चिंटू - माझी उन्हाळ्याची सुट्टी स्पर्धा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 2 May, 2012 - 01:27

मायबोलीकरांच्या मुलांसाठी 'चिंटू' घेऊन येतोय निबंध लिहा, चित्र काढा व रंगवा स्पर्धा!

11.jpg

उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की बच्चेकंपनीची असते दे धम्माल! परीक्षा, अभ्यास एकदाचे संपलेले असतात. वेळापत्रक गुंडाळून ठेवलेले असते. भरपूर हुंदडण्याबरोबर साथीला असतो मनसोक्त खेळ, सोबत्यांबरोबर दंगा व खोड्या आणि भरपूर आंबे - आईसक्रीम - रानमेव्याची मेजवानी! कोणी वेगवेगळ्या शिबिरांमध्ये नाव देते, कोणी छंदवर्गांना जाते, कोणी खूप वाचन करते तर कोणी सुट्टीत नवे उपक्रम करते. अशी ही मजेमजेची, हवीहवीशी वाटणारी उन्हाळ्याची सुट्टी!

मुलांनो, तुम्हालाही तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीविषयी आम्हाला काही सांगायचंय? चला तर मग, कागद - पेन्सिल - पेन - स्केचपेन - रंग घेऊन तुमच्या या सुट्टीचे वर्णन करणारे चित्र आम्हाला पाठवा बघू! किंवा तुम्ही मस्तपैकी त्यावर एक निबंधही लिहू शकता!

'चिंटू' घेऊन येत आहे बाळगोपाळांसाठी 'निबंध लिहा, चित्र काढा व रंगवा स्पर्धा!'

विषय : 'माझी उन्हाळ्याची सुट्टी'

वयोगट : ५ ते १२ वर्षे

प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम तारीख : १५ मे २०१२, रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय प्रमाणवेळ)

स्पर्धेचे नियम :

१. ही स्पर्धा मायबोलीकरांच्या मुलांसाठी आहे. भाग घेऊ इच्छिणार्‍या अन्य मुलामुलींचे आईवडील मायबोली सदस्यत्व घेऊन मुलांच्या प्रवेशिका दाखल करू शकतात.

२. स्पर्धेत भाग आई/वडीलांच्या आयडीनेच घ्यायचा आहे.

३. चित्राबरोबर / निबंधाबरोबर मुलाचे/मुलीचे संपूर्ण नाव आणि वय लिहावे. ज्यांना आपल्या पाल्याचे संपूर्ण नाव जाहीर करायचे नसेल त्यांनी फक्त पहिले नाव लिहावे आणि संयोजकांना संपूर्ण नाव इ-मेल द्वारे कळवावे.

४. चित्राचे माध्यम देणे अपेक्षित आहे. (स्केचपेन, वॉटरकलर, पेंटब्रश इ.)

५. एक मूल एका वेळी निबंध व चित्र दोन्हीत प्रवेशिका देऊ शकते. तसेच एकापेक्षा जास्त निबंध किंवा चित्र देऊ शकते. निबंध पूर्ण व सुवाच्य अक्षरात लिहिलेला हवा. तसेच चित्र अपूर्ण किंवा अर्धवट रंगवले असल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाही.

६. निबंध मराठीत हवा, सुटसुटीत सुवाच्य अक्षरात कागदावर लिहिलेला हवा आणि त्याची शब्दमर्यादा आहे : किमान १०० शब्द.

७. चित्र काढताना किंवा निबंध लिहिताना पालकांनी मदत केली असेल तर तसे स्पष्ट लिहावे.

८. विजेत्यांची निवड 'लकी ड्रॉ' पद्धतीने केली जाईल. नियमांत बसणार्‍या सर्व प्रवेशिकांचा 'लकी ड्रॉ'मध्ये समावेश केला जाईल.

९. स्पर्धेचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.

१०. -विजेत्या स्पर्धकांना 'चिंटू' चित्रपटाच्या प्रिमीयर शोची तिकीटे दिली जातील. पुण्यात ५ आणि मुंबईत ५ तिकीटे विजेत्यांना आणि त्यांच्याबरोबर जाण्यासाठी विजेत्यांच्या पालकांपैकी एकाला तिकीट दिले जाईल.

12.jpg

स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना :

१. स्पर्धेत प्रवेशिका पाठवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला माझे सदस्यत्व मधे जाऊन 'खाजगी जागेत' चित्राची किंवा निबंधाची इमेज फाईल अपलोड करावी लागेल. निबंधातील मजकूर वाचता यायला हवा.

२. स्पर्धेच्या धाग्याच्या प्रतिसादातच चित्र किंवा निबंध द्यायचे आहे.

३. चित्रासोबत / निबंधासोबत पाल्याचे नाव आणि वय लिहा.

