आपल्यापैकी बरेचसे लोक असे असतील कि ज्यांचा एकही दिवस मायबोलीला भेट दिल्याशिवाय जात नसेल. व्यस्त कामातुन थोडावेळ का होईना मायबोलीवर येऊन, येथील विविध विभागांना भेट देऊन, प्रतिसाद देऊन जाणारेहि बरेच आहेत. खरोखर मायबोली म्हणजे एक न सुटणारे व्यसनच.
आपणही बर्याचवेळा मायबोलीवर येऊन लेख, प्रचि, कविता, ललित इ. इ. काहि ना काहि लिहत असतोच. किंवा एखाद्या आवडलेल्या लिखाणावर/प्रचिवर आपले प्रतिसाद देत असतो.
अशा विविधप्रकारे मायबोली सर्व्हर वर थोडा ताण वाढण्यास आपण कारणीभूत असतो. मध्येच कधीतरी मायबोली द्रुपालच्या स्वरूपात आपला राग प्रकट करते.
पण यासाठीच तर आम्ही मायबोलीवर येतो ना...
मान्य आहे, आपले लिखाण/प्रचि सगळ्यांपर्यतं पोहचवण्यासाठी, इतर लिखाण वाचण्यासाठी.प्रतिसाद देण्यासाठीच तर आपण मायबोलीला भेट देतो.
मग सर्व्हरवरचा ताण थोडातरी कमी करण्याकरीता मी काय करू शकतो?
हा ताण कमी करण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलु शकतो. फक्त एकच करायचे तुमची विपु तपासायची. त्यात कमीत कमी १०-१२ पान तरी असतील कुणी ना कुणी विचारपुस केल्याची. उदाहरणार्थ, माझ्याच विपुमध्ये जाने. २०१० पासुन आतापर्यंत एकुण ४३ पाने आहेत. एका पानावर साधारण २५ प्रतिसाद. सर्व पानांवरचे मिळुन १०७५ प्रतिसाद. एखाद्या बाफ/बीबी वर १००० च्या वर प्रतिसाद गेले असता अॅडमिन तो बाफ/बीबी बंद करून त्याचा पुढे दुसरा भाग चालु करण्यास सांगतात. तेंव्हा आपल्याला फक्त एकच करायचे आहे कि आपआपल्या विपुचे बॅकअप घेऊन ते डिलीट करायचे.
प्रामाणिकपणे सांगा आपल्यापैकी कितीजण ५-६ महिन्यापूर्वीचे विपु चेक करतात? जर नीट पाहिले असता बरेचसे विपु हे सणाच्या शुभेच्छांचे असतात ते तर आपण नंतर कधी पाहतही नाही.
"बॅकअप" घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचे?
एकदम सोप्पं आहे. यासाठी तुम्हाला फक्त अर्धा किंवा एक तास द्यावा लागेल.
१. आपआपल्या विपुत जाउन एक एक पेज ओपन करून ते html मध्ये सेव्ह करायचे (File -> Save As). जर तुम्ही Internet Explorer 8 वापरत असाल तर तुमची फाईल .mht म्हणुन सेव्ह होईल. (यात .htm फाईल आणि ग्राफिक फोल्डर असे सेव्ह न होता एकच फाईल सेव्ह होईल). उदा. माझ्या विपुतले ४३ पेज मी एक एक ओपन करून page_1.mht असे ४३ पेज सेव्ह केले आहेत (यासाठी मला फक्त २० मिनिटे लागली) आणि जर तुम्ही Internet Explorerचे lower version वापरत असाल तर .htm सेव्ह करताना Encoding मध्ये Unicode (UTF-8) जरूर सिलेक्ट करा. या प्रकारे जितकी विपुत पाने तितके तुमचे .mht/.htm फाईल सेव्ह होतील किंवा तुम्ही एक एक पेज उघडुन थेट प्रिंट कमांड देऊन ते पान .pdf सेव्ह करू शकतात आणि नंतर वेगवेगळे pdf पेज एकत्र करून एकच pdf बनवू शकतात (पण त्यात बहुतेक लिंक अॅक्टिव्ह नसेल). (माझे एक .mht पेज ८१६केबी होते आणि पीडीएफ सेव्ह केल्यानंतर २१६ केबी झाले. :-))
किंवा
तुम्ही प्रत्येक पेज थेट pdf म्हणुनही सेव्ह करू शकतात.
