एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाष्कळ
>>>>>>>>>>

पाष्कळ की बाष्कळ?????

भरत...... जरा धावून या आणि योग्य मराठी शब्द सांगा... मी कनफ्युज आहे Happy मी इतके दिवस बाष्कळ बडबड असं काहिसं समजत होतो........ भरत, प्रकाश टाका. (हल्ली मी भरत "जी" लिहित नाही.... त्यांना आवडत नाही ते Proud )

कहानी राजवाडेके महाभारतकी:

संध्याकाळ झाली होती. देवळातल्या घंटा आणि वासरांच्या गळ्यातल्या घंटा ह्यांचा सुंदर नाद वातावरणात भरून राहिला होता. देवकीमाऊली तुळशीपुढे सांजवात लावत होती. माईमाऊलीने कातर आवाजात म्हटलेल्या गीताचे सूर आसमंतात घुमत होते 'आकाशी झेप घे रे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा'. संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेल्या काळेवाडीकडे पाहून तिला अतोनत समाधान वाटत होतं.

देवकीमाऊलीने तुळशीला नमःस्कार केला. एव्हढ्यात पुढलं दार उघडल्याचा आवाज आला. 'अगबाई, आलं वाटतं माझं बाळ' एव्हढं म्हणतेय तोवर घनाबाळ उड्या मारत आत आला. 'आयडी, आयडी, आयडी' असं म्हणून तिला गदागदा हलवत त्याने एक गिरकी घेतली. 'अरे काय हे, झालंय काय?' खुश दिसतेय स्वारी'. देवकीमाऊली हसत म्हणाली.

'अग, तुला माहित आहे काय मज्जा झाली?'
'नाही रे बाळा, पण तू सांग ना' 'अग, आजचा लोण्याचा गोळा काय झक्कास जमला होता म्हणून सांगू तुला - मऊ लुसलुशीत, पांढरा स्वच्छ, आणि इतका चवदार."
'आवडला तुला?'
'अग, मला खायलाच मिळाला नाही. सगळा गोपाळांनीच संपवला. उरला आहे का अजून?"
'हो तर....ठेवलाय ना तुझ्यासाठी, अरे पण ऐक....ते लोणी मी बनवलं नव्हतं काही. ते रुक्मिणीने बनवलं होतं'
घनाबाळ गप्प.
'काय म्हणतेय मी? गप्प काय बसला आहेस? अरे, जाऊन सांग लगेच तिला'
तरी घनाबाळ तिथेच.
'घना? अरे, बायकांना नवर्‍यने कौतुक केलेलं आवडतं. पण तुम्ही नवरेलोक कौतुक करत नाही.ह्यात एव्हढं कपाळावर हात मारून घेण्यासारखं काय आहे?'

'अग आयडी, मला १६१०८ बायका आहेत. एका बायकोचं कौतुक केलं तर त्याचा काय परिणाम होईल ह्याचा विचार करून कपाळावर हात मारून घेतलाय'

विसू - कोणाच्याही धार्मिक भावना दुखावायचा हेतू नाही.

ए पण मला एक सांगा, की जर राधा आणि घना चं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं म्युच्युअली ठरलं होतं, दोघांचंही लग्न म्हणजे बंधन, भयंकर प्रकार, त्यात न पडणं शहाणपणाचं यावर एकमत झालं होतं...... या एकमतातूनच त्यांनी तो निर्णय घेतला, सगळी चर्चा करून, ठरवून..... आता मधल्या काळात त्यांना एकमेकांबद्दल प्रेम वाटायला लागलं तरी हे आधीचं ठरवलेलं तर खरंच होतं ना? मग घना ने आता राधाकडून जे ठरलं होतं त्याचीच अपेक्षा केली तर त्याला चूक का ठरवायचं? लग्नाच्या भानगडीत नाहीच अडकायचं असंच त्याला अजूनही वाटत असेल.... जसं राधाला सुरूवातीला वाटत होतंच, मग त्यालाच एवढं व्हिलन का ठरवायचं??

>>लग्नाच्या भानगडीत नाहीच अडकायचं असंच त्याला अजूनही वाटत असेल.... जसं राधाला सुरूवातीला वाटत होतंच, मग त्यालाच एवढं व्हिलन का ठरवायचं??

मग त्याने राधाला लवकरात लवकर मोकळं करावं. 'तुला डिव्होर्सची घाई झाली आहे' असं म्हणायचा त्याला काहीएक हक्क नाही. त्याला स्वतःच्या आईवडिलांना अमेरिकेला जतोय हे सांगायची धमक नाही तर त्यासाठी तिने आपला वेळ का घालवावा?

