मायबोली डिस्क स्पेसवरचा ताण कमी करण्यासाठी आपला खारीचा वाटा

Submitted by जिप्सी on 12 April, 2011 - 06:32

आपल्यापैकी बरेचसे लोक असे असतील कि ज्यांचा एकही दिवस मायबोलीला भेट दिल्याशिवाय जात नसेल. व्यस्त कामातुन थोडावेळ का होईना मायबोलीवर येऊन, येथील विविध विभागांना भेट देऊन, प्रतिसाद देऊन जाणारेहि बरेच आहेत. खरोखर मायबोली म्हणजे एक न सुटणारे व्यसनच. Happy
आपणही बर्‍याचवेळा मायबोलीवर येऊन लेख, प्रचि, कविता, ललित इ. इ. काहि ना काहि लिहत असतोच. किंवा एखाद्या आवडलेल्या लिखाणावर/प्रचिवर आपले प्रतिसाद देत असतो.
अशा विविधप्रकारे मायबोली सर्व्हर वर थोडा ताण वाढण्यास आपण कारणीभूत असतो. मध्येच कधीतरी मायबोली द्रुपालच्या स्वरूपात आपला राग प्रकट करते. Happy

पण यासाठीच तर आम्ही मायबोलीवर येतो ना...
मान्य आहे, आपले लिखाण/प्रचि सगळ्यांपर्यतं पोहचवण्यासाठी, इतर लिखाण वाचण्यासाठी.प्रतिसाद देण्यासाठीच तर आपण मायबोलीला भेट देतो.

मग सर्व्हरवरचा ताण थोडातरी कमी करण्याकरीता मी काय करू शकतो?
हा ताण कमी करण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलु शकतो. फक्त एकच करायचे तुमची विपु तपासायची. त्यात कमीत कमी १०-१२ पान तरी असतील कुणी ना कुणी विचारपुस केल्याची. उदाहरणार्थ, माझ्याच विपुमध्ये जाने. २०१० पासुन आतापर्यंत एकुण ४३ पाने आहेत. एका पानावर साधारण २५ प्रतिसाद. सर्व पानांवरचे मिळुन १०७५ प्रतिसाद. एखाद्या बाफ/बीबी वर १००० च्या वर प्रतिसाद गेले असता अ‍ॅडमिन तो बाफ/बीबी बंद करून त्याचा पुढे दुसरा भाग चालु करण्यास सांगतात. तेंव्हा आपल्याला फक्त एकच करायचे आहे कि आपआपल्या विपुचे बॅकअप घेऊन ते डिलीट करायचे.
प्रामाणिकपणे सांगा आपल्यापैकी कितीजण ५-६ महिन्यापूर्वीचे विपु चेक करतात? Happy जर नीट पाहिले असता बरेचसे विपु हे सणाच्या शुभेच्छांचे असतात ते तर आपण नंतर कधी पाहतही नाही. Happy

"बॅकअप" घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचे?
एकदम सोप्पं आहे. Happy यासाठी तुम्हाला फक्त अर्धा किंवा एक तास द्यावा लागेल.
१. आपआपल्या विपुत जाउन एक एक पेज ओपन करून ते html मध्ये सेव्ह करायचे (File -> Save As). जर तुम्ही Internet Explorer 8 वापरत असाल तर तुमची फाईल .mht म्हणुन सेव्ह होईल. (यात .htm फाईल आणि ग्राफिक फोल्डर असे सेव्ह न होता एकच फाईल सेव्ह होईल). उदा. माझ्या विपुतले ४३ पेज मी एक एक ओपन करून page_1.mht असे ४३ पेज सेव्ह केले आहेत (यासाठी मला फक्त २० मिनिटे लागली) आणि जर तुम्ही Internet Explorerचे lower version वापरत असाल तर .htm सेव्ह करताना Encoding मध्ये Unicode (UTF-8) जरूर सिलेक्ट करा. या प्रकारे जितकी विपुत पाने तितके तुमचे .mht/.htm फाईल सेव्ह होतील किंवा तुम्ही एक एक पेज उघडुन थेट प्रिंट कमांड देऊन ते पान .pdf सेव्ह करू शकतात आणि नंतर वेगवेगळे pdf पेज एकत्र करून एकच pdf बनवू शकतात (पण त्यात बहुतेक लिंक अ‍ॅक्टिव्ह नसेल). (माझे एक .mht पेज ८१६केबी होते आणि पीडीएफ सेव्ह केल्यानंतर २१६ केबी झाले. :-))

किंवा

तुम्ही प्रत्येक पेज थेट pdf म्हणुनही सेव्ह करू शकतात.

