डुबुकवड्यांची आमटी

Submitted by मी_आर्या on 3 May, 2012 - 07:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मसाल्यासाठी:
मिरे: ८-१०
लवंगा-५-६
दालचिनी- २-३
मसाला वेलदोडा_ ३
चक्रफुल- ४
लाल तिखट- २ मध्यम आकाराचे चमचे
गरम मसाला असल्यासः २ चमचे

सुके खोबरे: अर्धी वाटी
कांदे: मध्यम आकाराचे ३
लसुणः ८-१० पाकळ्या
आलं- बोटाच्या पेराएवढं
मीठः आवडेत तितकं

डुबुकवड्यांसाठी:
बेसनः एक मध्यम आकाराची वाटी भरुन
मीठः चवीपुरते
लाल तिखटः आवडत असल्यास १ छोटा चमचा
हळदः किंचित
ओवा: भजीच्या पीठात घालतो तशा

क्रमवार पाककृती: 

मसाल्याची आमटी:
कांदे चिरुन तव्यावर थोड्या तेलावर लालसर भाजुन घ्यावे किंवा तसाच कांदा गॅसवर भाजला तरी चालेल. सुकं खोबरं काप करुन तेही तव्यावर थोड्या तेलात लालसर भाजावे.
लवंग मिरे, दालचिनी, चक्रफुल, मसाला वेलदोडा सर्वच तव्यावर भाजुन घ्यावेत.
आणि आता हे सर्व लाल तिखट, घरचा तयार गरम मसाला असेल तर त्यासहीत मिक्सरमधुन बारीक करावेत.

कढईत तेल घेउन तेल तापले की छोटा चमचाभर बेसन तेलात टाकावे. आणि नंतर हा वाटलेला मसाला त्यात घालावा.मसाला तेलात चांगला परतुन घ्यावा. मसाल्याचा वास घरभर पसरला आणि मसाला उलथन्याला चिकटला नाही म्हण्जे मसाला चांगला परतला गेला असे समजावे. नंतर जरुरीपुरते पाणी घालावे. व ही आमटी एकीकडे उकळु द्यावी. आधी जोरात करुन एकदा उकळी फुटली की बारीक गॅसवर. म्हण्जे आमटीला तेल चांगले सुटते.

आता डुबुकवड्यांसाठी:
वाटीभर बेसन पाणी टाकुन आणि वरील जिन्नस टाकुन म्हणजे ओवा, मीठ, हवं असल्यास लाल तिखट, हळद, भजीच्या पीठासारखं किंवा त्याहीपेक्षा थोडसं घट्ट एकजीव कालवावं.
आणि ही आमटी चांगली उकळली की त्यात भजीसारखे थोडे थोडे सोडावे. नंतर आमटीत या डुबुकवड्यांना खाली वर करुन शिजु द्यावे. चमच्यात घेउन शिजले की नाही हे बघता येईल.
वरुन कोंथिंबीर बारीक चिरुन घालावी व पुन्हा एक उकळी घ्यावी. गॅस बंद करावा.
भात, चपातीबरोबर ही खाता येते.
dubuk

फोटो मोबाईलवर काढल्याने क्लॅरीटी नसेल. तरी समजुन घ्या लोक्स! Happy
आमच्याकडे व्हेजवाल्यांसाठी रविवारी हा पदार्थ असतो. पटकन होण्यासारखा कारण नॉनव्हेजींसाठी वाटलेला मसाला तयार असतो Happy

du

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

डुबुकवड्यांची आमटी थंड झाली की घट्ट होत जाते. म्हणुन पाणी आधी थोडेसे जास्त घालुन भरपुर उकळु द्यावे

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या डुबुकवड्या डायरेक्ट आमटीतच शिजवायच्या म्हणजे सोपं वाटतं आहे एकूणात.... करून बघेन गं. तेलात बेसन भाजून घेऊन मसाला घालून करायची आमटीही आवडलेली आहे. करून बघेन नक्कीच.

फोटो मलाही दिसत नाहीये एकही Sad

wow! mastach! lahanpani ajoLee khallee aahe. Lai bharee lagate. lavakarach karaNet yeil!

डुबुकवड्या!!!!!!!! किती वर्षांनी हा शब्द ऐकला!

पाककृती फारच मस्तं! फोटो पण चमचमीत आहे.

सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद! Happy

दक्से, मंजुताई, फोटो फ्लिकरवरुन टाकलेत पिकासा बॅन असल्याने. इथे माझ्या ब्लॉगवर दिसतील.
http://khandeshkanya.blogspot.in/2012/05/blog-post.html

हो दिनेशदा, आपल्यासारख्या शाकाहारींसाठीच! Happy
वेका ..धन्स!

ममे ... नक्की नक्की तु ये तर सही! Happy

ए आम्ही सीकेपी अशाच आमटीला वड्याचे सांबारे म्हणतो. फक्त त्यात चिंच आणि अगदी नावाला गूळ असतो.
मस्त ! फोटो पाहून तर " कधी येऊ जेवायला ? " Happy

आर्या
मी अगदी परवाच केली होती. इ टीव्हीवर विष्णू मनोहरांबरोबर अशोक हांडे आले होते. त्यांच्या पत्नीने करून दाखवली होती. पण थोडी वेगळी होती. त्यात मसाले खूप कमी होते. आणि त्यांनी वडे तळले होते.(म्हणून मीही तळले.)
तुझीही मस्तच आहे. आणि तळण नाही म्हणजे छानच.

Pages