मुलांसाठी नोकरी/व्यवसायात केलेला बदल

Submitted by me_surabhee on 11 August, 2008 - 00:30

मी सुरभी. व्यवस्थापन शास्त्रातली मास्टर्स पदवी घेतलीये. एका MNC मध्ये उच्च पदावर २/३ वर्षे नोकरी केली. नवरा software engi तो ही एका MNC मध्ये आहे. कामाच्या निमीत्तानी दोघेही १२/१३ तास घराबाहेर असायचो. मुलाकडे ( आता वय ४ वर्षे ) लक्ष देता यावे म्हणून मी नोकरी सोडली ( घरी सांभाळायला कोणी नाही ) आधी खुप बर वाटल पण आता अस्वस्थ पणा येतो. इतक शिकुन सुद्धा घरी बसलीये असे टोमणे ऐकावे लागतात. घरी कंटाळा येतो मुलगा शाळेत जातो तेव्हा. पुढल्या वर्षी त्याची पुर्ण वेळ शाळा सुरु होईल. तेव्हा आणखीन कंटाळा येईल अस वाटत.
कोणतीही कला नाही की ज्यात मन रमवावे. काही सुचत नाही. पुन्हा नोकरी करायची तर मुलाकडे दुर्लक्ष होईल अस guilty feeling येत. पण मी घरी असल्यापासुन तो जाम खुष असतो. एवढच काय ती जमेची बाजु.
नोकरी करणे किंवा सोडणे निर्णय माझा आहे. नवरा पुर्ण पणे मदत करायला तयार असतो, पण मुलासाठी नोकरी नको वाटते करायला आणि घरी पण बसायला नको वाटत. नशिब नोकरी करायची गरज नाहीये, नाही म्हणटल तरी तो factor पण विचारात घ्यावा लागतो.
मी काय करु? म्हण्जे काय करता येईल की ज्यानी माझा वेळ सार्थकी लागेल ? ( माझ्या आईच्या म्हणण्या प्रमाणे बहुदा सुख मला बोचतय, हेच खर असाव!!)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटले मला इथे मदत मिळेल पण ईथे तर दुसरीच चर्चा चालु आहे ..

सुरभी तुला सगळ्यानी खुप महत्वाचे सल्ले दिले आहेत्...पण अजुनही मला वाटते तू सावरलेली नाहीस्.....सगळे नकारत्मक विचार सोडून दे....तू खुप नशीबवान आहेस! मला फक्त शनीवार -रवीवार मिळतो तर काय करू काय नको असे होते मुलासाठी...तुझ्यकडे तर वेळच वेळ आहे.....त्यचा चन्गला उप्योग कर्....नवर्याचाही तूला पूर्ण पाठेम्बा आहे....तू समाधानी रहाशील तर सगळे घर समाधानी रहील्....मनाने मुलाबरोबर; घराबरोबर रहा....नुसते physically नको.....त्याचा कुणालाच उपयोग होणार नही.......बघ पटतय का!
फुलराणी

झक्की सर्व वाक्ये छान पण...... ते शेवटचे वाक्य खास करुन चांगले लक्षात राहिले आहे.. (तुम्हीही विसरु नकात बर का) Happy

किती छान लिहील आहे सरवानी...मनाला अगदी भिडुन गेल...

सुरभी कशी गम्मत आहे पहा! तुला जिला मुलाकडे वेळ देता येतोय तिला नोकरी कराविशी वाटते आणि माझ्यासारख्या अनेकांना तुझ्यासारखे बाळाकडे बघावे, त्याच्या जवळ असावेसे वाटते.
म्हणजे Grass is greener on the other side, always! Happy

आजच मी माबोवरच्या एका मैत्रिणीला सांगत होते की नोकरी सोडावी असा विचार करतेय. एक तर ९ वर्षे संगणकक्षेत्रात काम केल्यावर लेक झाली. कंपनीबरोबरच पूर्वसुकृत म्हणून ३ महिने पूर्ण सुट्टी आणि ६ महिने पार्ट टाईम असे १ वर्ष गेले. ह्या वर्षात वेतनवाढ, गोपनीय अहवाल सगळ्याचीच बोंब! आता पुन्हा युरोपात आले आहे कामासाठी. लेकीला पूर्ण वेळ इथे आणता येणार नाही. ३ महिने माझ्याकडे राहून आता ती बाबाकडे गेलिये... पुन्हा आता थोड्या दिवसांसाठी येईल. ह्या सगळ्यात तिच्याकडे लक्ष देता येत नाही अशी अपराधीपणाची भावना येतेच ग मनात!