.mht मध्ये सेव्ह करण्याचा फायदा असा कि तुम्ही विपु ऑफलाईन असतानाही पाहु शकतात आणि जर तुम्हाला एखाद्या विपुला रीप्लाय करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन असताना, सेव्ह केलेले एखादे पेज उघडुन "प्रतिसाद" वर टिचकी मारून त्या मायबोलीकराच्या विपुत प्रतिसाद देऊ शकतात.

पण फक्त विपु डिलीट केल्याने सर्व्हरवरचा ताण कसा कमी होणार?
माझ्या विपुतील सर्व पाने सेव्ह केली असता एकुण २३ एम्बी साईज झाली Happy विचार करा प्रत्येकाचे सरासरी १०-१५ एम्बी जरी गृहित धरले तर सर्व्हर वर किती जागा रीकामी होईल. Happy

ठिक आहे, पण जर मी बॅकअप घेऊन विपु डिलिट केल्या तर मी ऑनलाईन असताना वाचु शकतो का?
नाही. बॅकअप हा तुमच्या हार्डडिस्कमध्ये असल्याने तो तुम्ही ऑनलाईन असताना वाचता येणार नाही. Happy

पण मग यासाठी बॅकअप घेतल्यानंतर एक एक पान मला डिलीट करावे लागेल? त्यासाठी बराच वेळ लागतो.
यासाठी मात्र अ‍ॅडमिनची मदत लागेल.
एकदा का तुम्ही बॅकअप घेऊन झालात कि अ‍ॅडमिनला संपर्कातुन कळवा विपु डिलिट करण्याबाबत.
अर्थात जर पाने कमी असतील तर अ‍ॅडमिनची मदत न घेता तुम्ही ते स्वतःहि करू शकतात. Happy आणि हो हे रोजच्या रोज करण्याचे गरज नाही ४-५ महिन्यातुन एकदा केले तरी पुरेसी आहे. Happy

अशा प्रकारे सर्व्हरवरचा ताण कमी होण्यास आपल्याकडुन थोडीतरी मदत होईल. Happy

(या व्यतिरीक्त कुणाकडे अजुन काही सोपे उपाय असतील तर ते अवश्य इथे सांगा. मी मोझिला फायरफॉक्स वापरत नाही, त्यामुळे त्यात काही वेगळ्या सेटिंग्स आहेत का?)

मी माझी विपु डिलिट करण्याबाबत अ‍ॅडमिनला कळवले आहे आणि तुम्ही ???????? Happy

(तळटिपः विपुचे बॅकअप घ्यायचे नसेल तर वरची माहिती न वाचता थेट अ‍ॅडमिनला संपर्क विपु करा. :फिदी:)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे माहिती नव्हते. सांगितल्याबद्दल धन्यवाद. खारीचा वाटा आवश्यक आहेच. Happy

अरे भाऊ तू सर्व्हरचा परफॉर्मन्स आणि डिस्क स्पेस याची गल्लत करतोयस! पण नको असलेली विपू डिलीट करायला पाहीजे हे मला मान्य आहे. मी करत असतो अधून मधून.

आपण गप्पा मारताना बरेचदा चित्रं अपलोड करतो वाहत्या बीबींवर. ही चित्रंसुद्धा कधी कधी फार स्पेस अडवतात. आपलं काम झालं की ही चित्रं डिलीट करुन टाकावी. मी करते १-२ महिन्यातुन.

अरे भाऊ तू सर्व्हरचा परफॉर्मन्स आणि डिस्क स्पेस याची गल्लत करतोयस!>>>>चिमण, बरोबर आहे. मलाही डिस्क स्पेस बद्दलच लिहायचे/म्हणायचे होते. Happy

मी आताच माझ्या विपुचा बॅक अप घेतला. पण एकेक एंट्री डिलीट करण्यात फार वेळ जातोय. त्यासाठी एक पूर्ण पेज डिलिट करता येईल अशी सोय हवीय.

