मुलांना लिहायला शिकवण्यासाठी - योग्य वेळ, पद्धत ?

Submitted by सावली on 27 June, 2011 - 21:56

मागे मराठी मुळाक्षरे, बाराखडी, शब्दवाचन शिकवण्याची सुरुवात
या धाग्यावर मराठी वाचनाचा प्रश्न विचारला होता. आणि त्यावर छान उत्तरेही मिळाली होती. लेक आता थोडफार वाचते आहे. Happy

आता लिहायचे शिकवण्या संबंधी प्रश्न आहे. हा इंग्रजी आणि मराठी दोन्ही लिखाणासाठी आहे.
१. लिहायला शिकवायला योग्य वय काय?
२. शाळेत पहिलीला लिहिता येणे खरच अपेक्षित असते का? कितपत?
३. लिहायला शिकवायला कशी सुरुवात करावी?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> ज्युनियर केजीचा अभ्यासक्रम >>रैना, मी सायोने टाकलेला अभ्यासक्रम वाचला...त्यामुळे कन्फ्युझन Happy मी विचारला नाही पुर्ण अभ्यासक्रम, विचारुन घेईन Happy

माझी मुलगी ६ वर्षाची आहे. पहिलीत आहे. तिच्या शाळेत पण ज्युनियर के जी पासुन a b c d सुरु झालं.
माझ्या अनुभवावरुन मी एक नक्की सांगु शकते की इतक्या लहान मुलांचा अभ्यास २०-२५ मिनीटांपेक्षा जास्त घेऊ नये. रोज घ्यावा पण जास्तीत जास्त २५ मिनीटे. या २५ मिनीटांमधे त्याच्या पेन्सीलचं टोक तुटतं, खोडरबर हरवतं, त्यांना शु लागते, त्यांचं मित्रमंड्ळ २ वेळा तरी दार वाजवुन जातं तरीही २५ मिनिट्च घ्यावा. त्यामुळे निदान त्यांना त्यापासुन पळुन जावसं वाट्त नाही. त्यांचा पेशन्स तेवढ्याच वेळेचा असतो (आणि आपलाही Happy ).

शाळेत पहिलीला लिहिता येणे खरच अपेक्षित असते का? कितपत? >> स्वप्नाली, पहिलीत लिहीता यायला हवे असणार साधारणत: भारतातील शाळांमध्ये.

लिहायला शिकवायला कशी सुरुवात करावी?>> इकडे ते Standing Lines / Sleeping Lines/ Slanting Lines अशांच्या combinations मध्ये लिहायला शिकवतात पहिले कॅपिटल लेटर्स. मग हळुहळु चौकोन आखलेल्या वह्यांमध्ये अक्षरे गिरवायची आणि मग काढायची.

सायली Lol खरंय.

CBSE \ ICSE चे अभ्यासक्रम भारतात कुठेही सारखेच असतात>> नसतात बहुतेक. ते शाळेवर अवलंबुन असते म्हणे >>> अनुमोदन.

पाल्याच्या (ICSEची ग्रॅण्ड नसलेल्या परंतू त्यासाठी प्रर्यत्नशील असलेल्या) शाळेत ज्यु. केजी साठी फक्त कॅपिटल A to Z लेटर्स आणि 1 to 20 अंक ओळखणे आणि लिहणे, तसेच स्मॉल लेटर्स ओळखणे एव्हढाच अभ्यासक्रम आहे. बाकीची जुळवाजुळव अजुन तरी नाही.

सावली आमच्याकडे २५ मि. १० वेळातरी सुशीचा पाढा म्हटला जातो. :p

सावली, तू मुलीला मुळातच एक वर्ष मागे ठेऊ शकतेस ना? म्हणजे, जर ती ५ व. ची असेल तर सर्वसाधारण शाळंच्या नियमाप्रमाणे सि. के. जी. ला जाईल, तर तू तिला ज्यु. ला घालू शकतेस म्हणजे मग एकदा सुरू केल्यावर रिपीट करायचा प्रश्नच नको.
माझा मुलगा आत्ता २.५ झाला, तर CBSE शाळा त्याला नर्सरीला घ्यायला तयार होती, पण मी त्याला खाजगी प्लेग्रुप मधेच घातलय.