पण मग विचार येतो की माझ्या सासुबाई पूर्णवेळ घरी होत्या आणि माझी आई पूर्णवेळ खाजगी नोकरीत. असे असूनही आम्हा नवरा बायकोचा करीअर पाथ, उपक्रम, वाचनाची आवड हे सगळे जवळ जवळ सारखेच आहे की! १९-२० चा काय तो फरक.

पूर्ण वेळ नोकरी हा माझा निर्णय आहे आणि न नोकरी करता मुलाकडे बघणे हा तुझा. त्यातून फार काही वेगळे होणार नाही आहे. म्हणून आधी त्या निर्णयाचे ओझे वागवू नकोस.

मी जेंव्हा घरी बसणार आहे तेन्व्हा (म्हणजे पुढच्या ५ वर्षात - सगळी कर्जे फिटल्यावर) तेंव्हा खूप सगळं वाचन करणार आहे. कॉलेजनंतर खूप काही वाचायचे राहून गेलेय. तळमजल्याला घर घेऊन मग नाचाच्या क्लासला नाव घालणार आहे :), गडकरीला नाटकाचा रतीब घालणार आहे, एम बी ए (फायनॅन्स नव्हे, नापास होईन) करायचे राहून गेलय ते किंवा मराठी साहित्यात काही तरी पुढे शिकणार आहे, जिमला जाणार आहे, क्रॉस स्टिच किंवा असेच काही तरी शिकून लेकीला कपडे शिवणार आहे. परत कधी नोकरी, उद्योग करावासा वाटलाच तर शिकवण्या करणार आहे - मराठीच्या, ८वी ते १२वी साठी (ठाणेकर आयांनो वाचून ठेवा Happy )! म्हणजे माझही बरच जगायच राहून गेलय की!

अग, करीअर हे काही अंतीम ध्येय नव्हे, करीअर न करणार्‍या बायका म्हणजे काहीच नाही असे जे मनात भरवतात न लोकं ते महामूर्ख आहेत. कोणी तरी वर लिहिलय ना तसे की आपला (कुठचाही) निर्णय कसा योग्य होता ह्याचे समर्थन करतात लोक आणि त्यासाठी दुसर्‍याचा हिरमोड करतात. तू सध्या जो मोकळा वेळ मिळतोय तो स्वतःसाठी घालव बघू आधी, प्रसन्न हो.

योग्य संधी येईल तेंव्हा तू स्वत:हून पुढे जाशील. तुझ्या शिक्षणात जे ज्ञान तू मिळवलयस ते असेच वाया जाईल का? नव्याने काही शिकायचे असेल तर आवड म्हणून शिक, नोकरीसाठी म्हणून नको.

मस्त लिहिलेस जाईजुई!!

जाईजुई, खूप छान पोस्ट. सगळ्यांनी वाचून कायम घोकावी अशी.

वाह.. जाईजुई.. प्रिंट काढून घरात लावून ठेवावी असं वाटतेय.. कधी निराशा आलीच की बघायचं, सगळी पळून जाईल! Happy

जायले, भल्ले हो!
अतिशय अतिशय सुंदर, सुस्पष्टं विचार, साध्या सोप्प्या शब्दांत. मी पण प्रिंट काढून ठेवणारय.
निमो परत कधी येतेय?

जाईजुई, खूप छान पोस्ट.
मि सुद्धा प्रिन्ट काढुन ठेवणार!
Happy
वरचे....दाद न ashbaby चे पोस्ट्स पण असेच सुन्दर आहेत.

