रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन)

Submitted by रचना. on 19 June, 2012 - 00:25

रद्दी काढल्यावर त्यात काही जुनी मॅगझीन्स् सापडली. मग काय, लगेच कापाकापी करून हा सेट बनवला.

मधल्या पायर्‍यांचे फोटो काढायचे राहून गेले. त्यामुळे या वेळी फक्त कृती देत आहे.

साहित्य :-
मॅगझीन्स् मधली हव्या असलेल्या रंगाच्या पट्ट्या ( मी सोनेरी पट्ट्या 3mm जाडिच्या घेतल्या आहेत. शक्यतो इंग्रजी भाषेतील मॅगझीन्स् घ्यावीत. त्यामधली पाने जाड आणि रंग पण छान ब्राईट असतात.)
लाल पट्ट्या 3mm मी चार्ट पेपरच्या घेतल्या आहेत. क्विलींग च्या पट्ट्या असतील तर छान पण मग टाकाऊतून टिकाऊ होणार नाही.
टुथपिक, रिफील, लॉलिपॉपची कांडी यासारखे काहीही
गोंद
फिनीशेस - मी हा वापरलाय http://www.plaidonline.com/mod-podge/brand/home.htm ( ए॓च्छिक)
व्हॉर्नीश ( ए॓च्छिक)

प्रथम पट्टीची आपल्याला हवी ती बाजू वर घेऊन खाली दाखवल्याप्रमाणे गुंडाळा. (पहिल्यांदा करतांना एखाद्या कोनवर पट्टी गुंडाळ्याचा सराव करता येईल.)

डिझाईन नुसार हवे तितक्या जाडीचे, उंचीचे कोन बनवा.
मधले लाल रंगाचे coil टुथपिकला पट्टी घट्ट गुंडाळून बनवले आहे.

नंतर सगळे आकार आपल्या डिझाईन नुसार चिकटवा.
मी चमक येण्यासाठी, अधिक टिकाऊ होण्यासाठी, पाण्याने खराब होऊ नये म्हणून mod podge आणि ते वाळल्यावर त्यावर व्हॉर्नीशचे कोट दिले आहे.
भारतात अजुन तरी ह्याला alternative नाही. हॉबी आय्डियाज् चे ग्लु अ‍ॅन्ड ग्लॉस मिळते. पण जरा moisture आलं की ते जातं आणि आर्टवर्क खराब होतं. त्यापेक्षा न वापरलेल बर.

हे पेपर क्विलींग आहे. आपली कोन करण्याची पद्धत वापरून ३ डी क्विलींग करता येते.
पेपर क्विलींग मध्ये कागदाच्या पट्टीची गुंडाळी करणे हे बेसिक आहे. त्यानंतर त्या एक किंवा अधिक गुंडाळ्यांना आकार देऊन त्यांच्या रचना करणे हे खर कसब आहे. हवे असल्यास त्याबद्द्ल सविस्तर नंतर लिहेन.

आणि हो, मॅगझीनचे रंगीत कागद जपून ठेवा. त्यापासून काय करायचे ते पुढच्या भागात दाखवेन.
आगामी आकर्षण Wink

आगामी आकर्षण Wink

रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988

गुलमोहर: 

मला शीर्षक फार आवडलं...

रिकाम्यापणीही काही ना काही शिकत शिकत, नवीन गोष्टी बनवत वेळ सत्कारणी लावता येतो.. Happy

मायबोली बंद असल्यामुळे ह्या कलाकृती घडल्या का? Happy

त्या कागदाच्या पुंगळ्या कशा बनवायच्या आणि त्यावर ते कंगोरे कसे द्यायचे?

ते कोन करण्याकरता पेपर कोणत्या आकारात कापायचा आणि कसा गुंडाळायचा ते नीट सांगा. त्या जांभळ्या आणि गुलाबी पट्टयातून काही कळत नाहीये.

आगामी आकर्षण भारीच आहे.

माधव,
मला वाटलेलच त्या फोटोचा काही उपयोग नाही ते. स्पष्ट सांगितल्याबद्द्ल धन्यवाद. मला नीट explain करयला जमत नाहीये. कोनासाठी सरळ पट्टीच घ्यायची आहे. ती spiral staircase सारखी एकावर एक समान अंतर ठेऊन गुंडाळायची आहे. हे सगळं वाचतांना मलाच कठिण वाटतय. Happy पण फक्त वाचून कल्पना करण्यापेक्षा पट्टी घेऊन करून बघा. (हे कुजकटपणे लिहीलेले नाही. कृपया गैरसमज नसावा.) बर्‍याचदा हातात घेतलं की आपोआपच समजत जातं. ओरिगामी मध्ये देखिल काही स्टेपस केल्याशिवाय चित्र पाहून समजत नाहीत.

थोडसं कळल्यासारखं वाटतय. बघतो करून जमतय का ते - म्हणजे मी एकच कोन करून बघेन. तो जमेपर्यंतच माझी सहनशक्ती संपून जाईल. मग हा बाफ घरच्या कलाकाराला दाखवेन Happy

तुमच्या पेशन्सला __/\__

माझी मुलगी पेपर क्वीलिंग मध्ये मास्टर आहे. तिला हे दाखवते. नक्कीच काही तरी भन्नाट बनवेल ती.

फारच सुंदर आहे
माझ्या शाळेत पेपर चा फ्लावर पोट शीकवला होता.

पेपर चे रोल करुन फ्लावर पोट चा शेप नी चीटकवला होता.