फोनिक्स बद्दल माहिती

Submitted by इंद्रधनुष्य on 12 July, 2012 - 06:45

http://phonicsforkids.net/

फोनिक्स बद्दल चर्चा

'अबॅकस मॅथ्स' बाफ वर''फोनिक्स' बद्दल झालेली चर्चा इथे देत आहे.

.अदिती. | 12 July, 2012 - 15:23
0Vote up!आतापर्यंत मी माझ्या मुलांना जाणिवपूर्वक अबॅकस ला टाकले नव्हते. कारण गणिताचा पाया समजून पक्क बसावा अशी अपेक्षा होती.
मुले मोठी झाल्यावर(१०+) टाकण्याविषयी कोणाचा काही अनुभव आहे का? मला फक्त त्यांचा वेग वाढवायला आणि क्रॉस चेकींग जलद व्हायला मदत होईल असे वाटते. (पण तो वाढीव होमवर्क करुन घेण्याची ताकद नाही )

मंजूडी ४-५ वर्षी फॉनिक्स ला घातलेस एखादे वर्ष तर फायदा होईल. माझ्या मुलाला झाला होता. स्पेलींग्स आणि वाचायला मदत होते. मी माझ्या एका मैत्रिणीकडे ४-५ महीने पाठवत होते त्यामूळे कुठच्या क्लासचा अस अनुभव नाही.फॉनिक्सची बरीच पुस्तके मिळतात, ती वापरुन तू शिकवलेस तरी चालेल असे वाटते.

monalip | 12 July, 2012 - 15:25
0Vote up!मंजूडी आजच मी एक पुस्तक घेतले आहे. बॅगेतच आहे. भेट संध्याकाळी हवे तर.
अदिती, कसे शिकवितात त्या क्लासला. मेथड काय असावी? मी लेकाला ए सेज अ‍ॅ अ‍ॅ असे करत स्पेलिंग वाचायला बसवले की तो माहितीतले स्पेलिंग पहिली दोन अक्षरे फोनिक्स प्रकारे वाचुन सरळ शब्द म्हणुन मोकळा होतो. (यासाठी माहिती असलेल्या शब्दांच्या पानांचाच आभ्यास करतो )

मोहन कि मीरा | 12 July, 2012 - 15:30
0Vote up!मंजूडी...

माझ्या मुली च्या शाळेत ( ठाण्याला ए.के.जोशी) ज्यु. पासुन प्ले वे मेथड आहे. ती साधारण पणे ते २री पर्यंत टिकवतात. ३-४थीत बराचसा मेन स्ट्रीम ला यायचा प्रयत्न करतात आणि ५वी पासुन एकदम मेन स्ट्रीम ला उडी मारतात.

ह्या प्रवासात फोनिक्स प्रकाराला अतोनात महत्व आहे. माझी मुलगी इंग्रजी "ए,बी,सी,डी" अशी आणि स्पेलींग करणे ह्या प्रकाराने नाही शिकली... त्यांना सगळे "साइट वर्ड्स" असायचे. स्पेलींग्ज पण फोनिक्स पध्ध्तिनेच शिकवली. पहिले पहिले आम्हाला फार त्रास झाला. पण शाळेने पालकांना जाणीव पुर्वक अभ्यासा पासुन दुर ठेवले होते. सध्याही फॉर्मेटीव्ह पध्धतित पालकांना फार सांगत नाहीत. कारण त्यांचा अनुभव असा आहे की मुलांना व्यवस्थीत समजत... पालक च गोंधळ घालतात....( हे कधी कधी खरं पण असतं)

त्याचा फायदा आता ६ वीत जाणवतो आहे. तिला कुठलच स्पेलींग अडत नाही. अगदी आता "होमी भाभा सायंन्स च्या अभ्यासातही तिला कठीण कठीण स्पेलींग्ज अडत नाहीत. ती वाचतेही खुप.

फक्त ह्या पध्धतित मराठी आणि हिंदी शिकवल्या वर मात्र आमची बोंब झाली.... कारण नुसत्या साईट वर्ड्स नी ह्रस्व - दीर्घ कळत नाही.... ट, ठ, ड, ढ, चा भयानक घोळ होतो. आर्थात ही टीदिंग फेज ३री ४थी त जाते.

