कविमती

Submitted by स्मितू on 21 April, 2012 - 04:10

आमचे प्रेरणा स्थान http://www.maayboli.com/node/32251
कविमती...

कविंचे आपले बरं असतं
सुचले शब्द की कविता करुन मोकळे होतात..

मग मी ही ठरवलं
आपण ही कविता करायची
दु:ख, वेदना, राग, संताप
सगळ्या सगळ्याचा रस एकाच कवितेत घुसडायचा!

पण एखादा चांगला कवि असतोच ना
तो नाही प्रतिसाद देत माझ्या कवितेवर
झुरत राहतो आपला निर्व्याज पणे

पण तरी एक दिवस तो प्रतिसाद देतोच!
पण मी मग त्याला चांगली कविता म्हणत नाही
त्याला म्हणतात कविमती!
मी ही त्या अश्याच बेकार कविपैकी एक!

विडंबनाचा पहिलाच प्रयत्न ..चु,भु दे.घे.

गुलमोहर: