भटकंती - औरंगाबाद (औरंगजेबाची कबर + देवगिरीचा किल्ला)

Submitted by Chintu on 19 May, 2012 - 12:35

भटकंती - औरंगाबाद (घृश्नेश्वर + वेरूळ/एलोरा)
...महाभारतातील एक प्रसंग दाखवला आहे. तर डाव्या बाजुला एक काल्पनीक प्राणी दिसतो.
♦♦♦♦♦

येताना वाटेत खुल्दाबाद येथील औरंगजेबाची कबर बघायला गेलो. "आम्ही नेत नाही गाडी तिकडे, तुम्हाला बघायचं आहे म्हणून नेतो." असं ड्रायवरने बजावलं.

एका मशिदीत औरंगजेबाची, त्याच्या गुरुची, आणि मुलाची अशा तिघांची कबर आहे. त्यात गुरुच्या कबरीवर शहामृगाच्या अंड्यांची माळ, लामण दिवा ठेवतात तशी लटकत ठेवली दिसते.

प्रत्येक कबरीजवळ मशिदीत काम करणाऱ्यांपैकी एक जण असतो. तो लगेच माहिती द्यायला सुरुवात करतो. बघुन मनात विचार आला हे आपल्या देवळात का नाही करत? पुजारी, रांग सोडण्यासाठी उभे केलेले रक्षक सगळ्यांचीच अरेरावी असते. असो.

माहिती सांगताना औरंगजेब किती महान आणि चांगला होता हे अगदी ठासुन सांगितलं जातं. ऐकून तर असं वाटेलं शिवाजी/संभाजीने उगीचच त्याच्या खोड्या काढल्या की काय? हा आलमगिर नमाज पडतेवेळी वापरण्यात येणाऱ्या टोप्या विणून तो आपला खर्च त्यात भागवीत असे. आपण मृत्युनंतर आपली कबर आपल्या गुरूच्या कबरी जवळ असावी आणि ती सामान्य माणसांच्या कबरिसरखी मातीची असावी अशी त्याची इच्छा होती. टोप्या विकुन त्याने जमवलेल्या १३.५० रुपयात ही कबर बांधली गेली.

औरंगजेबाच्या कबरीवर कसलेसे एक रोपटे लावले होते. मधल्या सीटवरील कुटुंब प्रमुखाने "ये पौधा काहेका? तुलसी का लग रहा हे!" त्याच्या टिपिकल मुंबय्या हिंदीमध्ये विचारलं.
"वोह मरेहुवे इन्सान को मुक्ती मिले, उन्हे जन्नत मे आसरां मिले इसलीये लगाया जाता है. बेसिल का पौधा है ! " अशी माहिती मिळाली.
"बेसिल? मतलब तुलसी ना? तुलसी का हे बोलो ना फिर."
"नही वोह बेसिल का ही है." समोरुन पाल झटकतात तस उत्तर आलं.
आता तरं कुटुंबप्रमुख पण पेटले. "अरे भाई! तुलसी को ही अंग्रेजीमे बेसिल केहते है."
समोरचा आता गार पडला होता. कुटुंबप्रमुख विजयी मुद्रेने आपला कुटुंब कबिला घेउन तेथुन बाहेर पडले. आणि पाठोपाठ आम्हीही.

परतीच्या वाटेवर देवगिरी किल्ल्याजवळ मी आणि सौ उतरलो. संध्याकाळचे ५ वाजलेले. किल्ला चढून खाली येईपर्यंत गाडीवाला थांबायला तयार नव्हता. त्याच्याशी हुज्जत घालत बसण्यापेक्षा देवगिरी बघुन होईल म्हणून आम्ही गडाच्या दिशेने निघालो.

हा किल्ला अभेद्य आहे. या किल्ल्याच्या भोवताली ३ तटबंद्या आहेत. या पैकी पहील्या तटबंदीवरुन काढलेला हया फोटोत दुर डोंगर माथ्यावर किल्लाचा थोडा भाग पहाता येईल.

किल्ल्याच्या प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर मधेच एक सुंदर शिल्प दिसते. आणि या शिल्पाचे वैशिष्ट्य असे, पुर्ण दगडी सपाट भिंतीवर मधल्या एकाच दगडावर हे केली असल्याने एकदम नजरेत भरते.

प्रवेशद्वाराच्या बाजुलाच एक प्रमाणबद्ध असं हत्तीचं शिल्प दिसतं. हत्तीच्या पायातील साखळदंड, पोटावरं बांधण्यात येणारी घंटा, आणि अंगावरील इतर सजावटी सामानं दिसतं. या हत्ती शेजारी काही तोफा ठेवल्या असुन यातील एका तोफेचा एका तोफेचा व्यास पाणी भरायच्या बादली एवढा आहे. फोटोमध्ये दिसणारी तोफ ही तांब्यापासुन बनवलेली आहे.

प्रवेशद्वारातुन आंत गेल्यावर चारमिनार दृष्टीस पडतो.

