Submitted by मयुरेश साने on 13 July, 2012 - 15:49
आठवांचा गाव आल्यावर असे चालायचे
आसवांच्या स्वागताला हुंदक्यांनी यायचे
आपले नाते जणू की पान गळतीचा बहर
मी तुला माळायचे अन् तू मला टाळायचे
तान मुरक्या शब्द सारे चांगले असले तरी
फक्त आलापात असते जे खरे सांगायचे
लावला नाहीस तू ओठी जरी प्याला कधी
पण तुझ्या ओठात माझे जन्म फेसाळायचे
साद होती बोलकी पडसाद होता बोलका
पण तरी हातात नव्हते हात हाती घ्यायचे
.... मयुरेश साने
गुलमोहर:
शेअर करा
आपले नाते जणू की पान गळतीचा
आपले नाते जणू की पान गळतीचा बहर
मी तुला माळायचे अन् तू मला टाळायचे
लावला नाहीस तू ओठी जरी प्याला कधी
पण तुझ्या ओठात माझे जन्म फेसाळायचे
>>
वाह
थँक्स ...रीया
थँक्स ...रीया
मतला चांगला झालाय, काही सुटे
मतला चांगला झालाय, काही सुटे मिसरेही छान!
संपुर्ण गझल छान आहे
संपुर्ण गझल छान आहे
वाह! मतला मस्तच आहे! खूप
वाह! मतला मस्तच आहे! खूप आवडेश
साद होती बोलकी पडसाद होता बोलका >> >> साद होती बोलकी प्रतिसाद होता बोलका.. असे वाचून पाहिले
शाब्बास रे माझ्या वाघा
शाब्बास रे माझ्या वाघा !!!!
मस्तच जमवलसच