चिंटू - माझी उन्हाळ्याची सुट्टी स्पर्धा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 2 May, 2012 - 01:27

मायबोलीकरांच्या मुलांसाठी 'चिंटू' घेऊन येतोय निबंध लिहा, चित्र काढा व रंगवा स्पर्धा!

11.jpg

उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की बच्चेकंपनीची असते दे धम्माल! परीक्षा, अभ्यास एकदाचे संपलेले असतात. वेळापत्रक गुंडाळून ठेवलेले असते. भरपूर हुंदडण्याबरोबर साथीला असतो मनसोक्त खेळ, सोबत्यांबरोबर दंगा व खोड्या आणि भरपूर आंबे - आईसक्रीम - रानमेव्याची मेजवानी! कोणी वेगवेगळ्या शिबिरांमध्ये नाव देते, कोणी छंदवर्गांना जाते, कोणी खूप वाचन करते तर कोणी सुट्टीत नवे उपक्रम करते. अशी ही मजेमजेची, हवीहवीशी वाटणारी उन्हाळ्याची सुट्टी!

मुलांनो, तुम्हालाही तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीविषयी आम्हाला काही सांगायचंय? चला तर मग, कागद - पेन्सिल - पेन - स्केचपेन - रंग घेऊन तुमच्या या सुट्टीचे वर्णन करणारे चित्र आम्हाला पाठवा बघू! किंवा तुम्ही मस्तपैकी त्यावर एक निबंधही लिहू शकता!

'चिंटू' घेऊन येत आहे बाळगोपाळांसाठी 'निबंध लिहा, चित्र काढा व रंगवा स्पर्धा!'

विषय : 'माझी उन्हाळ्याची सुट्टी'

वयोगट : ५ ते १२ वर्षे

प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम तारीख : १५ मे २०१२, रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय प्रमाणवेळ)

स्पर्धेचे नियम :

१. ही स्पर्धा मायबोलीकरांच्या मुलांसाठी आहे. भाग घेऊ इच्छिणार्‍या अन्य मुलामुलींचे आईवडील मायबोली सदस्यत्व घेऊन मुलांच्या प्रवेशिका दाखल करू शकतात.

२. स्पर्धेत भाग आई/वडीलांच्या आयडीनेच घ्यायचा आहे.

३. चित्राबरोबर / निबंधाबरोबर मुलाचे/मुलीचे संपूर्ण नाव आणि वय लिहावे. ज्यांना आपल्या पाल्याचे संपूर्ण नाव जाहीर करायचे नसेल त्यांनी फक्त पहिले नाव लिहावे आणि संयोजकांना संपूर्ण नाव इ-मेल द्वारे कळवावे.

४. चित्राचे माध्यम देणे अपेक्षित आहे. (स्केचपेन, वॉटरकलर, पेंटब्रश इ.)

५. एक मूल एका वेळी निबंध व चित्र दोन्हीत प्रवेशिका देऊ शकते. तसेच एकापेक्षा जास्त निबंध किंवा चित्र देऊ शकते. निबंध पूर्ण व सुवाच्य अक्षरात लिहिलेला हवा. तसेच चित्र अपूर्ण किंवा अर्धवट रंगवले असल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाही.

६. निबंध मराठीत हवा, सुटसुटीत सुवाच्य अक्षरात कागदावर लिहिलेला हवा आणि त्याची शब्दमर्यादा आहे : किमान १०० शब्द.

७. चित्र काढताना किंवा निबंध लिहिताना पालकांनी मदत केली असेल तर तसे स्पष्ट लिहावे.

८. विजेत्यांची निवड 'लकी ड्रॉ' पद्धतीने केली जाईल. नियमांत बसणार्‍या सर्व प्रवेशिकांचा 'लकी ड्रॉ'मध्ये समावेश केला जाईल.

९. स्पर्धेचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.

१०. -विजेत्या स्पर्धकांना 'चिंटू' चित्रपटाच्या प्रिमीयर शोची तिकीटे दिली जातील. पुण्यात ५ आणि मुंबईत ५ तिकीटे विजेत्यांना आणि त्यांच्याबरोबर जाण्यासाठी विजेत्यांच्या पालकांपैकी एकाला तिकीट दिले जाईल.

12.jpg

स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना :

१. स्पर्धेत प्रवेशिका पाठवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला माझे सदस्यत्व मधे जाऊन 'खाजगी जागेत' चित्राची किंवा निबंधाची इमेज फाईल अपलोड करावी लागेल. निबंधातील मजकूर वाचता यायला हवा.

२. स्पर्धेच्या धाग्याच्या प्रतिसादातच चित्र किंवा निबंध द्यायचे आहे.

३. चित्रासोबत / निबंधासोबत पाल्याचे नाव आणि वय लिहा.

४. विजेत्या मुलांशी / त्यांच्या आईवडीलांशी संपर्क करण्यासाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक कळवणे आवश्यक आहे. तरी संयोजकांना प्रवेशिकेसोबत इमेलमधून पाल्याचे नाव व दूरध्वनी क्रमांक कळवून ठेवावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील सर्व प्रवेशिकांसाठी बालमंडळीचे कौतुक ! Happy

प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत: १५ मे २०१२, रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय प्रमाणवेळ) वाढविण्यात आली आहे. तेव्हा त्त्वरा करा आणि आपल्या पाल्यांच्या प्रवेशिका दाखल करा !

आई शप्पथ!!! मस्त आहेत सगळी चित्रं / प्रवेशिका.
कौतुक वाटलं एकदम, शाब्बास श्रिया, जुई,सानिका, ईशिका !!

सगळ्यांचीच चित्रे मस्त! श्रिया नारळाची झाडे खूप आवडली. जुई वारली पेंटींगचे चित्र अप्रतिम! बर्‍याच दिवसांनी आट्यापाट्या पाहीले... सगळेच खेळ कव्हर केलेत चित्रात... धम्माल दिसतेय या सुट्टीत!
वॉटर कलर्सने चित्र काढणे तसे कठीणच, पण सानिका छान काढले आहेस चित्र... खूप खूप चित्रे काढ! निबंधामध्ये तू केलेली भरपूर मज्जा धम्माल वाचली, मज्जा आहे बुवा एका मुलीची!
ईशिका, कलर्स कसले फ्रेश आणि मस्त वापरले आहेस! दोन्ही चित्रे आवडली बरं.

परीक्षकांचीच परीक्षा आहे कोणाला प्राईज द्यावं याची... सगळेच छान छान चित्रे पाठवत आहेत. सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा! खूप मज्जा धमाल करा या सुट्टीत!

एकापेक्षा एक चित्र आहेत. सगळ्यांना मोठी शाबासकी. वारली चित्र काय सुरेख आलंय!
सानिकाचा निबंध गोड झालाय Happy

नावः नीरज
वयः १२ वर्ष
निबंधः माझी उन्हाळ्याची सुट्टी
पालकांची मदतः पहिल्या ड्राफ्टमध्ये चुका केल्यावर मागे लागून परत एकदा दुसर्‍या कागदावर लिहून घेणे. Happy

From MB Photos

Happy

Pages