राजधानी दिल्ली — कुतुबमिनार

Submitted by जिप्सी on 19 July, 2012 - 00:48

"उत्तरांचल" भटकंती मालिकेमध्ये तुम्ही कुतुबमिनाराचे फोटो पाहिले असेल (भटकंती दिल्लीची - कुतुबमिनार). यावेळेसही आम्ही एक दिवस दिल्ली भटकंती केली. हे कुतुबमिनाराचे फोटो, प्रयत्न केलाय आधीच्या मालिकेतील फोटो रीपीट न करण्याचा. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

=======================================================================
=======================================================================
क्रमशः

गुलमोहर: 

जबरी !!! फारच मस्त !!
काय मस्त अँगल्स घेतले आहेस रे. झोपून काढले का काही फोटो Happy
अरे, तू कुतुबमिनारजवळ जाणार आहेस हे कळतं तर त्याला माझ्यावतीने हात लावून ये असे तरी सांगितले असते Wink
काय आहे आम्ही ८० साली गेलो होतो, तेव्हा कुतुबमिनारजवळ गेलो तेव्हा धूम पाऊस पडत होता. अनेक लोकं बसमध्येच बसून राहिले. मी, माझी बहिण आणि ४-५ जण कुतुबमिनारजवळ गेलो. वर बघणं सुद्धा शक्य होत नव्हतं इतका जोरात होता पाऊस. झाकोळून आलेलं आकाश, धुवाँधार पाऊस, चमकाणार्‍या वीजा, असं भारी गूढ वातावरण झालं होतं. त्यात आसपासच्या त्या इमारतींचे पडकेपण, अन कुतुबमिनारची प्रचंड उंची..... माझ्या मनात कुतुबमिनारला हात लावायचे होते... हात अगदी कुतुबमिनारच्या जवळ नेला, पण दोन इंचावरच थांबला. कितिही प्रयत्न केला तरी पुढेच होईना... वाटलं, थोडाजरी धक्का लागला तर हे अविस्मरणीय रेखीव शिल्प ढासळेल.... जीव झालाच नाही हात लावायचा...
परत येताना इतकं हुरहुरल्यासारखे वाटले... जणु जुनी वास्तू माझ्याशी बोलणार होती, मीच कच खालली....
जाणार आहे मी पुन्हा त्याला भेटायला.... Happy

जिप्स्या रागाऊ नकोस, पण जरा जास्तच एडीट केलेस असे वाटतेय. रंग नैसर्गिक वाटत नाहीत.
(केवळ तूझे फोटो आहेत म्हणून धाड्स केले रे बाबा. )

दिनेशदा, मग जेम्स बाँडनी टाकलेले नैसर्गिक वाटतायत का? Proud

अँगल तर छान आहेतच पण क्लॅरिटी इतकी जबरी आहे की ग्लासमधून बाहेरचं दृश्य बघतोय की काय असं वाटतय. सुंदर फोटो! Happy

प्रतिसाबादाबद्दल धन्यवाद!!! Happy

१ ल्या फोटोचे Exif काय?>>>>अजय हि Exif info Happy
Shutter Speed - 1/256 sec
Lense Aperture - F9.6
Focal Length - 18mm
F Number - F/10
Exposure Time - 1/250 sec
ISO - 100
Camera Model - Canon 550D
PP - Auto Contrast, Border and Watermark.

जेम्स बाँड दुसर्‍या फोटोचा अँगल खुप आवडला. Happy

पण जरा जास्तच एडीट केलेस असे वाटतेय. रंग नैसर्गिक वाटत नाहीत.
दिनेशदांशी सहमत....>>>> दिनेशदा, आशु या फोटोंवर फक्त Auto Contrast केलाय फोटोशॉपमधुन. आम्ही गेलो त्याच्या आदल्या दिवशी दिल्लीत मुसळधार पाऊस पडुन गेला होता आणि कदाचित त्यामुळेच दुसर्‍या दिवशीचे वातावरण खुपच क्लियर होते. त्यामुळेच हे सगळे रंग उठुन दिसत असतील. Happy काहि फोटोंसाठी मी सीपीएल फिल्टर वापरला पण निळा रंग खुपच गडद होत होता म्हणुन काढला. पुढच्या भागातही आकाशाच्या अशाच रंगाचे फोटो आहेत (लोटस टेम्पलचे).

धन्स वैद्यबुवा Happy

Pages