४. विजेत्या मुलांशी / त्यांच्या आईवडीलांशी संपर्क करण्यासाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक कळवणे आवश्यक आहे. तरी संयोजकांना प्रवेशिकेसोबत इमेलमधून पाल्याचे नाव व दूरध्वनी क्रमांक कळवून ठेवावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्रेलर्स मस्त आहेत पिक्चरची. पुर्णपणे लहान मुलांसाठी पिक्चर म्हणजे धमाल असणार.
मागच्याच आठवड्यात लेकी बरोबर घडलेले संवाद -
सुट्टी लागून आठवडा झाला. बालचित्रपट महोत्सव सुरु झाला. पण ह्या वेळी तो बघण्यात एवढा उत्साह दिसला नाही. लेक म्हणाली " किती वर्ष 'बाल शिवाजी' , 'शामची आई' 'संत तुकाराम' , हेच सिनीमे बघायचे ? " नविन नाही काही ? ते जरी चांगले असले तरी मला बोअर झालय तेच पुन्हा पुन्हा बघायला.
मागच्या वेळेस 'बोक्या सातबंडे' होता नविन दाखवायला. खरच तसा विचार केला तर फारसे लहान मुलांचे चित्रपट , निखळ मनोरंजन असलेले बघायला फारसे मिळत नाही. पुर्वी आपल्या काळी असलेली बालनाट्य ' अफाट गावची अचाट मावशी , कांद्याला आलं रडू, सई परांजपें ची बालनाट्य, असली मजेदार बालनाट्य हरवलीयेत खरतर.
परवा लेक 'चिंटू' बघायला जाणारे अस सांगत होती मैत्रीणीला, तर ती म्हणाली "असले चाइल्डीश पिक्चर काय बघतेस?" कहानी बघ त्या पेक्षा Uhoh ह्यात थोडी देखील अतिशयोक्ती नाही. लेक म्हणाली पण आपण चाइल्डच आहोत ना ? सो आपल्या साठी चे पिक्चर आपण बघायचे.
माझाच निबंध झाला का ? Proud

स्मी Happy
मी पण वाट बघतेय या सिनेमाच्या रिलिजची. चिंटु तसा आपल्या सगळ्यांचाच आवडता आता पडद्यावर बघायच Happy

नावः श्रिया
वयः ११
माध्यमः ऑइल पेस्टल्स

उन्हाळ्याची सुट्टी म्हंटल की फक्त कोकणच आठवतं. हे समुद्राकाठच घर आणि समुद्रात फिरायला होडी Proud

Copy of Picture.jpg

योजना चांगली आहे. मस्त, पण आम्ही सागलीत राहतो तेव्हा आम्ही स्पर्धेत भाग घेउ शकतो का? तेव्हा माझ्या ई-मेल वर पाठवा.

हे काय अजुन एकच चित्र?

श्रिया, फार छान आलय ग तुझं चित्र. अगदी त्या होडीत बसुन लगेच समुद्रात जावसं वाटतय.

नाव : जुई
वय : १०
माध्यम : पेन्सिल, स्केच पेन

सुट्टी म्हणजे खूप खेळणं, मजा करणं आणि मित्रमैत्रिणींबरोबर बडबड करणं. Happy

sutti.jpg

@सुमेधा शीतल दिवाण - तुम्ही जरूर स्पर्धेत भाग घेऊ शकता. लकी ड्रॉमधे नंबर लागला तर खास चित्रपटाच्या प्रिमिअरच्या ठिकाणी या, किंवा त्या शहरातल्या तुमच्या नातेवाईक वा मित्रमंडळींना तिकिट देऊ शकता.

@leenas - तुम्ही तिचे ध्वनिमुद्रण पाठवू शकता. आणि त्यात तुम्ही तिची आवश्यक वाटल्यास थोडी मदत करू शकता.

श्रिया आणि जुई खूप छान काढलयत चित्र Happy

श्रिया, तुझं समुद्रा काढचं घर, बोट, नारळाचं झाड एकदम मस्त Happy

जुई, वारली पेंटीग? क्या बात है. एकदम आवडलं Happy

नावः सानिका
वयः ८.५ वर्ष
माध्यमः जलरंग

खाली दिलेली दोन्ही चित्रे आणि निबंध ह्यावेळच्या प्रवासातल्या आठवणी आहेत तिच्या.

चित्र १ मधे ती बागेत बसुन मजा करतेय तर चित्र २ मधे आम्ही गावात बघितलेलं घर आणि गोठा आहे (तिच्या मते) Proud

चित्र १

chitra 1.jpg

चित्र २

chitra 2.JPG

नावः सानिका
वयः ८.५ वर्ष
निबंधः माझी उन्हाळ्याची सुट्टी
पालकांची मदतः जोडाक्षर/ काही शब्द कसे लिहायचे ते दुसर्‍या कागदावर लिहुन दाखवले

nibandh.JPG

धन्यवाद!! Happy

ह्यावेळी आमच्या मॅडम जोरात आहेत. Wink

नाव : जुई
वय : १०
माध्यम : पेन्सिल, चार्ट पेपर(झाड आणि आंबे चार्ट पेपरचे बनवुन चिकटवलेत), मार्कर्स

मे महिन्याची सुट्टी म्हणजे आंबेच आंबे!!!!!

sutti1.jpg

नाव-- ईशिका
वय--९.५ वर्ष
माध्यम--ऑईल पेस्टल, क्रेयॉन्,स्केचपेन,पेन्सिल.

आम्ही माझ्या मैत्रीणीच्या फार्म हाऊसवर गेलेलो परवा, तर तिथली मोगर्याची फूल विकायला पाठवण्यासाठी तोडत होते. आम्हीपण तोडली, गोळा केली भरपूर फूल, अगदी टोपलीभर. खाली दिलेल चित्र नं. १ मध्ये मैत्रिणीच फार्महाऊसच आहे. आता विचारू नका की मोगर्याची फूल रंगीत कशी झाली ते.:d
आणि चित्र नं. दोन आहे आमचे सुट्टीतले उद्योग! मैत्रीणींना जमवून जवळच्या गार्डनमध्ये दोरी उड्या मारणे.

चित्र नं १
DSC06572.JPG

चित्र नं २

DSC06570.JPG

.

uju तुम्ही टाकलेली दोन्ही चित्रे दिस्त नाहियेत... त्यांचा फॉरमॅट बदलावा लागेल.. झिप फाईलमध्ये .psd फाईल्स आहेत.. त्या .jpg किंवा .bmp मध्ये कन्व्हर्ट करुन मग अपलोड करा..

.

Pages