माझी लेक ठाण्याला रेनबो मध्ये होती.. प्लेगृपला त्यांनी खेळा खेळात आकडे नि अक्षरे शिकवली, रंग शिकवले.. गाणी शिकवली. आम्ही घरी भरपूर रंग, क्ले, गाणी आणि झिगसॉ पझल्स खेळायला दिली.. पियानो, ड्रम हे पण तिच्या खेळण्यात आहेत.. (वादनात नाही खेळण्यात)

आता नर्सरीला शाळेची अपेक्षा १ ते २० आकडे लिहिणे आणि मोजणे, जोड्या जुळवणे अशी आहे.
फक्त सरळ रेषांची अक्षरे (H, T, I, L, E, F) दिवाळीपर्यंत लिहिता येणे अपेक्षित आहे. ती आता ३ वर्षे ५ महिने वयाची आहे.. नि तिला १ ते १० आणि A to Z इंग्रजी मुळाक्षरे कॅपिटल येतात. दरवेळी सगळीच आठवतात असे नाही पण येतात. Happy

सध्या मी युकेत भारतातला करीक्युलम फॉलो करतेय.

तिला रंग देऊन गिरबटायला सांगते.. मग त्यातून वेगवेगळे आकार, प्राणी, अक्षरे शोधून काढायची, असे खेळ खेळते. क्लेची अक्षरे बनवायची नि त्यावरून बोटे फिरवायची असे करते. शाळेने "आल(च) पाहिजे" हा अ‍ॅटीट्यूड ठेवणार असाल तर तुम्ही शिकवू नका असे सांगीतलेय. Proud

सध्या मी पुस्तक वाचन (म्हणजे मी वाचायच) आणि तिने मराठीत ती गोष्ट सांगायची अस करतेय.. गोष्ट सांगताना पहिल्यावेळी मराठीतही सांगते.. नंतर हळू हळू इंग्रजीत. तिला अजुन इंग्रजी संभाषण समजत नाही नि बोलताही येत नाही.

तिची सध्याची प्रगती समाधानकारक आहे (समाधानकारक = वयाच्यापेक्ष खूप हुषार, समज असे नाही, तिच्या बरोबरची भारतीय आणि भारतातली मूले इंग्रजी फर्ड बोलतात आणि सगळ्या जगभरातल्या राजधान्या वै. सांगतात, १ ते १०० आकडे ओळखतात.)
मला आता तिला वाचायला शिकवायचे आहे नि पुढचे अंक शिकवायचे आहेत..
वाचनासाठी वर दिलेली साईट बघते आता.
अंक शिकवायला कोणी मदत करू शकेल का?

चिरंजीवांना ज्युकेत कर्सिव्ह रायटींग असणार आहे, ते आमच्याकडे कोणालाही येत नाही त्यामुळे ते कसे करुन घ्यायचे हा प्रश्नच आहे.
हे इतर शाळातही आहे काय?

आगाऊ, अरे शिक्षक ना तू?? Wink विकास आणि नवनीतची पुस्तके आणि थोडेदिवस गिरव. आपोआप जमेल. Light 1

बहुतेक शाळातून कर्सिव्ह फारच लवकर् चालू करतात, असे माझा अनुभव. त्यात परत ज्याच्या घरात इंग्लिश बोललं जात नाही ती मुले सर्वच काही ट्रान्स्लेशनमधून शिकतात. उदा. बिग म्हणजे मोठा इत्यादि. त्यामुळे त्याच्या चिमुकल्या मेंदूत किती गोंधळ उठत असेल याची मला कित्येकदा कल्पनाच करवत नाही.

