चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीप्या... अरे सगळ्या गाण्यातच अफलातुन दिसली आहे रे... Happy
दिल बचैन होतो तिला पाहुन Wink

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

कुणी मृत्यूदंड हा माधुरीचा सिनेमा पाहिला आहे का?

मला त्या सिनेमात ती सर्वात जास्त आवडली.

अभिनय आणि दिसणे .... दोन्ही बाबतीत...

माधुरी आणि अ‍ॅश अशी तुलना???? छी छी छी!!!

माधुरी फक्त चेहर्‍याच्या हावभावावरून अख्ख गाणं उचलू शकते. आठवा...
हम आपके चे टायटल. तिच्या समोर असल्याने सलमान पण अभिनय करत असक्यासारखा वाटतो.
अ‍ॅश इतकी कृत्रिम बाई मी खरोखर पाहिलेली नाही. माझ्यामते तिचा सर्वोच्च अभिनय म्हणजे ती अमिताभला "सासरा" म्हणून बघते तेव्हा आणि अभिषेकला "नवरा" म्हणून बघते तेव्हा.... Happy

--------------
नंदिनी
--------------

माधुरी आणि अ‍ॅशची तुलना होउच शकत नाही........दिसणे किंवा अभिनयात सुद्धा.....
अ‍ॅशचा "bride and prejudice" ज्यांनी पाहिला असेल त्यांना तिच्या "अभिनयसामर्थ्याची" कल्पना आली असेलच.....

हम दिल दे... मधे बहुधा संजय लीला भन्साळी ने तिला वेगवेगळे चेहरे करायला लावून "हा हाच असाच चेहरा रड्क्या शॉट्स ला, तो सकाळी सांगितलेला त्या 'ऑखोंकी गुस्ताखीयॉ...' गाण्याला, आता आनंदी शॉट् ला कसा करशील सांग..." असे करत करत अभिनय करवून घेतलेला दिसतो.

हो, आणि मग देवदासच्या वेळेला त्याला वाटले आपण आधीच एवढी मेहेनत घेतलीय, तर आता विद्यार्थिनीवर तयार झाली असेल ब-यापैकी, म्हणुन त्याने जरा दुर्लक्ष केले, तर विद्यार्थिनी नापास... त्या दिव्याच्या गाण्यात आणि इश्श्श वाल्या गाण्यात काय भयानक दिसलीय... त्यात ते लांबच लांब केस. मला तर खुप वेळा वाटले की बस.. आता ती उलटीच पडणार केसांमुळे तोल जाऊन...

लग्न झाल्यावर ती एक भयानक गोष्ट तिच्या सासुकडुन शिकली आणि ते म्हणजे भयानक हास्य.. तिच्या सासुचे हसणे बघुन मला कसेतरीच व्हायचे, आता ही बयाही अगदी तस्सेच हसते...

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

सासुकडुन शिकली आणि ते म्हणजे भयानक हास्य>>> ती ते हास्य कसे शिकली असेल ??
ती सहा फुट्...सासु तीन फुट... ??.. Proud

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

ती ते हास्य कसे शिकली असेल ??
>>> के३जी सारखी सासू खुर्चीवर उभी राहिली असेल. Happy
--------------
नंदिनी
--------------

के३जी सारखी सासू खुर्चीवर उभी राहिली असेल.
>>>> Biggrin Biggrin Biggrin
माझ्या डोळ्यासमोर जया भादुडी खुर्ची किंवा स्टुलावर चढलीय..आणि ऐश ला दात काढुन दाखवतेय असे चित्र आले Happy

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

लग्न झाल्यावर ती एक भयानक गोष्ट तिच्या सासुकडुन शिकली आणि ते म्हणजे भयानक हास्य >>>>
मोठा मोदक

**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

माझ्या डोळ्यासमोर जया भादुडी खुर्ची किंवा स्टुलावर चढलीय..आणि ऐश ला दात काढुन दाखवतेय असे चित्र आले

इथे मीच पडले खुर्चीवरुन हसता हसता........ Happy Happy

जया दात काढून हसली असती तरी बरी दिसली असती. ती हसायला सुरवात करते न करते तोच दात दिसतील या भयाने तोंड काहीतरी विचित्रच मिटून घ्यायची...आणि मग सगळा मामला विचित्रच होऊन जायचा....

