कॅकटसवरचे चांदणे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 June, 2012 - 14:55

आज गुरुवारच्या मुहुर्तावर ब्रम्हकमळ नावाने ओळखले जाणारे २४ कॅकटस आमच्याइथे फुलले. हे फुलले म्हणजे सण असल्यासारखे आम्ही सगळे बाहेर असतो फुलांना पहात. बाहेर ह्या फुलांच्या सुगंधाने वातावरणही धुंद केलेले असते.
१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

गुलमोहर: 

मस्त Happy

जागू, सुरेखच ! आमच्याकडे ( माझ्या आई-बाबांकडे ) होते हे झाड. ते जरा छोटे होते. एकावेळी आठ-दहा फुले लागतील एवढे. आमचे फोटो आहेत लहानपणचे फुललेल्या झाडाबरोबरचे. काकाआजोबांचे झाड असेच तुझ्या झाडासारखे मोठे होते. त्याचेही फोटो आहेत असे फुललेले. आमच्या मराठीच्या बाईंना फार अप्रूप होते ह्या फुलांचे. तर एकदा रात्री दहाला फुलल्यावर त्यांना फूल नेऊन दिले होते घरी. त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद अजूनही आठवतो. नॉस्टॅल्जिक झाले Happy

अहाहा!!!!! काय सुंदर आहेत ब्रम्हकमळं Happy

आमच्याकडे (माझ्या आई-बाबांकडे पुण्यात ) होते हे झाड<< ++ १ पण घर बदलले आता.... अजुनही असेल त्या जुन्या घरी.....

जागू सही ! काय मधाळ वास असतो नाही त्यांचा Happy
फुले उमलली असतानाच एखादे काढून प्लॅस्टिकच्या पिशवीत घालीन फ्रिज मध्ये ठेवले तर २ दिवस टिकते. मध्येच बाहेर काढायचे डोळाभरून पहायचे, मोठा श्वास घेऊन हुंगायचे अन पुन्हा फ्रिजमध्ये ठेवायचे Happy

मेधा, रोहीत, सायो, लोला, असामी, कंसराज, अगो, लाजो, झकासराव, अवल, शाम, शामली, वर्षा धन्यवाद.

बापरे २४!! काय मस्त दिसतायत.
माझ्या कुंडीत दरवर्षी १च यायच. ह्या वेळी ३ कळ्या आहेत तर मला काय भारी वाटतय. Happy

रुणूझुणू, मोनाली, चिनुरी, इन्ना, आर्या, पद्मजा, इंद्रधनुष्य, स्वाती, रावी, शशांक धन्यवाद.

Pages