कॅकटसवरचे चांदणे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 June, 2012 - 14:55

आज गुरुवारच्या मुहुर्तावर ब्रम्हकमळ नावाने ओळखले जाणारे २४ कॅकटस आमच्याइथे फुलले. हे फुलले म्हणजे सण असल्यासारखे आम्ही सगळे बाहेर असतो फुलांना पहात. बाहेर ह्या फुलांच्या सुगंधाने वातावरणही धुंद केलेले असते.
१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

गुलमोहर: 

सुंदरच.माझ्या लहानपणी ब्रह्मकमळाचे आमचे झाड इतके कुटुंबातले होते,कौतुकाचे,त्याचे नाव होते 'ब्रह्मकमळ बिर्जे'.ते आठवले.फोटोबरोबर तो सुगंधही पाठवायची 'Apps' कधी यायचीत? :))

नाही हो, पण त्या गोष्टी इथे झळकून नंतर 'च्यायला आपल्याकडे नाही राव असलं काही' असा पुरुषसुलभ मत्सर तरी वाटणार नाही

बाकी तुम्हाला किडनॅप केले तर निदान स्वयंपाक तरी चांगला शिकता येईल

सुंदर !

व्वा जागु मस्तच ,अप्रतिम... खुप मस्त फोटो आलेत. माझ्या आई कडे पण हे झाड आहे. एकदा श्रावणी सोमवारी माझ्या बाबांनी रात्री हे फुल शंकराच्या देवळात नेउन वाहिले होते. मी मागेही तुला लिहीले होते... कि तुझे हे असे फुलांवरचे लेख माझ्या जुन्या सुगंधीत आठवणींना उजाळा देतात. Thanks!

कसली ही काळझोप ! Sad दररोज मी ११.३० पर्यंत तर असतेच जागी. अजुन ३०-४५ मिनिटं जागं रहाणं शक्य होतं, पण फुलं उमलली त्याच दिवशी मी १०.१५ वाजता झोपले. सकाळी बागेत पाणी घालायला गेले तेव्हा पाहिलं कि आदल्या रात्री फुलं उमलुन संपली होती. दुसर्‍या रात्री होप्स होत्या कि परत उमलतील. पण नाहीच. चारही कळ्या फुलं न बघताच वाया गेल्या.
crying smiley.gif

विद्याक, दक्षिणा धन्यवाद.

मनीमाऊ अग एकदा फुलल्यावर नाही फुलत ही. आणि अग ८ पासुन उमलायला चालू होतात. १० ला बरीच फुललेली असतात. मी वरती फोटो टाकलेत ते ११ वाजताचे आहेत. तु पाहीली असतीस तर फुललेली दिसली असती.

Pages