मंजूडी | 12 July, 2012 - 15:33
0Vote up!फोनिक्स शिकवावे का?/ कसे शिकवावे? याबद्दल मला काहीच म्हणायचे नाहीये.

वर मोकिमी म्हणाली तसं फोनिक्स हे एक एक्स्ट्रा लर्निंग टूल खरंच आहे ना? आणि त्याचा अ‍ॅबॅकसप्रमाणे (पायर्‍या गाळल्या जाणे) काही गैरफायदा होत नाही ना? इतकेच मला जाणून घ्यायचे आहे. कोणाला काही अनुभव असल्यास कृपया लिहा.

होय, होय, मोकीमी! नीरजेच्या शाळेतही याच पद्धतीने शिकविले जाते. पण अक्षरे आणि उच्चार त्यांना फक्त ज्यु-सि. मधे शिकवले. आता थेट स्पेलिंग चालू केली आहेत. त्यामुळे ज्यु-सि च्या वरच्या लेव्हलसाठी तिला फोनिक्सच्या क्लासला घालावे काय या विचारांत मी आहे, तोच विचार मला पक्का करून घ्यायचा आहे

प्रतिसाद सावली | 12 July, 2012 - 15:42
0Vote up!मंजूडी, फोनिक्सचा फायदा आहेच. पण नुसते फोनिक्स चे उच्चार शिकवत असतील तर नाही. त्यावरुन वाचायलाही शिकवले पाहिजे. आता शाळेत बर्‍याच मुलांना फोनिक्स माहीतेय पण वाचायचे कसे ते नीट कळत नाहीये. मोकिमी म्हणाली ते बरोबर आहे. फोनिक्स ने शब्द वाचा लिहायची सवय झाली की स्पेलिंग पाठ करावी लागत नाहीत. इतर मुलांना होणारा स्पेलिंग पाठांतराचा त्रास आताच जाणवतोय मला . शिवाय पालकांबद्दल सुद्धा मोकिमी चे बरोबर आहे.
हवे असल्यास फोन करणे सविस्तर बोलु.

प्रतिसाद सस्मित | 12 July, 2012 - 15:44
0Vote up!मंजुडी माझी मुलगी फोनिक्स ला जाते. आताच मागच्या महिन्यापासुन सुरु केलय. तिलाही अक्षरे आणि उच्चार फक्त ज्यु-सि. मधे शिकवले. आता थेट स्पेलिंग चालू केली आहेत. म्हणुन अ‍ॅडीशनल फोनिक्स्/फोनेटिक्स. स्पेलिंग्स्+रीडीन्ग साठी. मला नाही वाटत त्याने काही गैरफायदा होत असावा. तरी अनुभव शेअर करा लोक्स.

प्रतिसाद सावली | 12 July, 2012 - 15:48
0Vote up!फोनिक्स चा नवा धागा काढा. तिथे लिहिते. हा धागा हायजॅक होतोय

तर करा चालू...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी लेक २-३ अक्षरांचे शब्द जसे बॅट, पिग, पिन ईई वाचायची. पण ४ वा त्यापेक्षा जास्त अक्षरी शब्द वाचायचा कंटाळा करायची. फोनेटीक्स ज्यु-सि ला झाले होते. पण बेताचेच. तिचा वाचण्याचा कंटाळा बघुन मी फोनिक्स क्लास लावला आहे. १ च महीना झाला आहे. तिच अगदी बसिक पासुन सुरु केलय. फोनेटिक्स उच्चार वै. २-३ लेटर्स वर्ड्स वै. मग २-३ लेट्र्स असलेली स्टोरी वाचुन घेतली. हे सगळ तिला जमतच होत. आता खरी सुरुवात होणारे.
तिच्या कोर्स मध्ये
१. २-३ लेटर्स वर्ड्स, २-३ लेटर्स साईट वर्ड्स, २-३ लेटर्स वर्ड्स, २-३ लेटर्स साईट वर्ड्स असलेली स्टोरी. सेंटेंस मेकिंग.
२. ३ नी त्यापेक्षा जास्त लेटर्स असलेले शब्द + स्टोरी रीडींग+ सेंटेंस मेकिंग.
३. जोडाक्षरे+ स्टोरी रीडींग+ सेंटेंस मेकिंग.
४. शब्दांचा योग्य उच्चार +अर्थ (स्टुडेन्टच्या भाषेत)
५. हे सगळ पार पडल्यावर मग फुल फ्लेज रीडींग
६. मग नॅरेशन.

