Submitted by बेफ़िकीर on 23 March, 2010 - 06:25
केवढे चालणे हे मजल दरमजल...
काय जाणे कुणी आखली ही सहल
मी कितीदातरी ओळ खोडायचो
अन तुझ्याहीमधे व्हायचे मग बदल
काय दुर्लक्ष हे पाहिल्या पाहिल्या...
का अशी घेत आहेस माझी दखल?
खूप थैमान मी घातले याइथे
सांगण्यासारखी एक नाही गझल
मानवी आज योनी ... उद्या वेगळी
ही रहस्ये उकल ती रहस्ये उकल
विश्व ओलावल्यासारखे वाटते
पापण्यांच्यामधे एक पडदा तरल
सागरासारखी लोचने बोलली
गाठ तळ, गाठ तळ, 'बेफिकिर' आत चल
गुलमोहर:
शेअर करा
प्रत्येक शेर.... ...क्या
प्रत्येक शेर....
...क्या ब्बात ..क्या ब्बात ....क्या ब्बात!!!
धन्यवाद दोस्तहो
धन्यवाद दोस्तहो
केवढे चालणे हे मजल दरमजल...
केवढे चालणे हे मजल दरमजल...
काय जाणे कुणी आखली ही सहल
कितीही दीर्घ असो आयुष्याची सहल ,अशा कविता आहेत तोपर्यंत कंटाळवाणी वाटत नाही..
फार आवडली गझल.
पुन्हा वचली पुन्हा आवडली
पुन्हा वचली पुन्हा आवडली
काय सुंदर गझल आहे … व्वा
काय सुंदर गझल आहे … व्वा !
(फेबु वरील लिंकमुळे वाचायला मिळाली …)
Pages