ज्याची इंग्लिश ही मातृभाषा आहे त्याच्या दृष्टीने डीझाईन केलेला अभ्यासक्रम सर्रास भारतात बहुतेक ठिकाणी वापरला जातो. अगदी नर्सरी र्‍हाईम्ससकट. मुलाना काय म्हणतोय ते समजतच नाही, उच्चार चुकीचे असतात... शिक्षण बोर्डाला मुलाच्या अनुभव विश्वाशी सुसंगत अशी पाठ्यपुस्तके बनवता येत नाहीत का? त्याना समजेल, रूचेल अशा पद्धतीने शिकवताना कितीतरी मजा येते, एखादी नविन गोष्ट समजल्यावर त्याच्या चेहर्‍यावर येणारा आनंद आपण कुठल्या मार्काच्या तराजूत मोजणार? पण नाही, त्याना समजू दे अथवा समजू दे नको. वहीत/पेपरात लिहिता आले तरी बास.

इंग्रजी पहिलीपासून चालू केलं होतं तेव्हा एका मराठी शाळेच्या शिक्षकाने अ‍ॅपल पाय म्हणजे सफरचंद घालून बनवलेला ब्रेड असं सर्वच मुलाना पाठांतराला दिलं होतं. ते वाचून मला चक्करच यायची शिल्लक होती. (तेव्हा मी वर्तमानपत्रात कामाला असल्याने या सर्व घोळाची एक मस्त बातमी केली होती. नंतर कित्येक पालकाची या विषयावर पत्रे आली)

आज या चिमुरड्याना केम, लेम, सेम, नेम, टेम अशी पाच स्पेलिंग्स पाठांतराला.... तरी फ्लेम ब्लेम उद्या करून घेइन.

माझा पोरगा नुकताच तिन वर्षाचा झालाय. इथल्या नियमाप्रमाणे जर फेब मध्ये ३ पुर्ण असतिल तरच नर्सरीमध्ये अ‍ॅडमिशन मिळते. त्यामूळे तो यावर्षीसुद्धा प्लेग्रुपमध्येच जाईल. गेल्या सहा महिन्यांपासून जातोय प्ले ग्रुप्मध्ये.

सध्या तरी त्यांच्या शाळेत वेगवेगळ्या हिंदी आणि इंग्रजी कविता, अल्फाबेट्स, १ ते १० आकडे, बारा महिने, आठवड्यातले दिवस, भाज्या, फळे इ.इ. च आहे. त्यातही सगळा भर अजून तरी नुसते चित्र दाखवून अक्षरांची माहिती देणे, आकडे मोजायला शिकवणे इतपतच आहे. गेल्या महिनाभरात त्याच्या हातात शाळेत क्रेयॉन्स दिलेत आणि रोज एका वर्तुळामध्ये रंग भरायला शिकवतात. घरी होमवर्क म्हणून पण एक वर्तुळ काढून त्यात रंग भरायला देतात. (त्याला अर्थातच त्यात रंग भरण्यापेक्षा क्रेयॉन्सनी रेघोट्या ओढून, त्रिकोण, गोल, क्रॉस, प्लस काढून वही भरवायला जास्त आवडते. :फिदी:) यावर्षी यापेक्षा जास्त काही शाळेत करुन घेतिल असे वाटत नाही. यातलं सुद्धा सगळं मुलांना आलंच पाहिजे अशी सक्ती नाहीये.

पुस्तकं वाचून दाखवताना त्याला पहिल्यांदा मराठीत वाचून दाखवते. मग त्याला जे शब्द समजत नाहीत त्यासाठी बर्‍याचदा गोष्ट हिंदीत सांगते. इंग्रजीचा वापर फक्त आणि फक्त वस्तूंची / प्राण्यांची वैगरे नावं सांगतानाच होतो. तो कोणताही नविन शब्द ऐकला की बाय डिफॉल्ट इसे मराठीमे क्या कहते है /हिंदी मे क्या कहते है /पंजाबी मे क्या कहते है आणि इंग्लिशमे क्या कहते है असा प्रश्न विचारतोच.

