मायबोली वर्षाविहार २०१२ - सचित्र वृत्तांत

Submitted by इंद्रधनुष्य on 25 July, 2012 - 01:45

ऋतू बदलती क्रमास अपुल्या
तू येण्याचे निमित्त साधुन

अगदी खरयं ... सरत्या ग्रिष्माच्या धारांसोबत चाहूल लागते ती वविच्या येण्याची... ववि संयोजनाच्या बाफची... त्यातील उत्साही संयोजकांची... वविच्या घोषणेची... संयोजकांच्या कल्पक जाहिरातींची... नोंदणीच्या आकड्यांची.. थोड्याश्या रुसव्यांची तर फारश्या टांगारुंची.. आणि मग तो दिवस उजाडतो... लहान थोरांची एकच धांदल उडते... लगबग असते ती वविची बस पकडण्याची... वेळेच्या आधी पोहचून, उशिराने येणार्‍यांची यथेच्छ धुलाई कराण्यासाठी... बस मधिल कल्ल्यासाठी.. रिसॉर्टवरच्या नाचगाण्यासाठी आणि सासंच्या धमाल कार्यक्रमांसाठी.. शेवटी 'ये दिल मांगे मोर' म्हणत परतीच्या प्रवासात दिवे देण्याची...

गेली ७ वर्ष फक्त हेच आणि हेच अनुभवत आलो आहे. तरी ही दरवर्षी तोच उत्साह... तीच लगबग... तोच जोष घेऊन त्या पुन:प्रत्ययासाठी हे मन आतुर असते.. माहित नाही ही काय मोहिनी आहे या वविची... जी दरवर्षी माबोकरांशी गाठ घालून देते... कधी न विसरण्यासारखी... अविस्मरणीय!

या अविस्मरणीय क्षणांची अनुभूती देणारी ही यंदाच्या दशकपुर्ती 'वर्षा विहार'ची काही क्षणचित्रे... आपल्या सर्वांसाठी... :)

गाना ना आया.. बजाना ना आया... ड्रायवर को अपना बनाना ना आया...

आपल्या आवडत्या Uncleकाकांच पाकगृह..

वेबमास्तरांची दिलखुलास दाद...

वविची दशकपुर्ती...

यूकेज् जळि खेळू खेळ कन्हैया, का लाजता?

अरे... बोऽल बजरंग बलीऽ कीऽ... जय

Uncleकाकांची खानावळ...

सांस्कृतीक कार्यक्रम
शब्दवेध... वर्षा टिम

शब्दवेध... वरुण टिम

उतारा... वृष्टी टिम

उतारा... पर्जन्य टिम

उतारा... वरुण टिम

घोषवाक्य ओळखा... वरुण टिम

मल्ली आणि सुईदोरा... पर्जन्य टिम

जल्ला काय बी टोटल लागत नाय...

वर्षा टिमचा जल्लोष...

वस्त्रहरणाची तयारी...

मायबोली परिवार...

होऽय म्हाऽऽराजा...

तटि : १. तरण तलावातील तीन प्र.चित्रे श्रीयुत परेश लिमये यांनी टिपलेली आहेत.
२. 'काकांचे पाकगृह' आणि 'काकांची खानावळ' या मधिल भिडे 'काकां'चा संभ्रम दूर करण्यासाठी 'Uncleकाका' असा शब्दफेर केला आहे.

विषय: 

ईन्द्रा...

मधले काही फोटो दिसत नाहियत... काय करू?...
तुझा 'सचित्र वृत्तांत' देखिल सुंदर....

इंद्रा, व्हिडियो भारीच !! Rofl

अगदी योग्य अँगल जमलाय. त्यामुळे सर्व संवाद व्यवस्थित ऐकू येतायत.
(बाकी, मंजात्या तुझ्या आसपासच बसली होती का? बर्‍याचदा जो हसण्याचा आवाज येतोय, तो तिचा वाटतोय.)

अरे.... गार्‍हाणं मांडून झाल्यावरचे हे संवाद कोणाचे?

संपलं का?
नाही नाही... आत्ता सुरू झालंय

Rofl Rofl

संगीत वस्त्रहरण ...... कहर आहे कहर Rofl

मास्तर- घारुअण्णा
गोप्या / विदूर / धृतराष्ट्र - आनंदमैत्री
अर्जुन / शकुनी - वैभव आयरे १२३४५
दुर्योधन - बागुलबुवा
दु;शासन - विनय भिडे
धर्मराज / भीम - _नील_
आणि पांडूतात्यांच्या अजरामर भुमिकेत - आनंदसुजू

सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या!!!

मस्तच रे इन्द्र्या, बाकी उतारा वाचनात आमची पर्जन्य टीम होती रे, तू वृष्टी लिहिलं आहेस

संव बघायला घेतलंय. पहिलं व्हय म्हाराजा संपल्यावर पात्रांची पांगापांग झाल्याझाल्या "संपलं काय" हा निरागस प्रश्न कोणी विचारलाय? त्या प्रश्नाला तितक्याच शांतपणे कोणीतरी "नाय नाय सुरू झालं" असं उत्तरही दिलंय. ..... Rofl

संव बघायला घेतलंय. पहिलं व्हय म्हाराजा संपल्यावर पात्रांची पांगापांग झाल्याझाल्या "संपलं काय" हा निरागस प्रश्न कोणी विचारलाय? त्या प्रश्नाला तितक्याच शांतपणे कोणीतरी "नाय नाय सुरू झालं" असं उत्तरही दिलंय. >>>
Rofl

प्रश्न कुणी विचारलाय आठवत नाही, पण उत्तर मी दिलंय ते!
माझ्या मागे बहुदा शामली किंवा सामी होती. तेव्हा प्रश्न ह्या दोघींपैकीच नक्की कुणीतरी! Biggrin

लेखक / लेखिका कोण आहे? >>> नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर. त्यांचं 'लंडन व्हाया वस्त्रहरण' हे पुस्तक छान आहे. (पुस्तकाच्या नावाबद्दल खात्री नाहीय. पण बहुधा हेच असावं.)

"संपलं काय" हा निरागस प्रश्न कोणी विचारलाय?<<<<< मी विचारलाय तो प्रश्न Proud

माझ्या एका बाजुला निंबुडा आणि एका बाजुला शामली होती उत्तर द्यायला. अर्थात उत्तर कोणी दिल ते आता आठवत नाही. Sad

Pages