एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'द ट्रुमन शो' <<<
म्हणजे मग शेवटी सगळा सेट गुंडाळताना दाखवतील आणि घना खर्‍या लोकलच्या गर्दीत शिरेल.... Wink

अरेरे बिचारा घना! मालिकाकर्त्यांचा सगळा बिनडोकपणा त्याच्याच डोक्यावर थापला जातोय. त्याला अम्रिकन mncत नोकरी मिळालीय. त्या कंपनीचे हापिस/ब्रँच मुंबैत आहे. तरी इंटर्व्ह्युसाठी पुण्याला जावे लागले. आता तर ती कंपनीच खोटी असण्याची शक्यता ! आणि हे सगळं एका सॉफ्टवेर विंजीनीरच्या बाबत होतंय! हे राम!
हा सॉफ्टवेर विंजीनिर आधी फक्त हार्ड डिस्की फॉर्मॅट करायचा. सॉफ्टवेअर लिहायला बसण्यासारखे टेबल खुर्ची त्याच्या घरी किंवा हापिसात नसल्याने त्याला आतापतुर सॉफ्टवेअर लिवता आलं नाही.

कॉन्सर्टला जाताना कलाकार कोण ते सांगायची गरज नसते, तशीच पहिली नोकरी कोणत्या कंपनीत मिळाली तेही आईवडील विचारत नाहीत.

काल माईआज्जी राधाला म्हणे की कुटुंबाची सगळी जबाबदारी मी तुझ्या हाती सोपवून रिटायर्ड होईन. एक जनरेशन स्किप का केली? मधल्या पिढीतले तीन मुलगे आणि तीन सुना इतके युसलेस आहेत का?

दीपांजली, आगे आगे देखिये उसमे होता है क्या....:फिदी: पण 'असंभव' मराटी मालिकांच्या मानाने बरीच उजवी होती. एलदुगो नंतर राजवाडेने खरंच एक रहस्यमय मालिका काढावी. भले शेवटी त्याचा कचरा का करेना. त्यावर मस्त चर्चा करता येते. असंभव आणि अग्निहोत्रच्या वेळी आम्ही संचायामा कसला कीस पाडायचो. तेव्हा वेगळा बीबी केला असता तर अजून त्या पोस्टस वाचता आल्या असत्या. Sad

कालचे ते घनाचे हापिसातले संवाद ऐकताना मला वाटलंच होतं, की आज इथे त्यावर मॅक्झिमम टिप्पणी येणार >>>

अगदी अगदी ललिता

डिवोर्स लॉयर, ते कागदपत्रे, जज, कोर्ट सर्व एका क्षणी थांबून घधा ला म्हण्णार तुम्ही प्रेमात पडला आहात ते कळायला आम्ही नाटक केलंय डिवोर्सचं ( दिल चाहता है मध्ये एका गाण्यात बघा सोनाली आणि सैफ बसलेले असतात आणि थेटरातले बाकीचे लोक्स हात हलवत नाचायला लागतात तसे. )
जसं काय अलम दुनियेत एकमेकांवर प्रेम करणारे हेच दोघे आहेत. आणि त्यांना ते कळत नैये.

हा बाफ वाचून म्हातारीने जेवण सोडलं का? ते तिचं जेवायचं टेबल मस्त आहे बाकी. ब्रेकफास्ट इन बेड साठी मस्त.

डीजेला मी उ का कसा फिट आहे हे सांगताना असंभवचा उल्लेख केलेला . ती ५ वर्षांपूर्वींची सिरीयल असूनही त्यातला उ का आणि एल्दुगोमधला उ का ह्यात ५ वर्षांचा फरक जाणवत नाही असं म्हंटलं म्हणून ही सिरीयल ती बघत असावी Wink . मला अनेक वर्षांनंतर आवडलेली मालिका होती ती Happy . मध्ये सतीश राजवाडेचे गायब होणे , सिरीयलचा अतर्क्य शेवट इ.इ. अनेक गोष्टी सोडल्यास. Proud नीलम शिर्केने काम मस्त केले होते मात्र.

हे सगळं अबिरचं नाटक असणार आहे...बावर्ची मध्ये पण राजेश खन्ना सुध्दा जया भादुरीच्या मित्राला कुटुंबात अ‍ॅक्सेप्ट केलं जावं म्हणून स्वतः चोरी केल्याचं नाटक करतो.

काहीही असो, माईआज्जीला चांगला झटका बसला हे बरं झालं. भारी तिस्मारखा समजायची स्वतःला. काल राधाला इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत होती. राधाने काही लावून घेतलं नाही हे बरं केलं. डोक्यावरचे केस पांढरे झाले म्हणून दुसर्‍यच्या आयुष्यात ढवळाढवळ करायचा परवाना मिळत नाही हे तरी तिला कळेल.