घरी अभ्यास असा काही घेत नाही मी. पझल्स वापरणे आणि जेवताना त्रास देत असेल तर त्याच्या जेवणाचे वेगवेगळे शेप्स बनवणे , अल्फाबेटस बनवणे इ. करतो. बाकी खेळ म्हणजे थोडफार रंगकाम, क्वचित कधीतरी क्ले बरोबर खेळणे, ड्रम, माउथ ऑर्गन वैगरे वाजवत बसणे आणि गाड्या घरभर पार्क करत रहाणे हेच असतात. Happy (मोठा झाल्यावर त्याला बुलडोझरचा किंवा ट्रॅक्टरचा ड्रायव्हर बनायचयं Happy )

Happy
@प्राची धन्यवाद.
@सायली , हो हो २५ मिनीटे पण फारच झाली Proud
@रैना , ह्म्म ,मला पण तेच वाटत होतं की अपेक्षित असेल. आता ते स्लाटिंग लाईन्स वगैरे पण बघेन.
@इंद्रधनुष्य, अभ्यासक्रम सारखे नाहीत आणि शाळेवर अवलंबुन आहे तेही बरय एका अर्थी. त्यातल्या त्यात चांगली शाळा बघता येईल. सुशीचा पाढा >> Lol
@अश्विनी डोंगरे, मी एका शाळेत विचारले ते नाही म्हणाले, पण मीही फॉलोअप केला नाही जास्त तेव्हा कारण लगेच अ‍ॅडमीशन घेणार नव्हतो. पण एनी वे अ‍ॅडमिशच्या वेळी शाळेचा अभ्यासक्रम बघुन ठरवुयात असा विचार करतेय. जर शाळा स्लो शिकवत असेल तर तिच्या वयाच्या मुलांबरोबर ठेवु, पण फार अभ्यास असेल तर घेताना ज्यु केजी मधे अ‍ॅडमिशन करु.
@जाईजुई, धन्यवाद Happy अंक शिकवायला (लिहायला नाही) मी काही खेळ दिले आहेत. इथे बघ आणि इथे आणि जास्तीचे इथे बघ
@आगाऊ, मलाही येत नाही कर्सिव्ह!
@नंदिनी, बापरे. <<ज्याची इंग्लिश ही मातृभाषा आहे त्याच्या दृष्टीने डीझाईन केलेला अभ्यासक्रम >> हे फारच वाईट आहे.
@अल्पना, Happy छान.

खरं तर हे थोडंसं विषयाला सोडून आहे. सीबीएसइ चा अभ्यासक्रम शाळेप्रमाणे बदलतो हे अगदी खरंय असं गेल्या काही दिवसात लक्षात आलं आहे.

माझी पुतणी डीएव्ही पब्लिक स्कुलमध्ये पंजाबमध्ये शिकतेय. ती सहावीत आहे. त्यांच्या शाळेत एकंदरच घोकमपट्टीवर जास्त भर आहे. तिच्यापेक्षा ४-५ महिन्याने लहान पुतण्या औरंगाबादला टेंडर केअर होम या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळेत ५वीत आहे.
यावर्षी पुतणीच्या आग्रहामूळे तिला औरंगाबादला शिकायला ठेवायचे ठरले. अजून तिची तिथल्या शाळेत अ‍ॅडमिशन झाली नाहीये. पण गेले १५- २० दिवस ती तिथल्या शाळेत जातेय. त्या शाळेतला अभ्यासक्रम आणि तिच्या पंजाबमधल्या शाळेतला अभ्यासक्रम यात असलेल्या फरकामूळे, शिकवण्यातील पद्धतीच्या फरकामूळे ती अगदी गोंधळून /घाबरुन गेली आहे. पूर्वी येत असलेल्या गोष्टीसुद्धा आता तिला जमत नाहीत करायला. साधी साधी गणितं करताना तिथे शिकवलेली पद्धत आणि इथे शिकवत असलेली पद्धत यात खूप फरक असल्याने ती गोंधळून जाते. तिथे सगळा भर घोकमपट्टीवर होता. याप्रकारची गणितं असतिल तर अशी सोडावयची असं मुलांना शिकवलेलं. असं का करायचं हे कधी सांगितलंच नाही आणि त्यामूळे मुलांना पण का विचारायची सवय नाही. तर औरंगाबादच्या या शाळेत सगळा भर संकल्पना समजवण्यावर. मुलांना स्वतः विचार करायची सवय लावलेली.

