रूपगर्विता

Submitted by मोहन वैद्य on 28 July, 2012 - 10:56

चालतेस झोकात अन डौल तुझा न्यारा
हिंदकळते वेणी यौवन शिडात भरला वारा

जपून टाक पाउल शर्मिली
माझे काळीज असेल खाली

घायाळ मम काळीजाची तमा कुठे तुजला
चकाकणार्‍या वीजेस काय कोण कुठे जळला

भरभरुनी दान रमणी निसर्गाने तुज दिले
साठविण्या मज त्याने अक्ष दोनच दिले

आतुरले नयन माझे एका कटाक्षास
तोही चोरीसी ठेवी रिते माझे अक्षास

ढिल दिलेल्या पतंगा परी
जाशी जरी दूर दूरवरी

पण प्रेम लावले गळाला, तरी
मत्स्यगंधे माझी होशील लवकरी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रूपगर्वितेला केलेलं आर्जव चांगलं वाटलं.

वृत्त हाताळणीत अधिक सफाईदारपणा असता तर अधिक प्रभावी झाली असती असे वैम.

उल्हास भिडे,
शाळेत व्रुत्त शिकुन ४० वर्ष झाली. आता नीट आठवत नाहीत.
पण आपल्या सूचनेचा नक्की विचार करीन. धन्यवाद.