अजुन आठवेल तसं लिहिन.

आला आला धागा आला.

फोनिक्स मध्ये प्रत्येक इंग्रजी अक्षराचे उच्चार शिकवतात. त्यानंतरची स्टेप म्हणजे er , ne वगैरे असे उच्चार शिकवतात. नुसते उच्चार शिकवुन कसे वाचायचे हे काही मुलांना कळत नाही. त्यासाठी हळु हळू मोठ्या फाँटमधली पुस्तके किंवा मुद्दाम फोनिक्स वर आधारीत पुस्तके वाचायला देऊन वाचनाची सवय करावी. नंतर वाचता आल्यावर हळुहळू लिहायची सवय आणि फोनिक्स प्रमाणे शब्द घेऊन मुलांना स्वतःलाच स्पेलिंग करायला सांगायची. स्पेलिंग अडले तर उच्चार सांगायचा अक्षर नाही.
माझी मुलगी आठवड्यातुन दोन वेळा इंटरनॅशनल स्कुल मधे जात होती तेव्हा तिथे फोनिक्स शिकली. तिथेच मोठ्या क्लासचे पाहुन तिने वेळेआधी वाचायला सुरुवात केली. त्यामुळे मी तिच्या टिचरला विचारुन मी काय करायला हवे ते विचारुन घेतले ( कारण आम्ही इथे परत येणार होतो) वर दिलेली माहीती त्यातुनच दिली आहे.
( मुलगी व्यवस्थित वाचते आणि स्पेलिंगचा अजुनतरी प्रॉब्लेम येत नाहीये)

इथल्या मुलीच्या शाळेत मुलांना फोनिक्स शिकवलेले आहे असे बरेच पालक म्हणत आहेत. आणि तेच पालक मुलांना वाचता येत नाही आणि स्पेलिंग पाठ करणे कठीण जातेय हेही सांगत आहेत. ( मी पिटीए मेंबर असल्याने माझ्याकडे तक्रारी येत आहेत त्यामुळे हे कळतेय) म्हणजे या शाळेने फोनिक्सप्रमाणे उच्चार शिकवलेत पण वाचायला शिकवलेले नाही असे मलातरी वाटते. मी मिटिंग मधे टिचर्स शी बोलले तर १लीमधल्या मुलाला वाचता येऊ शकते हे अ‍ॅक्सेप्ट करणे पालक आणि टिचर दोघांना कठीण गेले Sad ( पण इंटरनॅशनल स्कुल मधल्या ५/६ वर्षाच्या मुलाला फोनिक्सच्या आधारे बर्‍यापैकी वाचता येते - सगळ्याच शब्दांचा अर्थ कळणार नाही. )

म्हणुन फोनिक्स क्लास लावताना तिथे वाचन शिकवतात का याची चौकशी करुन मगच लावा.

दुसरा एक मुद्दा म्हणजे आपले थोडे उच्चार वेगळे आहेत. त्याप्रमाणे काहिवेळा स्पेलिंग्ज होत नाहीत. तिथे मुलं थोडी गडबडु शकतात. पण सवयीने होईल ते.

हि वेबसाईट अतिशय चांगली आहे.
http://www.starfall.com/

स्टेपवाईज जा. आधी ए बि सी येते म्हणुन स्टेप १ स्किप करु नका. याने पुस्तके वाचता येऊ शकतात. दोन चार दिवसातुन एकदा अर्धातास केलं तरी पुरेसे आहे. मुलांबरोबर आपलाही अभ्यास होतो.