हा इतका बदल बघून ती आणि तिच्याही पेक्षा जास्त तिची आई घाबरलेली आहे. आईचं म्हणणं पडतंय, की हिला हे सगळं एकदम झेपायचं नाही. त्यात मी पण तिच्याजवळ इथे नसणार. मराठी भाषा पण माहित नाही. एक नविन भाषा शिकावी लागेल. त्यापेक्षा मी तिला परत घेवून जाते. इथली जुनी पुस्तकं बरोबर नेते आणि घरी तिची तयारी करून घेईन. जरा मोठी आणि अजून समजूतदार झाली की मग इथे पाठवेन. मुलगी इथून परत घरी जायचं हे ऐकलं की रडायला लागते. जर होमवर्क जमला नाही तर रडायला लागते. तिला तिथेच काकुजवळच शिकायला रहायचंय. शाळेतल्या शिक्षकांनी पूर्ण सहकार्य करु असं सांगितलं होतंच. येत्या काही दिवसात शाळेच्या मुख्याध्यापिकेची भेट होईल. ते त्यांची ऑब्जर्वेशन्स सांगतिल.

(काल जावेशी बोलल्यापासुन हे सगळं डोक्यात होतं. पुतणीला जर हा अभ्यास अवघड गेला तर ती खचून जावू नये यासाठी काय करावं? जर तिला इथेच शिकायचं असेल तर ती कदाचित एक वर्ष मागे पडेल हे आम्ही मोठ्यांनी गृहित धरलेलं आहे. पण ती कदाचित हे समजून घेवू शकणार नाही. Sad )

मागील ४-५ वर्षे मुंबई आणि आसपासच्या परिसरातील शाळांत (महाराष्ट्र तसेच CBSE बोर्ड) Jolly Phonics system वापरली जाते. यामुळे मुले स्वत:च लिहु किंवा वाचु शकतात. यात मुलांना alphabet ऐवजी ४२ letter sounds शिकवीले जातात. हे ४२ Letter Sounds शिकवीताना alphabetically न शिकवीता ७ गृपमध्ये शिकवीले जातात. जसे की पहीला गृप आहे (s, a, t, i, p, n). यात एस, ए, टी, आय, पी, एन ऐवजी मुलांना स, अ‍ॅ, ट, इ, प, न असे शिकवीले जाते. एकदा का ही ६ Letter Sounds मुलांना आली की ती ३ अक्षरी बरेच शब्द स्वत:च बनवु शकतात. जसे की at (अ‍ॅ ट), it (इ ट), in (इ न), sat (स अ‍ॅ ट - सॅट), pin(प इ न - पिन), pit (प इ ट- पिट), pat (प अ‍ॅ ट -पॅट), tin (ट इ न - टिन) , sit (स इ ट - सिट), ..वै. त्यामुळे A to Z शिकवुन मगच शब्द बनवीणे आपोआप टळते.
हे सात गृप असे आहेत.
१) s, a, t, i, p, n
२) c/k, e, h, r, m, d
३) g, o, u, l, f, b
४) ai, j, oa, ie, ee, or
५) z, w, ng, v, oo, oo
६) y, x, ch, sh, th, th
७) qu, ou, oi, ue, er, ar
मुले गोंधळुन जावु नयेत म्हणुन b आणि d यांना separate groups मध्ये ठेवले आहे
प्रत्येक letter sound ला त्याची स्वत:ची एक action असते. ती action करुन मुलांना प्रत्येक sound मध्ये येणारे letter(s)लक्षात ठेवणे सोपे जाते. महत्वाचे म्हणजे पालकांना तुम्ही घरी अजिबात शिकवू नका असे सांगितले जाते. जेणे करुन आपले नेहमीचे a, b, c, d, .. (ए, बी, सी, डी,..) ऐवजी मुले अ‍ॅ, ब, क, ड असेच शाळेत शिकतात.
ही post इथे बाळबोध किंवा अप्रस्तुत वाटत असल्यास तसे सांगणे. मी लगेचच डिलीटेन.

