कृष्णकमळ

Submitted by अवल on 23 July, 2012 - 10:18

माझ्या टेरेसमध्ये सध्या कृष्णकमळं उमलताहेत. मला फार आवडणारे एक फुल. थोडा रानवट पण फार गोड सुवास असणारे आणि बालपणीच्या खुप आठवणी जोपासणारे हे फुल.
त्याच्या नावाची कथा ऐकली असेलच तुम्ही. बाजूला १०० कौरव ( जांभळ्या बारीक पाकळ्या), मध्ये पाव पांडव ( पिवळी पाती ) आणि मध्ये तीन मोरपिसं खोचलेला कृष्ण ( तीन पराग असलेला पिवळा मणी) !

त्याचीच ही रुपे :

१. हे झाडावर झुलणारे
1 copy.jpg

२. घरभर त्याचा सुवास फुलावा म्हणून एक घरात आणले
IMG_4528 copy.jpg

३. फक्त पुढूनच नव्हे तर मागूनही किती सुंदर दिसते पहा
IMG_4525 copy.jpg

४. हे बाजूनी
IMG_4540 copy.jpg

५. आणि हे बरोब्बर समोरून
IMG_4541 copy.jpg

६. अन त्याच्या गोड वासाने आकर्षित झालेले हे सनबर्ड्स
IMG_4553 copy.jpg

७. त्यात दोघांची भांडणं झाली. मग त्यातला एक उडून आला मधुमालतीवर
IMG_4557 copy.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

फोटो सुंदर आहेत, माझ्या माहेरी देखील कृष्ण कमळाचे झाड आहे, माझ्या आईबाबांना खुप आवडतात ही फुले, त्यावर फुल उमलले की हमखास काहीतरी चांगली बातमी कळणार असे त्यांना वाटते, खुपदा असे घडल्यामुळे त्यांची पक्की खात्री झाली आहे Happy तुम्ही सांगितलेली कथाच माझ्या आईने सांगितली आहे.

धन्यवाद वर्षा Happy अन अहो कशाला? अगंच बरं आहे Happy
>त्यावर फुल उमलले की हमखास काहीतरी चांगली बातमी कळणार< अरेच्च्या हे मला नव्हतं माहिती. हां तसं बरोबर असावं, ही फुलं उमलायला लागली अन लेकाचा रिझर्ट लागला, डिस्टिंगशन फर्स्ट इअर इंजिनिअरिंगला Uhoh Proud

छान आहेत.
अवल या कूळात, पिंक लेडी किंवा लॅव्हेंडर लेडी असा नवीन वाण विकसित झालाय, दुरंगी फुले असते ते. नर्सरीवाल्याकडे मागणी केल्यास मिळू शकेल.

अहा काय सुंदर! बालपणी हे फुल सतत एक मित्र म्हणून सोबतील असायचं. ज्याला त्याला ह्या फुलाची गोष्ट सांगायची मला सवयच पडून गेली होती.

ही फुलं उमलायला लागली अन लेकाचा रिझर्ट लागला, डिस्टिंगशन फर्स्ट इअर इंजिनिअरिंगला <<<<<<

छान छान , अभिनंदन तुमच्या सॉरी तुझ्या मुलाचे Happy तुझ्या कृष्णकमळालादेखील आनंद झालेला दिसतोय म्हणुन असे आंनदाने एकदम झोकात फुलले आहे Happy

अरे वा! सुंदर फुले आणि छान प्रकाशचित्रे. आवडली.

भवताली दश पाकळ्या उमलती, अवतार दहा ते म्हणू |
उकलती शंभर दले जंबू ती, कौरवच की शत, ते गणू ||
मध्ये पांडव पाच ते प्रकटती, गमतसे कीर्ती त्यांची कथू |
लीला परमेश्वरी अशी बहरते, वर त्रिमूर्ती त्याचीच जणू ||

मस्तच आलेत फोटो ! सनबर्ड चेही छान आलेत. मुख्य म्हणजे तुला त्यांना फोटोत पकडता आले, हे विशेष! आमच्या घराजवळ याचे झाड होते, पण ते खुप मोठे म्हणजे जांभळाच्या झाडासारखे होते. तुझ्या टेरेस वर आहे ते असेच मोठे होते का?

अवल माझ्या शाळेत जायच्या रस्त्यात के.ए.म हॉस्पिटल होत त्याच्या आवारात होत याच झाड. ही फुल फुलायला लागली की आम्ही मुलं कंपाऊंडच्या तारांमधुन आत घुसायचो ह्या फुलांसाठी. सकाळी सकाळी बालपणाची सुरेख आठवण समोर दिसली.... दिवस नक्की चांगला जाणार Happy
अवल, लेकाच अभिनंदन आणि फोटो खासच Happy

धन्यवाद सर्वांना Happy
वर्षा, पूर्वा, विनार्च Happy
गोळेकाका, वा, वा, मस्त प्रतिसाद, धन्यवाद Happy
विद्याक, नाही गं, वेल आहे ही Happy
ही अशी
IMG_4547.jpg

वॉव अवल! कस्सले पकडलेस सनबर्डस! माझ्याकडेही सध्या खूप येताहेत सनबर्डस.
कृष्णकमळ तर मस्तच! आणि लेकाचं अभिनंदनन!

मस्त !

अवल छान फ़ोटो. आता तुझ्या घरी यावेच लागेल. माझ्या शाळेतल्या आठ्वणी जाग्या झाल्या. Happy
तुझ्या मुलाचे खूप खूप खूप अभिनंदन. Happy

काय सांगतेस? तुझ्या लेकाला डायरेक्ट डिस्टींक्शन?
व्वा वा! खुप खुप अभिनंदन सांग त्याला नयना मावशीकडुन! Happy
<<ही फुलं उमलायला लागली अन लेकाचा रिझर्ट लागला, डिस्टिंगशन फर्स्ट इअर इंजिनिअरिंगला<<
मला पण तुझ्याकडुन आणुन ठेवावं लागेल याचा वेल असं वाटतय. Uhoh Proud

माझ्याही खुप लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्यात. आम्हीही याला कौरव पांडवांचं फुल म्हणायचो.

Pages