पुढे गेल्यावर हा किल्ला अभेद्य का होता हे हळुहळू लक्षात येतं. किल्ल्याच्या भोवताली पाण्याचे खंदक आहेत. पुर्वी यात मगरी, आणि विषारी साप असत असे सांगतात.

हा खंदक पार करताच एका चिंचोळ्या भुयार्‍यासारख्या वाटेतुन आतं जावं लागतं. आत गेलं की लगेच समोर येतो तो एक मोठा दरवाजा. जर तुम्ही हा दरवाजा पार करुन आंत गेलात तर तुम्ही एका किल्ल्यावर न जाता, भुलभुलय्या मधे अलगद अडकता. ह्या किल्ल्याच्या आत दिवसाही काही दिसणार नाही असे भुयारी मार्ग आहेत. ते एका मोठ्या भुलभुलय्यासारखे मुद्दाम बांधलेले आहेत. राजाचे सैनिक या भुलभुलय्यात लपून बसत व वाट चुकलेल्या शत्रूवर भाल्याने वार करून अथवा गरम तेल ओतून ठार करीत. भुलभुलय्यात अडकलेल्या शत्रुंसाठी मुद्दामहुन चुकीचे दरवाजे उघडले जात, जेणेकरुन शत्रू मुख्य किल्ल्यापर्यंत पोहचू नये.

असा हा किल्ला रामदेवराय राजाचा मेहुणा हरपालदेव याने केलेल्या फितुरीमुळे अल्लाऊद्दिन खिलजीकडे १२९४ मध्ये गेला. देवगिरी स्वाधीन केल्यास राज्य देईन असा करार खिलजीने हरपालदेवासोबत केला. हरपालदेवाने शत्रुची साथ देत, त्यांना भुलभुलय्यातुन मुख्य किल्ल्यापर्यंत आणले.

पुढे १३२७ मध्ये महंमद बिन तुघलकाने भारताची राजधानी देवगिरीस हलवली आणि देवगिरीचे नवे नामकरण केले "दौलताबाद" आणि सोबत किल्ल्याचे नाव ही देवगिरीचा किल्ल्या ऐवजी दौलताबाद चा किल्ला असं झालं.

देवगिरीच्या पाडावाबद्द्ल अशी एक कथा सांगितली जाते की आपल्या ह्या अभ्येद्य अश्या किल्ल्यावर कोणीही हल्ला करू शकत नाही असा गैरसमज करून रामदेवराय गाफील राहिला. शत्रूने हल्ला केलातरी बेगमी केलेल्या अन्नसाठ्यावर आपण तग धरून राहू शकतो अशा फाजील आत्मविश्वासाला तडा गेला जेव्हा ऐनवेळी त्याला समजलं की बेगमी केलेल्या धान्याच्या पोत्यामध्ये धान्य नसून मीठ आहे.

या किल्ल्यात एक भारतमातेचे मंदिरही आहे. हे यादवांच्या काळात बांधलेल मुळ जैन मंदिर असावं. यात भारतमातेच अष्टभुजा उभी मुर्ती आहे. ह्या देवगिरी किल्ल्याच्या टोकावर १४ टन वजनी मिश्र धातूची मेंढा तोफ आहे. ड्रायवरचं न ऐकता किल्ला चढायचा निर्णय किती योग्य होता हा विचार करत आम्ही परतीची वाट धरली

क्रमशः
♦♦♦♦♦
सूची

MTDC -http://www.maharashtratourism.gov.in/MTDC/HTML/MaharashtraTourism/TouristDelight/Forts/Forts.aspx?strpage=DevagiriDaulatabadFort.html
काही संदर्भ आंतरजालावरून.

गुलमोहर: 

छान!

मस्त .. कॉलेज दिवसातील दौलताबाद किल्याच्या सहलीच्या आठवणी जागृत झाल्या.
फोटो पण चांगले आले आहेत.

महागुरु +१.
सुट्टीच्या दिवशी सकाळी किल्ला चढायला मजा यायची. किल्ला उतरुन आलं की तिथे मिळणारे पेरु खायचे, वरुन हिरवे आणि आतून लाल-गुलाबी पेरु. गेल्या ५-६ वर्षात वरपर्यंत जाणं नाही झालं.

असा हा किल्ला रामदेवराय राजाचा मेहुणा हरपालदेव याने केलेल्या फितुरीमुळे अल्लाऊद्दिन खिलजीकडे १२९४ मध्ये गेला. देवगिरी स्वाधीन केल्यास राज्य देईन असा करार खिलजीने हरपालदेवासोबत केला. हरपालदेवाने शत्रुची साथ देत, त्यांना भुलभुलय्यातुन मुख्य किल्ल्यापर्यंत आणले.

याबद्द्ल थोडा संशय आहे. मी वाचले त्यानुसार हरपालदेव हा खिलजीच्या विरूद्ध लढला. तो ज्यावेळी जिवंत हाती सापडला तेव्हा त्याची कातडी सोलून प्रवेशद्वाराजवळ लटकावण्यात आले.