सतिश नाही नाही पोस्ट डिलीटु नका पण अजुन लिहा. अगदी हेच मला आता मुलाला शिकवायचे आहे. अजुन प्रकाश टाका यावर. आणि तसेही मुलांना नंतर स्पेलींग लिहिताना हेच असेच उपयोगी पडणार आहे.

सतिश्,छान पोस्ट.
इथे अमेरिकेत आधी फोनिक्सच शिकवतात, त्याने वाचणे शिकवणे फार सोपे होते.मी पण मुलीला तसेच शिकवले. मी स्वतः अनेक नवीन गोष्टी शिकले Happy
ह्याच्यासाठी starfall.com बघा, फ्री आहे, आणि अतिशय सुंदर साईट आहे. मुलांना पण फार आवडते.

@mandard@, अरेरे. त्या कर्सिव्ह रायटींगचा उपयोग काय आहे ?
@अल्पना पुतणीला त्याच शाळेत का जायचे आहे? जर पुतण्या तीच्यापेक्षा लहान वर्गात असेल तर त्याच्या वर्गात तीला घालता येईल. मग तीला फार वाईट वाटणार नाही. किंवा हि गोष्ट तीच्याशी सरळ बोलुन काहीतरी ठरवता येईल
@सतिश, छान पोस्ट आहे. सिबिएससी च्या शाळांनी हे चालु केले असेल तर खरच छान आहे. इंग्रजीतुन शिक्षण देण्यार्‍या भारताबाहेरच्या शाळा असे शिकवतात. आपल्याकडेही केले तर लहानपणीच वाचायची गोडी लागेल मुलांना
@sneha1 आधी सांगायचे राहिले. ती साईट छान आहे. धन्यवाद.

Jolly Phonics बद्दल अजुन थोडेसे.. एव्हाना तुम्हा सर्वांच्या लक्षात आले असेलच की ही पद्धत पुर्णपणे उच्चारांवर आधारीत आहे. जसे की आपण i हे alphabet 'आय' म्हणुन शिकलोय, पण इथे ते 'इ' म्हणुन शिकवीले जाते कारण त्याचा उच्चार नेहमी तसाच केला जातो जसे की ink, igloo, india, वै.
दुसरे उदाहरण द्यायचे झाले तर u चे देता येइल.. याचा इंग्रजी शब्दांमध्ये बव्हंशी उच्चार हा 'अ' असाच असतो त्यामुळे हा 'अ' म्हणुनच शिकवीला जातो. जसे की rub, tub, bulb, pulp, umbrella, up वै. यामुळे आपला पाल्य जर Jolly Phonics शिकत असेल तर आपण ती पद्धत आत्मसात करणे किंवा गप्प राहणेच इष्ट ठरते. Happy

http://jollylearning.co.uk/

Jolly phonics बद्दल आणखीही काही. जे मला माझ्या मुलीच्या बाबतीत अनुभवायला मिळाले.
C A T cat हे मुलांना फोनिक्स मेथड ने शिकवताना, क अ‍ॅ ट कॅट असे शिकवतात. ते मुलेही लवकर शिकतात. मात्र थोडे पुढे जाऊन जे शब्द या प्रकारत बसत नाहीत ते आले की मुले हीच मेथड लावून वाचायला जातात अन गडबडतात. उदा, साधे साधे also सारखे शब्द. आता A says अ‍ॅ असे शिकविले आहे, पण इथे मात्र A says ऑ होते. असे.