.mht मध्ये सेव्ह करण्याचा फायदा असा कि तुम्ही विपु ऑफलाईन असतानाही पाहु शकतात आणि जर तुम्हाला एखाद्या विपुला रीप्लाय करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन असताना, सेव्ह केलेले एखादे पेज उघडुन "प्रतिसाद" वर टिचकी मारून त्या मायबोलीकराच्या विपुत प्रतिसाद देऊ शकतात.
पण फक्त विपु डिलीट केल्याने सर्व्हरवरचा ताण कसा कमी होणार?
माझ्या विपुतील सर्व पाने सेव्ह केली असता एकुण २३ एम्बी साईज झाली विचार करा प्रत्येकाचे सरासरी १०-१५ एम्बी जरी गृहित धरले तर सर्व्हर वर किती जागा रीकामी होईल.
ठिक आहे, पण जर मी बॅकअप घेऊन विपु डिलिट केल्या तर मी ऑनलाईन असताना वाचु शकतो का?
नाही. बॅकअप हा तुमच्या हार्डडिस्कमध्ये असल्याने तो तुम्ही ऑनलाईन असताना वाचता येणार नाही.
पण मग यासाठी बॅकअप घेतल्यानंतर एक एक पान मला डिलीट करावे लागेल? त्यासाठी बराच वेळ लागतो.
यासाठी मात्र अॅडमिनची मदत लागेल.
एकदा का तुम्ही बॅकअप घेऊन झालात कि अॅडमिनला संपर्कातुन कळवा विपु डिलिट करण्याबाबत.
अर्थात जर पाने कमी असतील तर अॅडमिनची मदत न घेता तुम्ही ते स्वतःहि करू शकतात. आणि हो हे रोजच्या रोज करण्याचे गरज नाही ४-५ महिन्यातुन एकदा केले तरी पुरेसी आहे.
अशा प्रकारे सर्व्हरवरचा ताण कमी होण्यास आपल्याकडुन थोडीतरी मदत होईल.
(या व्यतिरीक्त कुणाकडे अजुन काही सोपे उपाय असतील तर ते अवश्य इथे सांगा. मी मोझिला फायरफॉक्स वापरत नाही, त्यामुळे त्यात काही वेगळ्या सेटिंग्स आहेत का?)
मी माझी विपु डिलिट करण्याबाबत अॅडमिनला कळवले आहे आणि तुम्ही ????????
(तळटिपः विपुचे बॅकअप घ्यायचे नसेल तर वरची माहिती न वाचता थेट अॅडमिनला संपर्क विपु करा. :फिदी:)
विपु म्हणजे टेक्स्ट फाइल्स या
विपु म्हणजे टेक्स्ट फाइल्स या इथल्या जेपीजी इमेज फाइल्स पेक्षा कितीतरी कमी जागा घेत असतील ना? फोटो कमी टाकले तर हा प्रॉब्लेम कमी व्हायला हवा. कि माझ काही चुकतय विचार करताना?
इमेज फाईल्स माबोवर सेव्ह
इमेज फाईल्स माबोवर सेव्ह करण्याचा ऑप्शन काढून टाकला आणि त्याऐवजी फक्त इमेज होस्टिंग वेबसाईटस च्या लिंकस वापरता आल्या तर डिस्क स्पेसवरचा ताण कितीतरी कमी होऊ शकतो...
विपु म्हणजे टेक्स्ट फाइल्स या
विपु म्हणजे टेक्स्ट फाइल्स या इथल्या जेपीजी इमेज फाइल्स पेक्षा कितीतरी कमी जागा घेत असतील ना? फोटो कमी टाकले तर हा प्रॉब्लेम कमी व्हायला हवा. >>>>सानीने प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे जर इमेज होस्टिंग वेबसाईटसच्या (पिकासा/फ्लिकर इ.) लिंक वापरल्या तर "डिस्क स्पेस" वर ताण येणार नाही. कारण इथे तुम्ही फक्त त्याची लिंक देत आहात. अर्थात जर इमेजेस जास्त असतील तर सर्व्हरवर थोडा ताण येईल.
त्याऐवजी फक्त इमेज होस्टिंग वेबसाईटस च्या लिंकस वापरता आल्या तर डिस्क स्पेसवरचा ताण कितीतरी कमी होऊ शकतो...>>>>मी तेच करतो
मी पण करणार....... करणार काय
मी पण करणार....... करणार काय करतोच
व्हिडीओ अपलोड करतांना लिंकमधे
व्हिडीओ अपलोड करतांना लिंकमधे स्पेस देऊन अक्षरे सेपरेट केली तर डिस्कस्पेस कमी लागेल का ?
