मायबोली वर्षाविहार २०१२ - सचित्र वृत्तांत

Submitted by इंद्रधनुष्य on 25 July, 2012 - 01:45

ऋतू बदलती क्रमास अपुल्या
तू येण्याचे निमित्त साधुन

अगदी खरयं ... सरत्या ग्रिष्माच्या धारांसोबत चाहूल लागते ती वविच्या येण्याची... ववि संयोजनाच्या बाफची... त्यातील उत्साही संयोजकांची... वविच्या घोषणेची... संयोजकांच्या कल्पक जाहिरातींची... नोंदणीच्या आकड्यांची.. थोड्याश्या रुसव्यांची तर फारश्या टांगारुंची.. आणि मग तो दिवस उजाडतो... लहान थोरांची एकच धांदल उडते... लगबग असते ती वविची बस पकडण्याची... वेळेच्या आधी पोहचून, उशिराने येणार्‍यांची यथेच्छ धुलाई कराण्यासाठी... बस मधिल कल्ल्यासाठी.. रिसॉर्टवरच्या नाचगाण्यासाठी आणि सासंच्या धमाल कार्यक्रमांसाठी.. शेवटी 'ये दिल मांगे मोर' म्हणत परतीच्या प्रवासात दिवे देण्याची...

गेली ७ वर्ष फक्त हेच आणि हेच अनुभवत आलो आहे. तरी ही दरवर्षी तोच उत्साह... तीच लगबग... तोच जोष घेऊन त्या पुन:प्रत्ययासाठी हे मन आतुर असते.. माहित नाही ही काय मोहिनी आहे या वविची... जी दरवर्षी माबोकरांशी गाठ घालून देते... कधी न विसरण्यासारखी... अविस्मरणीय!

या अविस्मरणीय क्षणांची अनुभूती देणारी ही यंदाच्या दशकपुर्ती 'वर्षा विहार'ची काही क्षणचित्रे... आपल्या सर्वांसाठी... :)

गाना ना आया.. बजाना ना आया... ड्रायवर को अपना बनाना ना आया...

आपल्या आवडत्या Uncleकाकांच पाकगृह..

वेबमास्तरांची दिलखुलास दाद...

वविची दशकपुर्ती...

यूकेज् जळि खेळू खेळ कन्हैया, का लाजता?

अरे... बोऽल बजरंग बलीऽ कीऽ... जय

Uncleकाकांची खानावळ...

सांस्कृतीक कार्यक्रम
शब्दवेध... वर्षा टिम

शब्दवेध... वरुण टिम

उतारा... वृष्टी टिम

उतारा... पर्जन्य टिम

उतारा... वरुण टिम

घोषवाक्य ओळखा... वरुण टिम

मल्ली आणि सुईदोरा... पर्जन्य टिम

जल्ला काय बी टोटल लागत नाय...

वर्षा टिमचा जल्लोष...

वस्त्रहरणाची तयारी...

मायबोली परिवार...

होऽय म्हाऽऽराजा...

तटि : १. तरण तलावातील तीन प्र.चित्रे श्रीयुत परेश लिमये यांनी टिपलेली आहेत.
२. 'काकांचे पाकगृह' आणि 'काकांची खानावळ' या मधिल भिडे 'काकां'चा संभ्रम दूर करण्यासाठी 'Uncleकाका' असा शब्दफेर केला आहे.

विषय: 

येस्स्स्स ते सुरु झालय हे उत्तर शामलीनी दिलम होतं. १००% शामलीनेच.
>>> अगं लिहिलंय ना मी. उत्तर मी दिलं होतं Happy मी आवाज ओळखला व्हीडीओ बघून! फक्त प्रश्न कुणी विचारला ते मला आठवत नव्हतं. Happy

मस्त फोटो................धम्माल .........

हेकायनितेकाय ... Biggrin मनिषा तुला या प्रश्नाबद्दल संयोजकांकडून बक्षिस मागून घेच.

उत्तर दोघींनी दिलंय त्यामुळे उत्तराचे पारितोषिक निंबुडा आणि शामलीला विभागून द्या.

आनंदसुजु रॉक्स , बाकी सगळ्या कलाकारांनी मस्त काम केलयं.
व्हिडिओज मुळे हा ववि आम्हाला मनापासुन एंजॉय करता आला. थॅक्स !

Pages