The , a, and , हे अन असे सोपे नेहमीच्या वापरातले शब्द माझ्या मुलीच्या शाळेत साईट रिडींग या पद्धतीने शिकवतात, जेणेकरुन नुसते बघूनच ते मूल वाचू शकते.

सतिश, छान पोस्ट आहे. सिबिएससी च्या शाळांनी हे चालु केले असेल तर खरच छान आहे. इंग्रजीतुन शिक्षण देण्यार्‍या भारताबाहेरच्या शाळा असे शिकवतात. आपल्याकडेही केले तर लहानपणीच वाचायची गोडी लागेल मुलांना>>>>

सावली, ही पद्धत ऑलरेडी आमच्या शाळांतून (आर्मी प्रीस्कूल्स) सुरु केलेली आहे. Happy

सतिश,
आय चे दोन उच्चार आहेत, लॉन्ग आय आणि शॉर्ट आय, अनुक्रमे आय आणि इ , जसे mile आणि pig.असेच दोन उच्चार सगळ्याच vowels आहेत.
मवा,
जे उच्चार ह्या नियमांना पाळत नाहीत ते शब्द साइट वर्ड्स ह्या प्रकारात मोडतात. हे शब्द सारखे बघूनच पाठ करावे लागतात.

मी कदाचित विषय सोडून प्रश्न विचारत आहे. त्याबद्दल क्षमा!

माझा मुलगा जून १२ ला आडीच वर्षांचा होईल त्याचं अ‍ॅडमिशन/प्रोसेस आत्ता सुरू करावी लागते का?

sneha1 >>>> a चा उच्चार अ‍ॅ ऐवजी ए, e चा उच्चार ए ऐवजी इ, i चा उच्चार इ ऐवजी आय, तसेच u चा उच्चार अ‍ ऐवजी यु करण्यासाठी काही नियम आहेत. ते follow केले तर पाठांतराची गरज पडणार नाही असे मला वाटते.. असो हा बिबि आता Jolly phonics चा बनु नये म्हणुन मी आता आवरतं घेतो. Happy

माझा मुलगा अजुन शिकतोच आहे. लिहिण्याऐवजी तो टाईप करतो.
भाषांची (म्हणजे त्यांच्या लिप्यांची) उत्क्रांती या मुळे नॉन-लिनियर होणार आहे. (त्याचा एकट्या मुळे नाही :-))

रच्याकने, ६ जुलैला दिल्लीत C-DAC/DIT/Verisign SARL/NIXI/MC&IT मिळुन एक कॉन्फरन्स आहे.
URLs मधे सध्या फक्त लॅटीन वपरता येते. त्याव्यतिरीक्त ईतर स्क्रीप्ट्स वापरणे (देवनागरी सहीत) त्यांच्या अजेंडा मध्ये आहे. URLs च जर मराठीत असतील तर निदान तेवढे टाईप करता येणे आवश्यक बनेल.

सतिश, उत्तम माहिती देत आहात. ज्याची मुले या पद्धतीनुसार शिकत आहेत त्यानी अजून माहिती दिलीत तर बरे होइल.

मी सुनिधी दीड वर्षाची झाल्यावर तिला प्लेग्रूपमधे पाठवायच्या विचारात आहे. शिकण्यासाठी म्हणून नव्हे, तर घराबाहेर आईशिवाय रहायची तिला सवय व्हावी म्हणून. तसेच, इतर मुलांबरोबर खेळणे, वस्तू शेअर करणे हे तिला समजावे म्हणून. ते योग्य होइल का? अनुभवी पालकानी त्याचे अनुभव पण सांगा. Happy

Pages