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

खरच...ती जया हसते की भीती दाखवते तेच कळत नाही कधी कधी
Happy

**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

जया कडून तेवढे एकच सुचले का घ्यायला तिला Happy एकदा अभिमान बघ आणि 'आपको देखके लगता नहीं की आप गाती है" या अमिताभ च्या टोमण्यावर "आपको देखके लगता नही की आप विमान छोडके आये है" हे दिलेले उत्तर हा शॉट सासू आणि सासर्‍याने कसा दिलाय बघ म्हणावं

फारेंड.. तिला जेवढं झेपलं तेवढ तिने उचलल.. बाकी तिच्या बस के बाहर की बात है Happy

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

कितव्या इयत्तेत बघितला परिन्दा??? Rofl
--------------------------
फिर छिडी बात.. बात फूलोंकी...

ऐश्वर्याने जर हे वाचलं कींवा तिला कुणी वाचून दाखवलं तर ओ़क्साबोक्षी रडेल बिचारी Proud
बरं आता बीबीच्या मूळ विषयाकडे वळुयात का लोक्स ? Proud
किंवा अजून एक बीबी काढता येइल 'फेवरेट हिरवीन' असा Happy
**********************************************
ऐसी चले जब हवा ........ इश्क हुआ ही हुआ !!

मुळ विषय काय होता??? Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

चित्रपट कसा वाटला ?? Proud
**********************************************
ऐसी चले जब हवा ........ इश्क हुआ ही हुआ !!

बॉलीवूड्ने देवाकडे तारकेची मागणी केली; एक अशी तारका की जिच्याकडे रूप, नखरा आणि अदा आहे. देवाने मधुबालाला पाठवले. अभिनय बंदा रुपया नव्हता पण त्याची कमतरता कधी भासली नाही. तिचे ते अवखळ हसू सगळे विसरायला लावत असे. आणि एक एक अदा - हाय! फ़क्त तिच करू जाणे.

आठवा - आइए मेहरबा, अच्छा जी मै हारी, हाल कैसा है वगैरे गाणी.

पण जेव्हा तिच्यावर नाचायची वेळ आली तेव्हा खरी पंचाइत झाली. आशाने आपल्या अवखळ आवाजात म्हटले - एक परदेसी मेरा दिल ले गया. पण तो ठसका तिच्या नाचात दिसला तर नाहिच पण उलट तो काहितरीच वाटला.

बॉलीवूड परत देवाकडे गेले. देवाने आपल्या साच्यात बदल केला - अभिनय ठासून भरला. नृत्यही चांगले केले. त्या मुशीतुन आली रेखा. खूबसुरत - नावही तिला साजेसेच - मध्ये तिचा अभिनय लख्ख जाणवला. म्हणजे तो आधिही होताच पण एका लम्बुळक्या सावलीखाली झाकून गेला होता. आता ती सावली दूर झाली होती. त्यावर कळस चढवला तो उमराव जानने! ती नाचलीही सुंदर.

थोड्या दिवसांनी बॉलीवूड पुन्हा देवाकडे गेले. तोपर्यंत त्याने नृत्य सुंदर वरून अप्रतीम पातळीपर्यंत नेले होते. त्यातूनच त्याने माधुरी बनवली.

ह्या तिनही तारका घाडवताना देवाला फ़ेशन, झीरो साइझ असल्या चिल्लर गोष्टींची गरजच भासली नाही. एकतर त्याच्या ह्या कलाकृती इतक्या अस्सल होत्या की त्यांना असल्या बाह्य नकली आभुषणांची गरजच पडली नाही.

हा आता ह्या तारका बनवल्या नंतर जी माती उरली त्याचे गोळे करुन ते त्याने बॉलीवूडला देउन टाकले. आता ते कसे वापरणार? म्हणुन मग बॉलीवूडने मेकप, फ़शन असल्या क्लृप्त्या शोधून काढल्या.

इती बॉलीवूड पुराणम समाप्तम|

नूतन..
एका शब्दांतच सौंदर्य आणि अभिनय यांचा मिलाफ कसा असावा हे कळतं..