'घना/घन:श्याम्/शामराव चांगला मुलगा आहे', 'त्यचं तुझ्यावर प्रेम आहे' ही वाक्यं ऐकून आता उबग आलाय. हे सांगावं लागतंय ह्यातच सगळं आलं नाही का? राधाच्या आयुष्यात ढवळाढवळ करायचा आपल्यला हक्क आहे असंच सगळे समजताहेत. Sad

>>जसं काय अलम दुनियेत एकमेकांवर प्रेम करणारे हेच दोघे आहेत. आणि त्यांना ते कळत नैये.

ते 'ओम शांती ओम' मध्ये शाहरूखच्या तोंडी वाक्य आहे ना 'सारी कायनात.....' का काय ते

मालिकेचा एक संभाव्य पण असंभव शेवटः

ऑफिसात जायला नेहमीप्रमाणेच उशीर झाल्याने घाईघाईत निघालेल्या राधाला अ‍ॅक्सिडेन्ट होतो. तिला वाचवायच्या प्रयत्नात मानव जबर जखमी होतो. त्याला बघायला त्यच्या खोलीत गेलेल्या राधाला तो डॉक्टरांना जखमी अवस्थेतही आपल्याबद्दल चौकशी करतोय हे समजतं. तिला त्याच्या सच्च्या प्रेमाची जाणीव होते. ती दिवसरात्र एक करून मानवची शूश्रूषा करते. मानव बरा होतो.

अबिरची प्रेयसी त्याला शोधत येते आणि त्यच्या नाटकाचा भोपळा फुटतो. राधा सर्वांवर वैतागते. शेवटी काळे आणि देसाई कुटुंबिंयासमक्ष मानवला आपला जीवनसाथी घोषित करून डिव्होर्स पेपर्सवर सह्या करते. उल्काआत्या तिच्या निर्णयाचं जोरदार समर्थन करत प्रेमावर एक रॅशनल आणि प्रॅक्टिकल भाषण सुरु करते. घनाला एक बातमी द्यायला आलेला त्याचा बॉस ते ऐकून इम्प्रेस होतो आणि भाषण पूर्ण करतो. उल्काआत्या ऑन द स्पॉट प्रेमात पडते.

घनाचा बॉस त्याला सांगतो की बदललेल्या अमेरिकन लेबर लॉ (किमान हॅलो वर्ल्ड प्रोग्रॅम एका लॅन्ग्वेज मध्ये ह्याआधी बिनचूक लिहिलेला असणे!) मुळे त्याला कधीच अमेरिकेला जाता येणार नाही. घनाचं तेल, तूप आणि धुपाटणं सगळं जातं. गरीब वस्तीतल्या मुलांना हार्ड डिस्क फॉर्मेट करायचं ट्रेनिंग देण्यात आपलं जीवन व्यतीत करायचा निश्चय घना करतो.

गरीब वस्तीतल्या मुलांना हार्ड डिस्क फॉर्मेट करायचं ट्रेनिंग देण्यात आपलं जीवन व्यतीत करायचा निश्चय घना करतो.>>> Rofl

मयेकर +१. बिचारा घना.

अबीर आपल्या 'लग्न झालेल्या' मुलीच्या प्रेमात पडलाय, हे कळाल्यावरही त्याला पपांनी घरात ठेवलाय, हे पाहून खरंच विचित्र वाटलं!

>>एक जनरेशन स्किप का केली? मधल्या पिढीतले तीन मुलगे आणि तीन सुना इतके युसलेस आहेत का?

जरा कुठे खुट्ट झालं की गोष्टीतल्या सश्यासारखं 'आभाळ कोसळतंय' म्हणून माईकडे पळायची त्या सगळ्यांना सवय आहे हे तिला माहित आहे. राधा तशी तिच्याकडे धाव घेत नाही. म्हणून असं म्हणाली असेल ती.

घनश्याम बाबा एक काम मस्त करतो,
laptop च flap उघडणे आणि बन्द करणे. Happy

कोणी झी मराठी वर कुहु च्य गप्प ऐकल्या का?
मगच्य आठवड्यात??

जरा कुठे खुट्ट झालं की गोष्टीतल्या सश्यासारखं 'आभाळ कोसळतंय' म्हणून माईकडे पळायची त्या सगळ्यांना सवय आहे हे तिला माहित आहे. राधा तशी तिच्याकडे धाव घेत नाही. म्हणून असं म्हणाली असेल ती.
>>>>> +१ ...
त्या उ का ला उगीच खलनायक बनवले आहे ...

मधल्या पिढीतले तीन मुलगे आणि तीन सुना इतके युसलेस आहेत का

अर्थातच.. आणि हे तिच्याशिवाय दुस-या कोणाला इतके चांगले माहित असणार? बेडरिडन असुनही तिला अजुनही सगळे निस्तरावे लागतेय... पण म्हणुन राधाने ही जबाबदारी अंगावर घ्यावी असे थोडेच आहे????

Pages