हे राहिलंच -
वेबसाईट दोन चार दिवसातुन पाहिली तरी वाचता येण्यासारखी पुस्तके नेहेमी समोर असु देत.
ठाण्यात संजय बुक डेपो आहे तिथे फोनिक्स म्हणुन एक बोर्ड बुक मिळते त्यात उच्चाराप्रमाणे शब्द आहेत. प्रत्येक पानावर एका उच्चाराचे शब्द. हेच माझ्याकडे तिथे घेतलेले होते.
त्यानंतर अल्का पब्लिकेशनची बोर्ड बुक्स तिथे मिळतात. एका पानावर दोन तीन वाक्य फक्त. मोठे फाँट.

www.starfall.com ही अंत्यत सुंदर वेबसाइट आहे, नेट सर्फिंग करतान ही वेबसाइट मिळाली व मी एकदम फॅन झाले या वेबसाइटची, आधी फ्रि असलेला भाग मुलाला दाखवत राहायचे नंतर त्याचा चांगला उपयोग होतो आहे बघितल्यावर सरळ मेंबरशीप घेउन टाकली ......... माझा मुलगा (३ वर्ष) अंत्यत आवडीने ही वेबसाइट बघतो. त्याला आपला अभ्यास चालु आहे असे वाटतच नाही, उलट आईने त्याला लॅपटॉपवर खेळायला परवानगी दिली आहे म्हणुन तो खुशीत त्यातील वेगवेगळे भाग बघत असतो. या वेबसाइटमुळे त्याला A to Z अक्षरे, नंबर्स, रंग, गाणी खुप सारया गोष्टी सहजपणे कळु लागल्या, मला वेगळे बसुन काही शिकवावे लागले नाही....... तो थोडा लहान असताना त्याला मांडीवर बसवुन मी अलफाबेटस, नंबर्स दाखवायचे, आता तो स्वतःहुन लॅपटॉप चांगला हाताळतो. सध्या त्याला अक्षरापेक्षा लहान लहान शब्द वाचायला आवडतात जसे cat, mat, rat .

धन्यवाद सावली, वर्षा Happy

स्पेशल क्लास न करता Starfall.com आणि पुस्तकांच्या माध्यमातून फोनिक्स शिकवणे सहज शक्य आहे असे वाटते.

वर्षा , मी अजुन मेंबरशिप घेतली नाही. फ्री भागातही खुप काही आहे. त्यामुळे ते करुन झाले कि मग मेंबरशिप घेईन कदाचित. आमच्याकडे कॉम्प टाईम इतका देत नाही तीला अजुन.
इंद्रधनुष्य, नक्कीच शिकवता येईल. आधी आपल्याला अभ्यास करावा लागेल थोडा. पण सगळ्याच पालकांकडे तेवढा वेळ असेल असेही नाही.

सतिश... धन्यवाद!

इंद्रा, फोनिक्स शिकवण्याचे मला वाटतं एक विशिष्ट तंत्र आहे. त्या तंत्रानुसारच मुले शिकली तर त्यांना फायदा होईल.

सतिश धन्यवाद

सावली, मंजू अगदी बरोबर... सतिशने दिलेल्या माहिती नुसार जर आपण अक्षरांचे उच्चार शिकलो तर पालक आणि पाल्य दोघांना फायदा होईल.

my 2 cents:माझी मुलगी phonics ने वचायला शिकली. मला ही पध्धत फार आवड्ली पण नीत पणे शिकवण्या साठी लागणार complete material सगळी कडे मिळात नाही उदा.

  1. Short Wowel Sounds म्हणजे शब्द जेथे A च उच्च्चार अ‍ॅ होतो जसे cat mat. पटकन शिकवले जातात आणि मुल ते पटकन pick up कर्तात
  1. Problem long vowel ल येतो words जेथे A च उच्चार ए होतो आणि E cha uchchaar इ होतो उदा car , far, cake

या सठि लागणारे नियम पण शिकवले तर मुल phonics वप्रून पटकन वचायला लागतात. 2 vowels असणार्या शब्दात एक vowel gives long sounds and other goes sillent. असे अनेक रूल्स आहेत आणि तो curriculam नीट शिकवला तर ते सगळे नीट शिकवले जातात.
Starfall वर बरेच रूल्स नीट दिलेले आहेत. पन त्यापेक्शा बरे resources मिळाले तर इकदे लिन्क टाकते

