झाड

Submitted by संजयb on 10 July, 2012 - 07:06

एक झाड ऊभे होते
काटेरी वाटेवर
फाद्यांची पाने झडलेली
खोड मोडकळलेले
वा-यावर हलेना
पावसात बहरेना
पण एक गुपीत होते
म्हणूनच ते ऊभे होते
डोलीत एक मैना
आश्रयाला होती
पदराखाली तीच्या
दोन लहानगी होती
झाडाचाच आधार होता
झाडाचीच सावली
एकटीच माऊली
दोन जीवाना वाढवीत होती
झाडाचाच आधार होता
झाडाचीच सावली
झाड म्हणून तर ऊभे होते
सरला बहर तरी जगत होते
मैनेच्या मातृत्वात
तेही तृप्त होते

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माफ करा ज्या यंत्रावर काम करतो आहे त्यात काहीतरी धोटाळा झाला कवीता उमटली नसावी असा वाटल्याने। हे झाले क्षमस्व

माधव Rofl

संजयने आज भरपुर वृक्षारोपण केलं की. माबोच्या पहिल्यापानावर जिकडे बघु तिकडे झाडंच झाडं. Happy

कविता छान आहे. फार गुंतागुंत, उपमा, गुढार्थ, कसरती न करता, साध्या सोप्या शब्दात छान जमली आहे. आवडली.

स्मितु, लक्ष कुठे आहे? आधी माधव ऐवजी महेश लिहिलंस. मग एडिट करुन मधव केलंस. कर परत एकदा एडिट आणि लिही - मा ध व Happy

मित्रानो असेच कहीनकीही कारण काढून प्रतीसाद देत चला जाऊद्या कवीता करणे सुचेल ते लिहीणे आपला छंद ,,,,, १२ प्रतिसाद बधून बरेच जण ऊधडून वाचतील हा माझा फायदा

झाड म्हणून तर ऊभे होते
सरला बहर तरी जगत होते
मैनेच्या मातृत्वात
तेही तृप्त होते >>> हे खूप छान.

-----------------------------------------------------------------------------
कृपया चुकून झालेल्या पोस्ट्स अ‍ॅडमिनना डिलीट करायला सांगाव्यात
किंवा त्या पोस्टच्या 'संपादन' मध्ये जाऊन
त्या पोस्ट्स 'अप्रकाशित' कराव्यात.