केवढे चालणे हे मजल दरमजल.....

Submitted by बेफ़िकीर on 23 March, 2010 - 06:25

केवढे चालणे हे मजल दरमजल...
काय जाणे कुणी आखली ही सहल

मी कितीदातरी ओळ खोडायचो
अन तुझ्याहीमधे व्हायचे मग बदल

काय दुर्लक्ष हे पाहिल्या पाहिल्या...
का अशी घेत आहेस माझी दखल?

खूप थैमान मी घातले याइथे
सांगण्यासारखी एक नाही गझल

मानवी आज योनी ... उद्या वेगळी
ही रहस्ये उकल ती रहस्ये उकल

विश्व ओलावल्यासारखे वाटते
पापण्यांच्यामधे एक पडदा तरल

सागरासारखी लोचने बोलली
गाठ तळ, गाठ तळ, 'बेफिकिर' आत चल

गुलमोहर: 

वाह!

बेफिकिर,
सलाम तुम्हाला आणि तुमच्या विचारानां!
<<मी कितीदातरी ओळ खोडायचो
अन तुझ्याहीमधे व्हायचे मग बदल >> कशी सुचली ही ओळ तुम्हाला?
खूप छान!

मस्त!

मस्त.

काय दुर्लक्ष हे पाहिल्या पाहिल्या...
का अशी घेत आहेस माझी दखल?

अगदी उर्दूतल्या आशिकीचा अस्सल शेर.

मजल सहल....इ. वजन किती छान सांभाळलेय.

व्वाह !

उच्च हो Happy

सुंदर .

व्वाह!

क्या बात है! खूप आवडली.

सागरासारखी लोचने बोलली
गाठ तळ, गाठ तळ, 'बेफिकिर' आत चल >>>>> हाय! सहीच!

मा.बो. वर स्वागत भूषण

व्वा मस्त गझल

काय दुर्लक्ष हे पाहिल्या पाहिल्या...
का अशी घेत आहेस माझी दखल?
>>> क्या बात हैं

तरल पण सुरेख

सर्वांचे मनापासून धन्यवाद!

मी इतर रचनांना प्रतिसाद देत नाही असे कृपया समजू नयेत. अजून येथे नवीन आहे.

मस्त!

वाह!

छान.

विश्व ओलावल्यासारखे वाटते
पापण्यांच्यामधे एक पडदा तरल

मी कितीदातरी ओळ खोडायचो
अन तुझ्याहीमधे व्हायचे मग बदल

....क्या ब्बात ..क्या ब्बात ....क्या ब्बात!!!

Pages