"सत्यमेव जयते" भाग १० - (Dignity For All)

Submitted by आनंदयात्री on 8 July, 2012 - 05:27

आज, ८ जुलैच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा -

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा पूर्ण भाग अजून बघितला नाहि,फक्त कौशल पनवार ह्यांची मुलाखत बघितली. सलाम त्या स्त्रीला. एवढे टोमणे खात,अपमान पचवत ईथवर पोहोचणे म्हणजे खायची गोष्ट नाहि राव.आणि ज्या आत्मविश्वासाने त्या म्हणाल्या कि सर्व आईवडीलांनापण माझ्यासारखी मुलगी मिळो ते खूपच आवडलं आणि पटलं सुद्धा.
भारतात अजूनहि जातीभेद आहेच Sad

' त्यांनी ' आयएएसची नोकरी सोडली , का ? तर ' ते ' कनिष्ठ जातीचे आहेत . हा प्रसंग डॉ . आंबेडकरांच्या काळचा नाही , तर स्वातंत्र्योत्तर भारतात घडलेला आहे . २१व्या शतकातही जातीय वादाचा पगडा भारतीय जनमानसावर कायम आहे , हे कटू सत्य आमिरने आपल्या शोमधून समोर आणले .

बलवंत सिंह नावाचे एक आयएएस अधिकारी आज आमिरच्या शोमध्ये उपस्थित होते . त्यांनी १९६२ साली आपल्या पदाचा राजीनामा दिला . कारण ते कनिष्ठ जातीचे असल्याने कामावर येणारे ज्युनिअर अधिका - यांपासून शिपायाचे काम करणारे लोक त्यांना त्यांच्या जातीवरून हिणावायचे . या भयानक वास्तवासोबतच आमिरने अनेक लोकांना समोर आणले ज्यांना जातीयवादाचा फटका बसला आहे .

दिल्ली युनिव्हर्सिटीत प्रोफेसर म्हणून काम करणा - या डॉ . कौशल पवार यांना लहानपणापासूनच भंगी , चांभार अशा शब्दांनी हिणवले गेले आहे . जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतही त्यांना जातीयवादी शक्तींचा सामना करावा लागला . आजही उत्तरेकडील राज्यात जातीयवादी शक्ती प्रभावी असून हलक्या जातीच्या वस्त्या जाळणं , त्या जातीतील महिलांचे शोषण करणं हे आजही सर्रास सुरू आहे , हे आमिरने दाखवलं .

तसेच हा प्रकार केवळ हिंदू धर्मातच आहे असे नाही तर ख्रिश्चन , इस्लाम , शीख धर्मातही आहे . दक्षिण भारतात ख्रिश्चन समाजातील कनिष्ठ जातीतील लोकांसांठी वेगळी स्मशानभूमी वापरली जाते , तसेच शीख धर्मात गरीबांना हिणवले जाते . तर इस्लाममध्ये जातीला स्थान नसतानाही त्यात जातीभेदाप्रमाणे अनेकांना वागवले जाते , हा सारा प्रकार आज समोर आला .
.
.महाराष्ट्रटाईम्स

विषय तसा ज्वलंत, पण मायबोलीसाठी नविन नाही Wink .

या भागाचा रोख जरा जास्तच ब्राम्हणविरोधी होता, बाकीच्या उच्च/मध्यम जाती बद्दल ही दाखवायला हवे होते.
शेवट्चा स्टॅलीन यांच्या वरचा भाग प्रभावी वाटला.

एका स्फोटक विषयाला हात घालण्याचे धाडस केल्याबद्दल 'सत्यमेव जयते' च्या टीमचे अभिनंदन.

कौशल पनवार यांची मुलाखत अस्वस्थ करणारी. तसेच चार वर्ष आणि २५ हजार किलोमीटर फिरून भारतातल्या जातव्यवस्थेवर फिल्म तयार करणार्‍या त्या अभ्यासकाला सलाम !

पुढील चर्चा वाचण्यास उत्सुक !

या भागाचा रोख जरा जास्तच ब्राम्हणविरोधी होता, बाकीच्या उच्च/मध्यम जाती बद्दल ही दाखवायला हवे होते.
या भागाचा रोख ब्राह्मण विरोधी होता असे वाटायचे कारण नाही. मंदीरातल्या प्रसंगावरुन असा अर्थ काढु नये असे माझे मत आहे.