अमेरिकेला जतोय हे सांगायची धमक नाही>>>>>>>> धमक चा प्रश्न नाही ग, अतिप्रेमाच्या माणसांना नाही सांगता येत धाडकन अशा गोष्टी, मन दुखावेल असं वाटतं, कसं सांगायचं कळत नाही. आता बाकीचे सगळे प्लॅन करणारे पण बघ ना, जर कळलं आहे त्या सगळ्यांना की ह्या दोघांनी कॉ.मॅ. केलंय तर समोर उभं करून विचारायचं सरळ सरळ ते सोडून हे कसले लपाछपीचे खेळ खेळत बसलेत सगळेच

ह्म्म्म....रच्याकने कोणीतरी विचारलं होतं की लग्न ठरवायला प्रभातची आई नाही का. मला वाटतं त्याची आई वारली आहे असा एका एपिसोडमध्ये उल्लेख होता. उल्काआत्याला स्थळ बरं आहे. कुहूची पाठराखीण म्हणून जाता येईल तिला Proud

माझ्या डोळ्यासमोर आली उल्काआत्या आणि राहुल सोलापूरकरची जोडी... एक मेंदूने सुदृढ, आणि दुसरा शरीराने... कसं जमाचं Lol

अरे पहिल्यांदी कुहुबै सासरी जाणार असते भेटायला तेव्हा गोर्री वल्ली नाही का म्हणत सासू बाईंसमोर नीट बोल ( बहुतेक) सासू वारलीये होय. तरीच तो सासरा फार सुखी दिसतो.

.

आजच्या भागात उमेश कामतच्या अभिनयावर मी पुन्हा फिदा! मालिकेत एव्हढं उशिरा येऊन लगेच सेटल झाल्यासारखा फील प्रेक्षकांना द्यायचा, क्लायमॅक्सच्या आत एक्झिट घेताना प्रेक्षकांना रुखरुख लावणं हेच उत्तम अभिनेत्याचं लक्षण असावं .. फार ईझ आहे त्याच्यात, त्याचबरोबर उत्तम संवादफेक, सगळंच लाजवाब Happy

उ का मस्तच आहे, मला लेखकाचे जास्त कौतुक वाटते, ज्या पद्धतीने त्याचे संवाद लिहिले आहेत, त्याच्या भूमिकेला एकदम फिट आहेत. राजवाडेनी अबिरच्या व्यक्तिरेखेचा खूपच व्यवस्थित विचार केला आहे, आणि अबीरनेही न्याय दिला आहे.

आणि आता टोकाची अगतिक, हतबल.... >> ही हतबलता येऊ शकते... बट नॅचरल!!!>>
यात नॅचरल काही नाहीये, आधी खंबीर दाखवायचे आणि नंतर नेहमीच्याच रूळावर गाडी ढकलायची. रडूबाई करतायेत अगदी राधाला. लोकांनाही 'हतबल\रडू' नायिकाच आवडते बघायला. नायिका रडली की सीरीयल चालली.

राधा तेवढीही हतबल झाली नाहीय. मनातुन नसले तरी ती अजुनही घनाला मला भिजत घोंगडं ठेवायचं नाहीय, घटस्फोट जेवढा लवकर होईल तितके माझ्यासाठी चांगले हे बजावते, कारण त्रास शेवटी तिलाच होतोय. प्रश्न हा आहे की भिजत घोंगडं आपोआपच वाळेल का हे पाहात बसणा-याबरोबर पुढचे आयुष्य कितपत व्यवस्थित जाईल हा विचार करण्याचा आणि त्याच्या त्या आयुष्यात आपणही सहभाग द्यावा आणि का द्यावा हा विचार करण्याचा.

नाहीतर आहे आयुष्यभर माऊ नी दिग्यासारखे.....

इथल्या पोस्टी वाचून जर कोणी मालिका सोडली असेल तर पहात रहा. मी बंद केले होते इथे वाचून, पण इतकीही वाईट परिस्थिती नाहीये. ठिक चालली आहे. ड्रॅग झाली आहे थोडीशी एवढेच. इथे फालतू म्हणुन लिहिले गेलेले अनेक प्रसंग त्या अपेक्षेने पाहिले आणि अपेक्षाभंग झाला. छान वाटले.

इथल्या टीकेचे २ प्रकार केले पाहिजेत - मालिकेतल्या पात्रांच्या वागण्याबद्दल, स्वभावाबद्दल काही राग लोभ असणे, हे मालिका बरी चालली असल्याचे लक्षण आहे. लेखन दिग्दर्शन वगैरेवर टीका,, किंवा मालिकेच्या वेगावर टीका, यातून सुद्धा ती मालिका बघितली जाते, कधी कधी अत्यंत बारकाईनी बघितली जाते, हेच दिसतं.

पण हे नक्की कि इथली चर्चा वाचल्यामुळे त्या मालिकेची किंमत थोडी वाढते. एखादा भाग मिसळा तरी इथे सगळ कळत, आणि पुढे बघायची उत्सुकता वाटत राहते. ३ हजारापेक्षा जास्त पोस्टी हे या मालिकेच्या निदान इथल्या लोकप्रियतेच लक्षण आहेच.

अन्य मालिकांपेक्षा बरी, साधारण अर्थपूर्ण, काहीतरी एक कथानक असलेली, वगैरे हि मालिका थोडी लांबली तरी पुढच्या महिन्यात नक्की संपणार असल्यामुळे अधून मधून, बघावीशी वाटते आहे.

आज उ.का. घनाला स्पष्टपणे शहाणपण शिकवताना मस्त दाखवलाय. तरीही घना अजुनही तोर्‍यातच आहे. मुक्ताचा लाजतानाचा अभिनय छान वाटला.

Pages