शिरीन

मस्त धागा इंद्रधनुष्य. मला खूप गरज होती ह्याची. माझ्या लेकीच्या शाळेत ती बालवाडीत असताना एक वर्ष शिकवल होतं त्यामुळे ती मराठी माध्यमात शिकत असुनही तिच वाचन तिच्याबरोबरच्या इंग्रजी माध्यमाच्या मुलांपेक्षा खूप चांगल आहे. म्हणुनच मला ह्याबद्द्ल मिळेल तितकी माहिती हवीच आहे.सध्या ती आठ वर्षांची आहे, मला तिला क्लासला घालायचे नाही आहे. मीच शिकवेन तिला घरीच. सध्या मर्केटमधे मिळणारी पुस्तकं आणली आहेत पण ती तिला खूपच सोप्पी वाटतात. ती म्हणते हे सगळ येते मला म्हणुनच नविन शोधत होते काही तरी. सावली तु सांगितलेलं पुस्तक इथे मुंबईत कुठे मिळालं तर पहाते. वर सांगितलेली वेबसाईट वापरुन झाली आहे. शिकवण्यासाठी कोणती पुस्तकं किंवा साईट उपयोगी होइल हे पण सांगाल का, प्लीज?

फोनिक्स चा फायदा आहेच.. पण सावली+१.. त्यातून वाचायला शिकले पाहीजे, नुसते साऊंड्स माहीत असून उपयोग नाही.. आधी वेगवेगळे साऊंड्स, मग साऊंड मिक्सिंग, शॉर्ट आणि लाँग साऊंड्स हे सगळे नीट शिकवले तर मुलांना सोपे जाते..
मुलीच्या शाळेतच तसे शिकवले होते त्यामुळे क्लास लावायचा अनुभव नाही.

सावली, धन्यवाद. छान पोस्ट.
स्टारफॉल साइट मस्तच.
फोनिक्स शिकण्याचे वेगळे क्लासेस असतात हे आजच कळलं.
स्वाती२, साइट छान आहे. धन्यवाद.

आम्ही वेळ नाही ह्या पालक गटातले आहोत आणि लेक ४ वर्षे पार ह्या वयोगटात आहे.

मी लेकीला १ महिन्यापासून लक्ष्मीनारायण (ठाणे) इथे फोनिक्सच्या क्लासला घातले आहे. तिला तिचे वाचता यावे हा माझा एकमात्र हेतु आहे. एका महिन्यात याबद्दल मत बनवता येणार नाही.

ही टिचर तिच्या पूर्वीच्या प्रिस्कूलमधली असल्याने निमो तिथे रमली आहे.

टिचरने तुम्ही (प्लीजच) अभ्यास घेऊ नका असे सांगितले आहे, जे आम्ही (वेळेअभावी) पाळतोच. तरी रात्री वेगवेगळ्या भाषेतल्या गोष्टी साभिनय वाचून फक्त दाखवते.

लेक सध्या डी.ए.व्ही. - ठाणे शाखेत आहे. येत्या ओपन डेला लेकीची प्रगती आणि त्यांची शिकवण्याची पद्धत ह्याबदल विचारेनच. मला फक्त एवढाच प्रश्ण आहे की शाळेतली पद्धत आणि क्लासची पद्धत वेगळी असेल तर लेक गोंधळेल का?

पुढे पुढे फोनिक्स्ची प्रगती कळवेन.