भारतातल्या मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजात जाती- भेद आहेत हे वाचुन आश्चर्य वाटले नाही. शिख समाजात सुध्दा निळी पगडी घालणारे लोक आहेत हे जाती व्यवस्थेचाच भाग आहे हे पाहुन मात्र आश्चर्य वाटले.

भेदा -भेद ही मानवी प्रवृत्ती आहे. परदेशात सुध्दा याचा प्रादुर्भाव आहे. भारतात मात्र श्रमाला किंमत नसल्यामुळे, डोक्यावरुन मैला नेण्यासारख्या हीन प्रथांमुळे शिक्शणाच्या अभावामुळे समाजतल्या काही लोकांना अपमानाचे जीवन जगावे लागते हे खरे.

डोक्यावरुन मैला प्रकरण ऐकुन धक्का बसला. ह्याचे निर्मुलन ब-याच वर्षांपुर्वी झाले असा समज झाला होता, पण तो खोटा ठरला Sad

एका स्फोटक विषयाला हात घालण्याचे धाडस केल्याबद्दल 'सत्यमेव जयते' च्या टीमचे अभिनंदन.
>>>>> +१

एका स्फोटक विषयाला हात घालण्याचे धाडस केल्याबद्दल 'सत्यमेव जयते' च्या टीमचे अभिनंदन.

+१

कौशल पनवार ला सलाम. ती बोलताना मला खरच रडू फुटलं होतं. त्यांच्या वडीलांनाही सलाम.

खूप चांगला कार्यक्रम झाला, नरेंद्र जाधव यांच्या 'मी आणि माझा बाप' पुस्तकाची आठवण झाली. कौशल पनवार चे कौतुक वाटले. श्री. धर्माधिकारी पण छान बोलले. आताच्या विज्ञान युगात जातीचे अवडंबर कमी झाले पाहिजे. सगळ्यांचे अनुभव ऐकून डोळे भरून येत होते. ऐकुन सद्गतीत होणे साहजिक पण सोप्पे आहे पण ज्या लोकांनी भोगलंय त्यांचे दुख तेच जाणत असतील ना?

फक्त याच भागाशी संबंधित नाही पण एकूणात या कार्यक्रमाबद्दलचा लेखः http://blogs.timesofindia.indiatimes.com/extraordinaryissue/entry/does-s...

५०/५० वाटतो.. काही मते पटतात काही नाही.. एकूणात लेखाचा सूर थोडासा आमिर/कार्यक्रम विरोधात वा नकारात्मक वाटला तरी आमिर हा कार्यक्रम करतोय हे सत्य देखिल नाकारता येत नाही. आणि आपल्या सिस्टीम मध्ये निवळ एक चित्रपट/मनोरंजन कलाकार असून देखिल तो हा कार्यक्रम करतो आहे याचे श्रेय त्याला द्यावेच लागेल!

रच्याकने: प्रितीश नंदी चे लेख मला तरी आवडतात पण या बाबतीत, "आमिर" चा हा कार्यक्रम (?) अधिक दूरगामी व भविष्यात "जागृत" राहणारा कसा ठरेल या अनुशंगाने वेगळा लेख लिहीला तर तो अधिक सयुक्तीक ठरेल असे वाटते.

या एपिसोडमध्ये प्रथमच असे जाणवले की, आमीर खानचा स्वतःचा सहभाग जितका त्याचा पाचपटीने त्याच्यासमोर बसलेल्या व्यक्तींचा जास्त. आलेले सर्वच निमंत्रित भेदभावाची झळ पोचलेले तसेच मा.धर्माधिकारी वा श्री.स्टालिन यांच्यासारखे अशा स्थितीविषयी आपल्या कृत्यातून नापसंती व्यक्त करणारे असल्याने त्या त्या व्यक्तीच्या तोंडून अशा प्रथांविषयीची माहिती ऐकणे सुन्न करणारा अनुभव होता.

दलित वराने 'घोड्यावरून' लग्नाला यायचे नाही....हा प्रघात ज्या राज्यात चालतो तिथे मग 'देऊळ' सारख्या ठिकाणी दलितांना काय वर्तणूक मिळत असेल याची कल्पना करणे जितके भयावह, तितकाच दिलासाही असाच की त्याच गावच्या पोलिस अंमलदाराने (जो उच्चवर्णीय आहे) गावातील बड्यांचा विरोध मोडून त्या दलित कुटुंबासाठी 'घोडेवरात' निर्विघ्नपणे कशी पार पडेल हे जातीनिशी पाहिले, यशस्वीही करून दाखविले.