( माहीत नाही म्हणून विचारतोय )
मस्त काम केलेस जिप्सी !
मस्त काम केलेस जिप्सी !
ऊपक्रम चांगला आहे..
ऊपक्रम चांगला आहे.. सर्वांनीच नको असलेले किंवा कालबाह्य झालेले विपु डिलीट केले तर चांगलेच आहे..
पण जिप्सी मला एक कळाले नाही.. जर मायबोली ही साईट चे जिकडे कुठे होस्टींग केले आहे.. त्या सर्व्हर वरती स्पेस लिमीटेशन आहे का? की सर्व्हर हा मायबोली चा स्वता:चा आहे??
हल्ली जवळपास सगळेच डोमेन सर्व्हीस प्रोव्हायडर अनलिमिटेस स्पेस प्रोव्हाईड करुन देतात..
जर तुझा ईश्यु जास्त स्पेस मुळे परफॉर्मन्स खराब होतो असा असेल तर तो योग्य आहे असे मला वाटते...
मस्त रे जिप्सी , वेबमास्तर
मस्त रे जिप्सी ,
, माझी पण विपु डिलीट करा.
वेबमास्तर मेरा नंबर कब आयेगा
माझ्या विपुतील सर्व पाने
माझ्या विपुतील सर्व पाने सेव्ह केली असता एकुण २३ एम्बी साईज झाली >> प्रत्येक पान सेव्ह करताना त्यापानावरील फोटो इत्यादी (काही वेळा तेच तेच उदा. प्रत्येक विपुतील लिहणार्या व्यक्तीचा फोटो) पण त्या पानात सेव्ह होतात त्यामुळे एवढी साईज झाली असे मला वाटते. त्यातील फक्त मजकुराचा विचार केला तर फारतर ५-१०% साईज होईल असे मला वाटते. तसेच मायबोलीच्या सर्वरवर ही पाने जशीच्या तशी स्टोअर न होता हे सगळे डेटाबेसमध्ये स्टोअर होत असेल आणी प्रत्येक पान अक्सेस केले की ते डेटाबेसमधून माहिती येऊन ते पान तयार होत असेल. त्यामुळे फक्त विपु मजकुराचा विचार केला तर फारच थोडी जागा व्यापत असेल असे मला वाटते. तसेही आता पुर्वीपेक्षा सर्वर स्पेस बर्यापैकी स्वस्त उपलब्ध होत असावी.
माझ्यामते सर्वात जास्त ताण वारंवार विपु बघणे/ काही पाने वरचेवर बघण्याने बँडविड्थ वर पडत असेल. त्यामुळे सारखी विपु न बघणे/मायबोलीचा वापर चॅट साईटसारखा न केल्याने जास्त मदत होईल असे मला वाटते. (अर्थातच मी हे असे करा सांगत नाहीये... फक्त कश्याने सर्वर वर ताण येत असेल यावरचा माझा तर्क व्यक्त करतोय).
अॅडमिन/वेबमास्टर जास्त प्रकाश टाकतीलच.
चांगलं लेख !
चांगलं लेख !
नात्या - सहमत
नात्या - सहमत
प्रत्येकाच्या प्रतिसादावर
प्रत्येकाच्या प्रतिसादावर ऑप्शन ठेवायचे..... हा संदेश किती दिवस ठेवायचा... स्मायली/ जोक/ अभिनंदन वगैरे एक महिना ठेवावेत.
जे माहितीपूर्ण असतील त्यासाठी कायमचे ठेवावे असा ऑप्शन ठेवावा.
प्रत्येकाने आपापला प्रतिसाद प्रामाणिकपणे मार्क करावा.
साधारण महिनाभर सगळेच प्रतिसाद रहातील. तेंव्हा धागे अॅक्टिव असतात.
नंतर फाफट पसारा डिलिट होऊन फक्त माहितीपूर्ण प्रतिसाद रहातील.
( माझा हा प्रतिसाद कसा आहे? फाफट पसारा की कायमचा ठेवण्यायोग्य? )
मुक्त छंदातील कविताना कवीनी मूळ कवितेच्याच धाग्याला महिनाभर जिवंत असा ऑप्शन प्रामाणिकपणे मार्क करावा..
ई कचरा कमी केल्याचे त्याना पुण्य मिळेल. 
Pages