फक्त एवढाच प्रश्ण आहे की शाळेतली पद्धत आणि क्लासची पद्धत वेगळी असेल तर लेक गोंधळेल का?>>>

जाईजुई, इथल्या शाळांमधे 'फोनिक्स' हा विषय करीक्युलममधे नसतो. एकंदर बघता, जिथे शिकवण्यासाठी 'प्ले वे' पद्धत वापरली जाते त्या ठराविक शाळांमधेच 'फोनिक्स' हा विषय एक्स्ट्रा लर्निंग टूल म्हणून शिकवला जातो, पण अगदीच प्राथमिक पातळीवर. मी वर लिहिल्याप्रमाणे नीरजेच्या शाळेत ज्यु.- सि. केजीमधे फोनिक्स शिकवले पण ते इग्रजी अक्षरे आणि त्यांचे उच्चार एवढेच. स्पेलिंग कशी बनवायची हे अजून शिकवलेले नाही, आणि आता ज्या वेगाने इंग्रजी शिकवत आहेत तो बघता ते शिकवतील असे वाटतही नाही. त्यामुळे शाळेत शिकवले जाणारे फोनिक्स आणि क्लासमधे वयाप्रमाणे लेव्हलनुसार शिकवले जाणारे फोनिक्स यात खूपच फरक असेल असे वाटते आहे. तुझ्यासारखाच प्रश्न मलाही पडल्याने मी तिला ज्यु. - सि. केजीत असताना फोनिक्सला घातले नव्हते, ते का घातले नाही? असा मला आता पश्चात्ताप होतो आहे. पण आता ती जाते आहे आणि एका महिन्यातच बेसिक कव्हर करेल असे टीचरनी सांगितले आहे त्यामुळे बेटर लेट दॅन नेव्हर असे मी म्हणते आहे Happy

छान माहितीपूर्ण चर्चा. Happy

सीबीएसई बोर्डाच्या शाळेत फोनेटिक्सप्रमाणे सावलीने सांगितले तसे स्टेप-बाय-स्टेप शिकवत असावेत. कारण आदित्यला उच्चार-स्पेलिंग-रिडींग यात कधीही काहीही प्रॉब्लेम आला नाही. (इन फॅक्ट, या गोष्टींकडे मला कधीही लक्ष द्यावं लागलंच नाही.)
आपल्या मराठी माध्यमातल्या इंग्रजी शिक्षणाला अनुसरून मी कधीतरी त्याला 'स्पेलिंग पाठ कर' म्हणायचे. तर तो माझ्याकडे विचित्र नजरेनं पहायचा. ते मला आठवलं. Lol

माझ्या मुलींच्या शाळेत ३ री पासुन एक वेगळा अभ्यासक्रम शिकवतात इंग्रजीचा, तो पुर्ण पणे फोनीक्स वर आधारीत आहे अगदी सुरुवातीला a to z चा एक स्वर आणि व्यंजनांवर आधारीत एक चार्ट दिला जातो त्याला माअ‍ॅजिक चार्ट असे म्हणतात , माझ्या दोघिहि मुली सेमि इग्लीश ला आहेत मोठि ९ वी ला आहे ह्या अभ्यास क्रमामुळे तीला कधीहि स्पेल्लिन्ग पाठ करावे लागले नाहि , Reading and Writing,Listening,Speaking ह्या वर आधारीत परिक्षा असतात ,तिला डिस्टीन्शन मिळाले त्यात. छोटी ३ री ला आहे ती ही आवडीने करते अभ्यास ह्याचा! www.cambridgeesol.org/ हा तो अभ्यासक्रम .ह्याची पुस्तक वैगरे पण वेगळी आहेत ती शाळाच देते( पुर्ण अभ्यासक्रम शीकवण्याचे तसेच स्ट्डी मटेरीलचे वेगळे पैसे घेते) बाहेर मिळ्त नाहित पार्ले टिळ्क शाळेतही हाच अभ्यासक्रम शिकवतात जेव्हा Listening ची टेस्ट घेतली जाते तेव्हा सीडी एकवतात त्यात संवाद असत्तात शब्दांचे उच्चार ब्रीटीश असत्तात आवाज ही कमी असतो ते संवाद एकुन लगेचच समोर जे ३ किंवा ४ परीक्षक बसले असतात त्यांच्या प्रश्नंची उत्तरे द्यायची असतात (संवादावर आधारीत) आपल्याला ती एकुण परीक्षा कठिण वाट्ते मात्र मुल बरोबर करतात , कारण त्यांना सुरुवाती पासुन्च त्या पद्धतीने शिकवीलेले असते