असो.. आता अ‍ॅडमिनचा फेरा यायच्या आत विषयाला हात घाला कसं!

हिन्दी चित्रपट गुलाल बघीतला. मला आवडला. आजच्या राजकारणाचं भयानक चित्र अगदी वास्तविक पणे मांडलय. के. के मेनन भलताच भाव खऊन जातो.

४.५/५ माझ्या कडून.

दिपांजली नी मागे मला आवडलेल्या एका हिरवणीचाही विरोध केला होता ना???माधुरी आणी अ‍ॅश मधे सर्वच बाबतीत माधुरी दहा पावले पुढे होती आणि आहे.अरे तिला मुलं झाली तरीही ती अ‍ॅशपेक्षा कमी म्हातारी दिसते.
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

अबबबबबबबबबबबब............. एका दिवसात सव्वाशे नवीन प्रतीसाद ह्या बिबि वर पाहुन असा कोणता सिनेमा आहे बुवा म्हणुन उघडले तर एकुण एक, अक्षरशः एकुण एक प्रतिसाद वाचुन एवढे हसले की आजचा हसायचा कोटा पुर्ण झाला... मार डाला!!!
माधुरी प्रत्येक वेळी मागणीपेक्षा (नाच, अभिनय) २०० टक्के देणारी बाई आहे. म्हणुन नंतर च्या बाकी कोणी तिच्या जवळ पोचु शकत नाही. तिचा आवाज पण (बोलताना) सुंदर आहे.. नैसर्गीक सौंदर्य तर आहेच. तिची कपडेनिवड चांगली नव्ह्ती ह्यावर अनुमोदन.
ऐश्वर्या पण अतीव सुंदर आहे पण तेवढेच, बाकी सर्व काही नाटकी.
अमिताभ-जयाचे ते अभिमान व सिलसिला मी पुन्हा पुन्हा, पुन्हापुन्हा, पुन्हा पुन्हा पहाते.. Happy इतके आवडतात.
हुश्श!! माधुरीविषयी लिहिल्याशिवाय चैन नसती मिळाली Happy

एक डाव धोबीपछाड पाहीला. (इथली परिक्षणे वाचण्या अगोदर)
अशोक सराफ आवडता कलाकार आणि तोच निर्मिती करतोय म्हटल्यावर खुप अपेक्षा होत्या. खरेतर त्याच्या सारख्या गुणी अभितेत्याला उगीच अचकट-विचकट विनोदी कामे देवुन त्याचे वाटोळे केले. मला वाटले त्याने ह्या चित्रपटात स्वत:ला वेगळ्या भुमिकेत दाखवले असेल. पण खुप अपेक्षाभंग झाला, हा चित्रपट त्याच्या इतर कोणत्याही चित्रपटासारखा आहे. घटकाभर करमणुक होत असेलही पण अशोक सराफ यांचे असल्याच प्रकारचे काम कित्येक वेळा पाहिले आहे. ह्या दिवसात मराठीत नवनविन प्रयोग करुन वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट येत आहेत. अशोक सराफ ला संधी मिळुन ही त्याने त्याच प्रकारची कामे करण्यात धन्यता मानली.
फार अपेक्षा न ठेवता पहा (चित्रपटगृहात जावुन बघण्याच्या लायकीचा नाही)... पाच पैकी दोन तारे.

तिचा आवाज पण (बोलताना) सुंदर आहे..>> १०० वेळा अनुमोदन!

इथले ओळखीचे एकजण माधुरीच्या डेन्वरच्या घरी गेले होते तेव्हाचे त्यांचे फोटो पाहिले. काय सुंदर दिसत होती अगदी साध्या कपड्यात.

तिचा आवाज पण (बोलताना) सुंदर आहे. >>> काव्यातही छान आहे .. ऐका देवदास मधल्या एका गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी .. ढाई शाम रोक लई ..

माधवम, सुनिधी १०० मोदक माझ्याकडुन.