आय.ए.एस. दर्जाच्या अधिकार्‍याला त्याचा उच्चवर्णीय शिपाई कार्यालयात 'दलितासाठी स्वतंत्र ठेवलेल्या पेल्यातून' पाणी देत आहे हे चित्र नजरेसमोर आल्यावर जातिभेद-जीवन या देशात किती खोलवर रुतले आहे हेच स्पष्ट झाले.

बाकी कौशल पंवार यांच्या खडतर वाटचालीविषयी वरील प्रतिसादात योग्य ते चित्र उमटले आहेच. कौशलचे कौतुक एवढ्यासाठी करणे गरजेचे आहे की 'संस्कृत तू कशाला शिकतेस ?" या विचारसरणीला विरोध म्हणून त्याच विषयात त्यानी ज्या जिद्दीने डॉक्टरेट केली त्यासाठी त्याना आमीरने केलेल्या सलामीमध्ये सर्वांनीच सहभाग दिला.

नेहमीप्रमाणे हा भाग पण आवडला.
पण अजून काही गोष्टी, उदाहरणार्थ उत्तरेमधील उच्चवर्णीय-दलीत संघर्ष (तलवारी, बंदुका घेऊन आजही होत असणारी युद्ध) ह्याबद्दल एखादा मिनिट द्यायला हवा होता.

कृपया इथे विशिष्ट जातीचे नाव न लिहिता उच्च जात आणि कनिष्ठ जात एवढेच लिहावे. अन्यथा एपिसोड राहिल बाजुन आपणच आपल्यामधे जातीवरुन वाद निर्माण करुन घेउ. Wink

चांगली मांडणी होती या भागात .. आणि आजही जाती व्यवस्था इतकी भिनली आहे हे जाणून विषादही वाटला .. विल्सन यांची हिंदी भाषा नेहमीची नसली तर किती आर्ततेने प्रसंग कथन करत होते यावरून त्यांनी काय भोगले आहे याचा सहज अंदाज यावा. सुशिक्षित समाजाने अजूनही या गोष्टी ला चिटकून राहावे हे तर प्रचंड खेदजनक आहे. पण प्रश्न असाही उरतो की मला जरी वैयक्तिक पातळीवर हे पाळायचे नसेल तरी अगदी आडनावापासून ते सरकारी कचेर्यातल्या अर्जापर्यंत सर्वच ठिकाणी जातीचा अधिकृत उल्लेख येतो .. जर मला माझ्या मुलाला जात हे प्रकरण (आणि त्याची/मित्रांची जात) कळू द्यायची नसेल तर काय केले जाऊ शकते (भारतात .. कारण परदेशात हे सहज शक्य आहे, कारण आजूबाजूला जाणीव करून देणारे कुणी नसते ).. (एकदा पुतण्याच्या शाळेचा एक अर्ज भरताना त्यात जात असा रकाना होता, त्याला (वय ६) सहज विचारले तुला हा शब्द माहित आहे का, उत्तर नकारार्थी आले , बरे वाटले आणि वाईट सुद्धा कारण हाच अर्ज त्याला ती जाणीव करून देणारच , मी सांगितले नाही तरीही )..

याला गाड त्याला गाड | 9 July, 2012 - 15:31 नवीन
कृपया इथे विशिष्ट जातीचे नाव न लिहिता उच्च जात आणि कनिष्ठ जात एवढेच लिहावे. अन्यथा एपिसोड राहिल बाजुन आपणच आपल्यामधे जातीवरुन वाद निर्माण करुन घेउ.

<<<

घंट्या! (म्हणजे असहमत)

अमुक जात उच्च अन तमुक कनिष्ठ या वरूनच तर भांडण आहे. फुक्कटच्या मोठायक्या करून इतरांना दाबून मारणारे ते 'उच्च' असे म्हणायचे आहे का?

कालचा भाग पाहिला नाही म्हणून वाचनमात्र फक्त..

( तीन चार वर्षे आंतरजालावर हा अनुभव आलेला आहे कि या शंका / प्रश्न फिरत राहतात, त्यांना दिलेली उत्तरे नाही Sad असो. )

किरण ~

अगदी तुमच्यासारखाच अनुभव "हाताने मैला काढून तो डोक्यावरून वाहून नेणे आणि एक ठिकाणी थांबलेल्या पालिकेच्या मैलगड्ड्यावर जाऊन डंप करणे" या प्रक्रियेत अडकलेल्या भंगी जमातीबद्दल 'विल्सन' या कार्यकर्त्याला आला, जो त्यानी सविस्तरपणे कालच्या एपिसोडमध्ये मांडला.