**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

जाई, खुप छान पोस्ट.. मीही वेळात वेळ काढुन भरतकाम्/विणकाम करतेय, ट्रेक, जिमला जातेय, आणि पैशांची गरज थोडी कमी झाली की नोकरी सोडून , जगायचं राहुन गेलेलं जगणार अशी स्वप्न पाहतेय.. (पैशांची गरज कमी करणेही माझ्या हातात आहे हे मला पटलेय).

नोकरी करणा-या माझ्यापेक्षा, मला गृहिणी जास्त नशिबवान वाटतात, कारण त्यांना नोकरी आणि घर नाही तर फक्त घरचीच जबाबदारी असते. (यात अर्थात मुलेबाळे आणि बाहेरची कामे आलीच.) थोडा वेळ वाचवणे त्यांना जास्त शक्य असते. अर्थात तशी इच्छा पाहिजे.

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

मला वाटत इथे अमेरिकेत नोकरी न करता येणार्‍या मुलींचा बरेच वेळा खरा problem स्वताची अजिबात Identity न रहाण हा आहे. कुठेही गेल तर घरात बसुन काय करतेस?" हा प्रश्न असतोच. विचारनारा कधी कधी सरळ आणि कधी वाकड्या अर्थान हा प्रश्न विचारत असतो. dependent visa म्हणजे घरात बसणारी बाई. ती creative काही करुच शकणार नाही असाच बर्‍याच जणांचा गैरसमज असतो.
नोकरी शिवाय काय करु शकते अस विचारल कि volunteering करा\ library मध्ये जा सल्ले मिळतात. (सल्ले चांगल्या भावनेनच दीले जातात हे मला माहित आहे. लगेच वाद नको)पण हे सोप नाही.
SSN नसेल तर volunteering चे options सुद्धा खुप कमी असतात. त्यात driving येत नसेल\ किंवा एकच कार असेल तर लायब्ररीत तरी कस जाणार?
मग हळू हळु सेल्फ इस्टीम,confidence कमी होत जातोच. काय आहे ना , कि आपल्याला options हवे असतात. म्हणजे job करता येत नाही म्हणुन तो अधिकच करावासा वाटु लागतो. म्हणजे न मिळनार्‍या गोष्टीचच आपल्याला जास्त attraction असत ना तस काहीस.
त्यामुळे जे करता येत नाही/ जमत नाही त्याच्या माग न लागता, जे शक्य आहे करता येण ते शोधायला सुरुवात करणच उत्तम. just make a peace with it. कार चालवायला शिकणे ,घरचा financial part संभाळने, इन्शुरन्स,car servicing etc ची काम स्वता करणे(नवर्‍याची काम आहेत अस न समजता) blog लिहिणे ,मुल असतील तर त्यांच्या school activity मध्ये involve होने अस बरच करता येत.
आमच्या इथल्या parent organization साठी काम करताना एक फरक ठळक जाणवला म्हणजे stay at home mommy असण हे इथ job असल्या सारखच बघितल जात. आणि इथे मोस्ट्ली सगळ्याना एक का होईना hobby असतेच. त्यामुळे time pass कसा करायचा हा प्रश्नच पडत नाही. या उलट आपल्यात प्रत्येकाला काही छंद असेलच अस नाही.
प्रत्येकजण आपल्या family ला सुट होणार निर्णय घेतो. त्यामुळे चुक्/बरोबर अस काही नाहीच. आज वेळ आहे आणि मी तो सत्कारणी लावणार आहे एवढा एकच विचार मनात ठेवायचा. उद्याच उद्या.
घरात राहुनही खुप काही करता येत. पैसे मे बी कमवता येणार नाहीत पण वाचवता तरी येतीलच कि. "The penny you saved is a penny you earned":)
फक्त एक रुटीन ठेवल पाहिजे.

परदेशात काही वर्षे ब्रेक घेऊन मग त्याच क्षेत्रात नोकरी मिळणे शक्य असते. भारतात ते कितपत शक्य आहे?
मी गेले १ वर्षे ब्रेक घेतला आहे. आता नोकरीसाठी प्रयत्न केला तर एजंटस म्हणतात ब्रेक मोठा आहे. अजून थोडे महिने/वर्षे थांबले तर काय होणार?
मी गेले ९ वर्षे software मध्ये नोकरी केली आहे. मला हे क्षेत्र बदलायचे नाही कारण मला माझे काम खुप आवडते.

