पहिला पाऊस

Submitted by सौरभ उपाध्ये on 29 June, 2012 - 09:30

पहिला पाऊस
रिमझिम सर पावसाची , मन जायी मोहरून ;
ओल्या मातीच्या गंधाने, माझाच मी गेलो हरवून.

पाहताना त्या सरीला , ऐकू आली अलगुज;
थेंबा-थेंबाच्या स्वरांनी, सूर उमलले आज.

सुटे सोसाट्याचा वारा, झाडे घेती खुला श्वास;
येत्या पावसाची होती,त्यांनाही वेडी आस.

पाखरे लपण्यासाठी ती,सारी सैराभैरा झाली;
उन्हाच्या चटक्यांना, आज शीतलता आली.

असा निसर्गाचा खेळ, जणू वेगळा परीस;
माझ्या मनी दाटलेला,असा पहिला पाऊस.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पाहताना त्या सरीला , ऐकू आली अलगुज;
थेंबा-थेंबाच्या स्वरांनी, सूर उमलले आज

असा निसर्गाचा खेळ, जणू वेगळा परीस;
माझ्या मनी दाटलेला,असा पहिला पाऊस.

.

>>>>>>>>>>>>>>>या प्रमाणे अष्टाक्षरीत बसवा ही अख्खी रचना(मोजक्याच जागी बदल करावे लागणार आहेत ) अजून बहार येईल

अशीही आवडलीच आहे तरीही .........

छान.....

छान.