विशेष म्हणजे भंगी जमातीला हे फिजिकली मैला वाहून नेण्याचे काम करावे लागू नये यासाठी भारताचे प्रथम राष्ट्रपती बाबू राजेन्द्रप्रसाद यानी आग्रहाने (१९४८) पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भरीव अशी आर्थिक तरतूद केली जाईल हे पाहिले होते....पण आश्चर्याची (आश्चर्याची कसली शरमेची) गोष्ट म्हणजे त्या तरतुदीपायी विहित केलेल्या बजेटमधील एक रुपयाही त्या संदर्भात खर्च झाला नाही. इतकेच नव्हे तर प्रथम राष्ट्रपती ते या जुलैला निवृत्त होणार्‍या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यानीदेखील या संदर्भात मांडलेल्या विचाराला आजतागायत मूर्त स्वरूप आल्याचे दिसत नाही.....हे काल प्रत्यक्ष पडद्यावरच पाहिले. ज्या बिहारचे राजेन्द्र प्रसाद, त्याच बिहारमध्ये आजही डोक्यावरूनच मैला वाहून नेला जातो....ही विषादाची गोष्ट.

दरवर्षीच्या अंदाजपत्रकात अब्जावधी रुपयांचा फायदा आम्ही मिळविला असा डिंडिम मारणारे रेल्वे खातेदेखील गाड्यातून रुळाच्या मधोमध निचरा होणारा प्रवाशांचा मैला साफ करण्यासाठी डबा आणि झाडू हाती घेतलेला भंगी तैनात करताना आपल्याला दिसते....आजच्या घडीला रेल्वे खात्यानेही त्या संदर्भात काही तांत्रिक उपाययोजना करण्याचा विचार केल्याचे दिसत नाही.

तुम्ही म्हणता तसेच आहे....शंका/प्रश्न फिरत राहतात....उत्तरे नाही.

अशोक पाटील

जर मला माझ्या मुलाला जात हे प्रकरण (आणि त्याची/मित्रांची जात) कळू द्यायची नसेल तर काय केले जाऊ शकते (भारतात)>>>>>>>>>>>>>>>>
दुर्दैवाने काही नाही. आज ना उद्या त्याला या सत्याला सामोरे जावेच लागेल. तुम्हाला त्याला हे प्रकरण कळु द्यायचे नसले तरी आपले राज्य/केंद्र शासन त्याला नक्की सांगेल. एकच उपाय म्हणजे त्याला समज यायच्या वयात याबद्दल (कुठलाही बायस न ठेवता) माहिती देणे.

<<तीन चार वर्षे आंतरजालावर हा अनुभव आलेला आहे कि या शंका / प्रश्न फिरत राहतात, त्यांना दिलेली उत्तरे नाही असो. >> +१००.......... उत्तरांपेक्षा इतरच अवांतरात चर्चा गुंतून पडतात.

मी कार्यक्रम पाहिला नाही. त्यामुळे बाकी काही चर्चा करू शकत नाही. पण एकुणच आपल्या मानसिकतेतून जात हद्दपार व्हायचं नाव घेत नाहीये.

कोण कुठल्या देशात-वंशात-लिंगात-सामाजिक गटात-धर्मात जन्माला येणार हे कुणाच्याच हाती नाही. आणि त्याचा फुका अभिमान व्हायचा! आपण आधी माणूस आहोत. आणि जर खरंचच कुठले चांगले संस्कार आपल्यावर झाले असतील तर दुसर्‍याला आपण आदराने, डिग्निटीने वागवायला पाहिजे - अगदी मनातही भ्रामक उच्चनीचतेच्या कल्पना न आणता....

प्रत्येक समाजात कुठल्याना कुठल्या स्वरूपात वर्ग-वर्ण-अधिकार उतरंडीची ऐतिहासिक परंपरा असलेली व्यवस्था असतेच. ती ज्या काळात उदयाला आली त्या वेळी त्याचा काही रिलेव्हन्सही असतो. पण म्हणून त्या आता कालबाह्य असलेल्या परंपरांना डोक्यावर घेऊन जन्माच्या आधारावर माणसांत विषमता निर्माण करणे, उच्चनीचता निर्माण करणे हे चुकीचं आहे हेच बहुसंख्य सुशिक्षित जनतेलाही पटवून घ्यायचं नाहीये असं दिसतं.