जाई जुई, सीमा अतिशय स्तुत्य आणि स्पष्ट विचार, आवडलं!

जाई-जुई, सीम दोघांचेही पोस्ट आवडले.

बर्याच दिवसांनी मायबोलीवर आले.

सुरभी सारखीच माझी पण केस (!) आहे.. फक्त तपशिलात फरक..
ती ज्या मानसिक ताणातून गेली आहे/जाते आहे, ते सगळ सगळ मी पण अनुभवलय... अनेक वेळा मनाची समजून घातली, पुन्हा नोकरी कराविशी वाटली.... इथे मात्र सगळ्यांनी खूप छान सल्ले दिलेत आणि ते ही प्रेमानी... असो

मला एक विचारायच आहे.. ERP शिकल्याचा फायदा मला होईल का? मी सुध्दा finanace घेऊन MBA केलय आणि बँकेत काम करण्याचा अनुभव आहे पण जवळजवळ २ वर्ष ब्रेक झालाय, आता कुठे चान्स मिळत नाहीये.... तर erp शिकले तर फायदा होईल? नक्की काय शिकावे? ( प्रश्न चुकीच्या जागी विचारला आहे पण कुठे टाकायचा समजले नाही ) प्लीज मदत करा. ( माझा प्रश्न सोडवायला).

व्यवसाय मार्गदर्शनाच्या ग्रूपमधे तुमच्या प्रश्नाचं कदाचित जास्त चांगलं उत्तर मिळू शकेल.
http://www.maayboli.com/node/3171

ठिक आहे., तिथे नविन धागा सुरु करायचा का?

हो जरूर. तुमचा विषय तिथे अगोदर नसेल तर नवीन धागा सुरु करा.

माझि पन समस्या सारखिच.
सुरभि सारखिच.
पन मला एक वाटते. किती जनी well educated आहेत. घरी आहेत.
आज मुले लहान आहेत. त्याना आपली गरज आहे. हीच मुले मोठाई झाल्यावर आपली गरज वाटत नाहि.
पन तो पर्यन्त आपले वय निघुन जाते. मग मुले आपल्या विश्वात नवरा आपल्या.
मग उरते एक रिकामपन. काल पुढे निघुन गेलेला असतो.

त्या पेक्शा आहे त्या शिक्शना (education) मधुन आता पासुन job मिलाला तर.........
कोनि काहि तर कोनि काहि education आहे. मग दिवसा तले अमुक तास देता येतील, salary कमी असली तरी चालेल, पन touch राहिल.
कोनि असा उपाय का नाही काढत................

सगळयाच्या समस्या थोड्याफार फरकाने सारख्याच आहेत. सगळे अगदी मन मोकळेपणाने बोलताहेत हे पाहुन मलाही माझ्या मनातले लिहवेसे वाटले.
मी १९९९ साली BE(Mech) झाले. नन्तर मुम्बइतून c-dac केले पण नेहमीच नशीब आडवे आले..
२००१ सालच्या मन्दीमुळे पुण्यात एका फड्तूस कम्पनीत नौकरी स्वीकारली..पण तीत कहीच राम नव्हता.ंउसत्या बॉसच्या आणि त्याच्या बायकोच्या भान्डणाव्यतिरिक्त तिकडे काहिच नव्हते...माझी programming skills तर लाम्बच राहिले पण वेळेवर पैसेही मिळाले नहीत मला.
म्हणून मग मी सरळ आमच्या सोलापूर ला गेले.तिकडे predac ची tutor म्हणून ६ महिने काम केले.
२००३ मध्ये लग्न होऊन बडोद्याला गेले पण तिथेहि नशिब आडवे आले. कसाबसा ignou college मध्ये java ची faculty म्हणून job मिळाला..पण तोही ६ महिनेच करु शकले.
२००४ मध्ये मुम्बइत आले आणि ११/२ वर्ष नौकरी साठी प्रयत्न केले अगदी उद्या TCS चे appointment letter मिळणार की पुन्हा तेच्...काही कारणाने तेहि रहिले..
पण नेमकी त्याचवेळेस माझ्या नव-याचा H1 stamp झाला आणि मी पुन्हा H4 visaवर इथे येऊन बसले.
गेली ४ वर्ष मी फक्त चूल आणि मूल ह्यातच आहे. इथे बसून फक्त spanish चा primary course तोही online complete केला आणि आता tech writing चा online course करतेय पण म्हणावा तसा उत्साह वाटत नाही.शिवाय आता जानेवारीत आम्ही कायमचे पूण्याला जातोय्..एकीकडे आनन्दही आहे आणि भीतीही!!पुन्हा मला नौकरी मिळेल की नाही? का इथे अमेरिकेत निदान h4 वर आहे असा बहाणातरी होता..मला तर अगदी सगळ्या आप्तेष्टाचे टोमणे आत्ताच ऐकु येताहेत्..चला नौकरी नाहितर नाहि पण चान्गला नवरा मिळण्यासाठी का होइना तुझे शिक्षण उपयोगाला आले, किन्वा नौकरी नाहितर नाहि पण सुखी आहेस ना बाइ? इ.इ.
खरच मला मिळेल का नौकरी? किन्वा मी पुढे काय करावे?मला खरेतर भाषेत खूप रस आहे.पण नक्की काय करावे ते सुचत नहीये.