पण एकेक एंट्री डिलीट करण्यात फार वेळ जातोय. त्यासाठी एक पूर्ण पेज डिलिट करता येईल अशी सोय हवीय.>>>>>दिनेशदा, खरंय ते. त्यासाठी अ‍ॅडमिनला विनंती केली आहे मी विपुतले सगळी पाने डिलिट करण्यासंबंधी. Happy

आपल्या सुचना छानच आहेत. व्यक्तीगतरीत्या मी माझी विपु दर महिन्याला डिलीट करतो. हेच तंत्र माझ्या ऑफिसच्या इ-मेल ला सुद्धा लागू केले आहे. ९० दिवसांपूर्वीचा एकही इ-मेल मी ठेवत नाही.

धन्यवाद!!

>> पण एकेक एंट्री डिलीट करण्यात फार वेळ जातोय
त्याचं कारण म्हणजे.. समजा ४थ्या पानावरची एक एंट्री डिलीट केल्यावर कंट्रोल पहिल्या पानावर जातो. त्यामुळे ४थ्या पानावरची दुसरी एंट्री डिलीट करायला परत ४थ्या पानावर जावं लागतं.

सोप्पा उपाय सुचवल्याबद्दल धन्यवाद जिप्सी!!! Happy बॅक अप घ्यायचं काम लगेच करते... आणि विपु डिलिट करायला मात्र अ‍ॅडमीनना सांगेन... त्यांच्यासाठी ते एका मिनिटाचं काम असावं बहुतेक...

गजानननी लिहिल्याप्रमाणे अ‍ॅडमिनटीम पूर्वसुचना देऊन ठराविक तारखेआधीच्या विपू काढून टाकते. याआधीही काढून टाकल्या आहेत विपू.

हो गजानन! मागच्यावर्षी जुन्या माबोकरांची विपु अशीच ठराविक कालावधीनंतर काढल्याचे आठवतेय... आम्ही नवीन असल्याने आमच्यासाठी ते लागू नव्हते... तसे असल्यास मी माझी विपु अजून काही काळापर्यंत राहू देईन... तेवढीच माझ्या डोळ्यासमोर राहिल ना! Happy

गजानन, ही अ‍ॅक्टीव्हिटी अ‍ॅडमीन टीम बहुतेक वर्षभराने करते.>>>>बहुतेक, कारण माझ्याकडे जाने. २०१० पासुनच्या विपु आहेत.

मी कय केलं सांगते.. ४थ्या पानावरची जी जी विपु डिलिट करायची असेल ती opne in new window चं ऑप्शन वापरून ओपन केली आणि डिलिट केली, आणि विंडो पण डिलिट केली.. माझी टोटल ३५ पानं होती विपुची. डिलिट करत आता ३१ झाली आहेत. Happy अर्थात यात ही वेळ जातोच आहे. पण निदान कंट्रोल एकदम पुन्हा पहिल्या पानावर जात नाहिये.

खरंतर ऑर्कुट मध्ये जशी फॅसिलिटी आहे तशी इथे प्रत्येक विपुखाली एक चेकबॉक्स करून त्यात टिचकी मारली आणि डिलिट ऑप्शन क्लिक केला तर डिलिट व्हायला हवी...

>> इथे प्रत्येक विपुखाली एक चेकबॉक्स करून त्यात टिचकी मारली आणि डिलिट ऑप्शन क्लिक केला तर डिलिट व्हायला हवी...

वा दक्षे! तू यूझर इंटरफेस कसा असावा याबद्दल माबोला चांगल्या सूचना देऊ शकशील! Happy

मला बरोबर आठवले होते... जाने. २०१० पूर्वीच्या विपुंची साफसफाई करण्याचा फतवा मागच्या वर्षीच्या मे महिन्यात निघाला होता... (संदर्भः http://www.maayboli.com/node/16313?page=1, त्याआधीचा फतवा जाने. २००८ ला निघाला होता. संदर्भ: http://www.maayboli.com/node/4472) आता ह्या वर्षीचा फतवाही लवकरच निघेल बहुतेक.... पण मी माझ्या विपुची १९ पाने सेव्ह केली एवढ्यात... तेवढाच नंतरचा ताण कमी झाला! जिप्सीला धन्स त्यासाठी... कल करे वो आज कर, आज करे सो अभी या न्यायाने सर्वांनीच आत्तापर्यंतचा बॅक अप घेऊन ठेवायला हरकत नाही! Happy

जिप्सी तुमच्या जागरूकतेबद्दल धन्यवाद. प्रत्येक मायबोलीकराने विचारपूस काढण्यापेक्षा एक सफाई मोहीम करून १ जानेवारी २०११ पेक्षा जुन्या सगळ्या विपू काढण्याचा विचार आहे. मी लवकरच तशी घोषणा करतो.

Pages