बाकी सगळं सोडा, खुद्द माबोवरही जातीय लिखाण केल्यास इथे कडक कारवाई करावी लागेल/ सदस्यत्व रद्द होईल असं अ‍ॅडमिन-टीमला खास जाहीर करावं लागतं यातच सगळं आलं, नाही का? आणि आपण म्हणे सुशिक्षित!!

अशोकजी
तुमच्याशी चर्चा हा एक अत्यंत सुखद अनुभव राहीलेला आहे माझ्यासाठी. Happy
--------------------------------------------------------------------
अवांतर : दलितांच्या प्रश्नावर व्यवस्थित चर्चा होऊ शकत नाही. ज्यांना त्याची धग बसलेली आहे त्यांची कडवट भाषा हे एक कारण असू शकेल. मात्र शाळेत जात लावणे वगैरे निरर्थक मुद्दे असंख्य वेळा ज्यांना या प्रश्नाची थोडी सुद्धा जाण नाही त्यांच्याकडून ढालीसारखे उपस्थित केले जाणे हे दुर्दैवी वाटतं..

शाळेत जात येण्याआधी जात अस्तित्वात नव्हती अशा अभिनिवेशात हे प्रश्न असतात.

वरदा +१
कार्यक्रम पाहिलेला नाही, तरी कल्पना करू शकते.

किरण, शाळेत जात लावणे, राखीव जागा या गोष्टीतून जातीची ओळख होते. त्यात जर वाईट अनुभव आला तर जातीभेद (कोणत्याही जातीतल्या व्यक्तीचा) पक्का होत जातो. मला स्वतःला जातीची ओळख अचानकपणे इंजिनियरिंगच्या अ‍ॅडमिशनच्यावेळी झाली. आणि इतर जातींविषयी कडवटपणा निर्माण झाला. नंतर त्या 'इतर' जातीतील उत्तम मैत्रिणी लाभल्याने तो गेला आणि प्रश्नाची खर्‍या अर्थाने ओळख झाली. बहुतांशी तसे होत नसणार.

जातीची ओळख पूर्वग्रह न ठेवता ऐतिहासिक / शास्त्रीय माहितीसकट आधीच झाली तर बरे. विषय टाळण्यापेक्षा त्याला सामोरे जाणे केव्हाही फायद्याचे ठरेल असे मला वाटते. 'पूर्वी असे होते. अनेक अनिष्ट प्रथा होत्या. त्या आता नाहीत/ नसायला हव्यात' हे लहानपणीच स्पष्टपणे समजले की बरे.

मृदुला

काही जणांकडून खूपच उथळपणे प्रचार होतो कि केवळ शाळेत जात लावल्याने(च) जातीची माहिती होते किंवा त्यामुळेच जात व्यवस्था टिकून आहे इतर अनेक गोष्टी जसे कि उपनयन संस्कार, लग्न जमवताना घरात होणा-या जात-पोटजात बद्दलच्या चर्चा, पौराणिक कथांतून येणारे जातींबद्दलचे अनेक सहज उल्लेख. सत्यनारायणाच्या कथा, धार्मिक कार्ये या प्रसंगी पुरोहिताच्या जातीचे होणारे उल्लेख इ. मधून ती ओळख होत नसेल का ? म्हणूनच शाळेत जात हा उल्लेख काढला गेला तर जातीची ओळख होणारच नाही याबद्दल खात्री देता येईल का हा प्रश्न उपस्थित होतो. शाळेत जात नोंदवण्याची पद्धत अलिकडची आहे. त्याआधी कनिष्ठ जातींविषयी असणारा कडवटपणा (सौम्य शब्द आहे हा ) कशामुळे आलेला असावा ? जमीन, व्यवसाय, उदरनिर्वाहाचे साधन सोडाच, अन्न आणि पाण्याचा हक्क नाकारणे, अस्पृश्यता पाळणे, किमान मानवतेच्या दृष्टीने व्यवहार नाकारणे हे ज्यावेळी अस्तित्वात होतं त्यावेळी त्याच्या समर्थनार्थ कुठले फॉर्म्स होते ? या गोष्टी होत्या म्हणून शाळेतल्या दाखल्यात जातीचा उल्लेख आला कि शाळेतल्या दाखल्यामुळे जात आली असावी ?