मला एकच कळत नाही, बायका सगळ्या गोष्टी एकाच वेळेला कशा करु शकतील? नोकरी, नवर्‍याच्या करियरशी जमवून घेणं आणि त्या अनुषंगाने स्वतःच्या करियरशी तडजोड करणं, मुलांना जन्म देऊन वाढवणं आणि घराकडे लक्ष देणं? मग यात कुठली एक गोष्ट जमली नाही - उदा. नोकरी.करियर तर लगेच अपराधी किंवा कमीपणा वाटून घ्यायची गरजच काय? पुरुष तरी इतक्या गोष्टी करु शकतात का कधी? ज्या वेळेला जी गोष्ट करायला जमते ती आनंदाने करावी ना, मग भले ते बालसंगोपन असो का नोकरी असो. आणि नातेवाईक/आप्त यांच्याकडे इतके लक्ष द्यायचे कारणच काय? स्वतःकडे द्यावे की लक्ष त्याच्याऐवजी. स्वतःला काय हवे ते पहिले बघावे.

मला एकच कळत नाही, बायका सगळ्या गोष्टी एकाच वेळेला कशा करु शकतील? नोकरी, नवर्‍याच्या करियरशी जमवून घेणं आणि त्या अनुषंगाने स्वतःच्या करियरशी तडजोड करणं, मुलांना जन्म देऊन वाढवणं आणि घराकडे लक्ष देणं? मग यात कुठली एक गोष्ट जमली नाही - उदा. नोकरी.करियर तर लगेच अपराधी किंवा कमीपणा वाटून घ्यायची गरजच काय? पुरुष तरी इतक्या गोष्टी करु शकतात का कधी?>>.

भाग्या अगदी हजार मोदक गं तुला! डिग्री मिळाल्यादिवसापासून नॉनस्टॉप नोकरीच करायला हवी असं कुठे आहे ?

मुलं लहान असताना नोकरी सोडून नंतर परत नोकरी किंवा व्यवसाय चालू करणार्‍या कितीतरी जणी आहेत. आठवड्यातून २-३ दिवस काम करणे), जॉब शेअरिंग करणे, कंसल्टिंग करणे, छोट्या मोठ्या शाळा कॉलेजांमधून , कोचिंग क्लासेसमधून शिकवणे असे कितीतरी पर्याय आहेत.