मी पण अजून अर्धाच पाहिला हे"एक डाव धोबी पछाड". जुन्या ईन्ग्रजी सिनेमा ची नक्कल आहे. "ऑस्कर". सिल्वेस्टर स्टालोन होता त्यात. कोणाला आठवला का?

अरेच्या माधुरीच्या पंख्यांनो,
माधुरी सुंदर आहे (चेहरा) , मधुरीचे करोडो फॅन्स आहेत तसे अ‍ॅश चे ही अगणित फॅन्स आहेत, बिग बी सकट Wink
(आणि हो, अवधूत ची परवा विभावरीच्या गाण्या नंतरची कॉमेंट ऐका)
तुम्हाला माधुरी आवडते ते ठीक आहे पण अ‍ॅश तुमच्या टाइप ब्युटी नसली तरी तिची इमेज पण काही ठोकळेबाज किंवा शोभेची वस्तु नव्हती कधी.
अर्थात बाकी अनेक रद्दी सिनेमे, फालतु रोल्स जसे माधुरीने केले तसेच अ‍ॅश नी ही भरपूर केले !
पण 'हम दिल' , 'देवदास', 'ताल', 'धूम २', प्रवोक्ड, मिस्ट्रेस ऑफ स्पाइसेस, रेनकोट , जोधा अकबर,उमरावजान(अर्थात रेखा शी तुलना नाही तरीही अत्तच्या काळात ती एकच चॉइस असु शकते या रोल ला..) , गुरु या चित्रपटां मधे ती ठोकळेबाज-शोभे ची वस्तु वगैरे मुळीच नव्हती, तिला फुटेज असणारे चांगल्या डिरेक्टर्स नी चांगले रोल करून घेतलेत तिच्या साठी ! Happy
आणि डोला रे डोला बद्दल , माधुरी फक्त एक्स्प्रेशसन वर मारून नेउ शकते यात कोणाचच दुमत नाही (तिच्या आदा अभिनयाला वाव असणार्‍या ' काहे छेड छेड मोहे' साठी परफेक्ट आहेत)पण डोला रे डोला मधे जिथे लाँग शॉट्स जास्त होते , फास्ट बिट्स ला जास्त महत्त्व होतं, तिथे किल्ली दिलेल्या बार्बी सारखा अ‍ॅश चा चपळ डान्स ही काँप्लिमेंट च आहे Happy
माधुरी -अ‍ॅश एकत्र नाचताना माधुरीचा हेवीनेस जास्त च जाणवतो, आगदी दहा चा आकडा दिसतो दोघी एकत्र नाचताना:).

अ‍ॅश आणि माधुरीची तुलना नाही कशी :फिदी:?
माधुरी पर्वा नंतर अ‍ॅश टॉप ला आली , दोघीही आपापल्या काळातल्या टॉप च्या अभिनेत्री, दोघींनी ही स्वतः च्या नावा वर अनेक चित्रपट मारून नेले, दोघींचेही अगणित प़ंखे अभिनया पेक्षा 'दिसण्या साठी' आणि 'डान्स' साठी , दोघींनीही लिड अ‍ॅक्ट्रेस ची भरपूर अ‍ॅवॉर्ड्स घेतली, दोघींने एकाच सिनेमात दोन महत्त्वाचे रोल्स केले, तुलना तर होणारच कि , जशी रेखा -श्रीदेवी, रेखा -हेमा मलिनी, श्री-जया प्रदा, श्रीदेवी-माधुरी तुलना झाली तशी ही तुलन अपण सहाजिक च आहे, अर्थात कोणाला कोण जास्त आवडल ती गोष्ट वेगळी:)

असो,
तळटिप : मी अ‍ॅश माधुरी दोघींची ही फॅन नाहीये, मला फक्त श्री आवडते ( ते पण फक्त चान्दनी-चालबाज्-लम्हे- सदमा, मि. इंडिया, नगिना, जॉम्बाझ मधली..तिचा कॉमेडी सेन्स, तिचा अभिनय, तिची ग्रेस, सेन्स्युअ‍ॅलिटी, तिचा डान्स , तिच्या सारखी ती च Happy )
पण देवदास मधे अ‍ॅश उजवी होती हे १०० % प्रामणिक मत.

********** स्टाइल मे रहनेका !! ************

Pages