आज काही मुलांना ही ओळख तुम्ही म्हणता त्या प्रकारे शात्रीय / ऐतिहासिक पद्धतीने करून दिली जाऊ शकते, हा दृष्टीकोण अत्यंत सकारात्मक आहे. दुर्दैवाने काही मुलांना ही जातीची ओळख आजही आपोआपच होत असते. मध्यंतरी खिचडीचा प्रयोग गाजला, तेव्हां काही ठिकाणी केली जाणारी वेगळी पंगत (अपवाद असतीलच), आजही काही मुलांची वेगळी बैठकव्यवस्था यातून ती होतच असते. मी तो एपिसोड पाहीला नाही, पण जे कधी शाळेत गेलेच नाहीत त्यांना ब-याच ठिकाणी आजही पाणी घेऊ दिले जात नाही ही पद्धत शाळेत जात लावल्यामुळे आली असेल का ? ज्या मुलांना पाणी पिण्यापासून रोखले जाते त्यांना या गोष्टीची कुठल्या पद्धतीने ओळख होत असेल ? म्हणूनच जे उपाय योजले जातात ते जातीवर आधारीत असल्याने जात नोंदणे अपरिहार्य नाही का ? देशातल्या साधनसंपत्तीवर, नैसर्गिक संपदेवर, पाण्यावर, मातीवर आणि देशावर असलेला दलितांचा हक्क त्यांना मिळवून देणे यासाठी ते अनिवार्य आहे. स्त्रियांचे प्रश्न किंवा दुर्बल घटकांबद्दलचे प्रश्न यावरच्या चर्चांमधे दुर्दैवाने असा उथळपणा का दिसून येतो, खरंच समजत नाही. तुम्ही सुचवल्याप्रमाणे मुलांना ही जाणीव करून देणे आवश्यक आहे कि एक राष्ट्र म्हणून वेगळी शाळा, वेगळे कॉलेजेस हे टाळण्यासाठी, आहे त्याच कॉलेजात ठराविक वाटा काढून देणे आवश्यक आहे. ही जाणीव झाली तर त्या वेगळ्या काढलेल्या वाट्यात जागा मिळाली नाही म्हणून कडवटपणा राहणार नाही अशी अपेक्षा ठेवता येईल.

कितीही कडवट अनुभव आले तरीही समजून घेऊन मृदु व्यवहार ठेवणे हे कडवटपणावरचे एकमेव औषध आहे. ते सर्वांना लागू पडते.

असो. ही मात्र अगदी शेवटची पोस्ट !

हा भाग पाहिला नाही पण सरकारला किन्वा लोकांना खरेच अगदी मनापासून जात सोडायची असेल तर तसे निश्चितच होऊ शकते. आज सुरवात केली तर हे काम अजुन ४-५ पिढ्यांनंतर तरी निश्चितच पुर्ण होईल. प्रॉब्लेम हा आहे की खालच्या जातीतले असो वा वरच्या, लोकांना जातीचे प्रेम, अभिमान , ओढा , आधार वाटत असतो. आणि अगदी खालच्या जातीच्या माणसाची पण जात टाकायची तयारी नसते. जात खालची असली तरी तीच त्याची ओळख असते. ठरवले तर आज मोठ्या शहरात रहाणारा माणुस नक्कीच 'जात' सोडून राहू शकतो. पण अगदी खालच्या जातीतील सधन माणसे सुद्धा 'जात' त्यागायला तयार दिसत नाहीत.

जात सोडण्याचे काही उपाय :
कोणत्याही कागदपत्रावर जात लावू नये.
'आडनाव' न लावता मुलाचे नाव, वडीलांचे नाव आणि आईचे नाव असे पूर्ण नाव करावे.

असे करणारी व्यक्ति माझ्या माहितीत आहे. पण जातीवरून केवळ चर्चा , भांडाभांड , रडारड करण्यातच सगळ्याच जातीतल्या लोकांना इन्टरेस्ट असतो. nobody wants to move on.

भाग बघितला नाही.
किरण, पोस्ट आवडले.

जातपात निघून जावी हे योग्यच आहे. जन्माधिष्ठीत जातीवरून कुणाला श्रेष्ठ वा कनिष्ठ समजणे/ वागवणे हे संपूर्णपणे चूकच.
आपण म्हणतो कागदपत्रात लावायची नाही.. मान्य पण सरकार जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरून बसलंय.. त्यासाठी प्रत्येकाला कुणा एका जातीचे सदस्यत्व असणे गरजेचे आहे. त्याचं काय?

>>> जातीवरून केवळ चर्चा , भांडाभांड , रडारड करण्यातच सगळ्याच जातीतल्या लोकांना इन्टरेस्ट असतो. nobody wants to move on.<<< +१००

Pages