इथे माझ्या आईचे उदाहरण मला द्यावेसे वाटते. लग्नाआधीपासून मेडीकल क्षेत्रात काम करत होती. आम्ही झाल्यावर ती काही काळ पबलिक प्रॅक्टीस सोडून घरी राहून अभ्यास करून पुढील शिक्षणही घेतले. १०-१२ वर्षाचे झाल्याव्र पुन्हा प्रॅक्टीस सुरु केली. सुरुवातीला लहान असताना नुसती visiting म्हणून राहीली(ह्यात घरी वेळ देता येत होता, पुर्ण प्रॅक्टीस सोडायची गरज न्हवती) तेव्हाही बर्‍याच तिच्या मैत्रीणीने,नाक खुपसणारे नातेवाईक ,तुझे नुकसान करतेस, स्वताला update ठेवत नाहीस ह्या क्षेत्रात असे करून वगैरे एकवले. मग आम्ही इथे मूव झालो. इथेही आईने अ‍ॅडजस्ट केले. मला आठवते लहानपणी आई घरी असल्याने आम्हाला जो आनंद मिळायचा तो वेगळाच. सुरुवातीला मध्ये आई पुर्ण वेळ काम करायला लागली तेव्हा घरी आल्यावर आईला पहायची सवय होती म्हणून चिडचिड झाली आमची पण आम्ही काही अगदीच लहान न्हवतो. उलट खूप independent झालो त्यानंतर.
नातेवाईका/शेजारी/आईपप्पांचे मित्राविषयी काय बोलायचे, अगदी आम्ही इथे मूव होताना, रोज घरी येवून तिथे गेल्यावर तुमची मुले हाताबाहेरच जाणार, कुठल्या गोष्टी सांगत. मग आम्ही इथे आल्यावर लगेच,आमचेही जरा बघा. आमच्या ह्याला guide करा, हे नी ते.

लोकांना importance देवून कशाला त्रास करून घ्यायचा. ते आज दुसर्‍याला बोलतील्;उद्या तेच स्वत करतील. Happy

mswapna_13,

आपल्याला भाषांत रस असेल तर भाषा शिकण्यासाठी पुण्यात उत्तम सोयी आहेत.
रानडे इन्स्टिट्यूट, Alliance Francaise de Pune, Maxmuller Bhavan, Instituto Hispanica येथे आपण भाषा शिकू शकता. जपानी भाषेचे तर असंख्य वर्ग आहेत.
कोणत्याही भाषेत प्रावीण्य मिळवल्यावर अर्थार्जनाच्या संधीही खूप आहेत. आपण स्वत: भाषा शिकवू शकता (जपानी, फ्रेंचचे माझ्या माहितीतले काही शिक्षक ताशी २००-३०० रुपये आकारतात), कंपन्यांसाठी भाषांतरकार म्हणून काम करू शकता. मी काही मोठ्या कंपन्यांसाठी भाषांतराचं काम केलं आहे. फ्रेंच पत्रं, माहितीपत्रकं इंग्रजीत भाषांतर करून देण्यासाठी मला शब्दामागे एक रुपया मिळतो. शिवाय घरबसल्या हे काम करता येतं.
भाषेवर आपण उत्तम प्रभुत्व मिळवल्यास या क्षेत्रात खूप संधी आहेत.

चिनूक्ष याना अनुमोदन. इन्ग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यास आन्तर्जालावर कंटेन्ट लिहिणे असे काम मिळू शकते. भाषांतराचीही कामे असतात. व ते काम लॅपटॉप व नेट जोडणीयंत्राद्वारा कुठूनही करता येते. पोरान्चे आनन्दी चेहरे समोरच दिसतात. भाताचा कुकर लावून मग एक पान एडिट करता येते. स्वाभिमान, स्वातंत्र्य
व स्वावलंबन या तीन बाबींवर कधीही तड्जोड करायची नाही असे ठरवले की सारे निर्णय आपोआप घेतले जातात. कधी कधी नातेवाइकाना आपल्या आन्तरिक गरजा कळत नाहीत असा माझा अनुभव आहे. त्यामुळे
जे आपल्याला योग्य वाटेल ते जरूर करावे काम्/घर दोन्ही क्षेत्रे आपल्या सोयीने फिट करावीत.

फ्रेंच पत्रं, माहितीपत्रकं इंग्रजीत भाषांतर करून देण्यासाठी मला शब्दामागे एक रुपया मिळतो.>> अगदी अगदी चिनुक्ष. व त्याना ते युरो च्या हिशेबात स्वस्तच वाट्ते.

Pages