही युनिकोडमधेच लिहीता येते, अन ते मायबोलीवर, अथवा मायबोलीवरील वर्ड मधे वापरता येते.
नॉर्मली, वरील सेटीन्ग नसताना, बरहा डायरेक्ट वापरून वर्डमधील लिखाण अॅन्सीफॉर्म मधे होते, तर एचटीएमेल बेस्ड युटीलिटीज मधे युनिकोड मधे करता येते. बरहा स्वतःच्या विन्डो वरील लिखाण "माझ्यामते" युनिकोड बेस्ड आहे, ते वर्ड मधे आणताना, एक तरी युनिकोड फॉण्ट इन्स्टोल्ड हवा, तर ते व्यवस्थित न तुटता दिसते असा माझा अनुभव आहे.
कृपया जाणकारांनी खुलासा करावा
Pages