पुन्हा भरेल का तो वर्ग ?

Submitted by Saee_Sathe on 11 April, 2012 - 01:28

पुन्हा भरेल का तो वर्ग ?
पुन्हा भरेल का ती शाळा ?
पुन्हा गाणे म्हणायला
आतूर असेल का माझा गळा ?

होतील का परत ती भांडणे ?
शाळेच्या कँटीन मधे
येईल का परत माझे नाव
पहिल्या नंबरामधे ?

असतील का ती चित्रे
तेव्हा रंगवलेली ?
कळेल का त्यातली चूक
नकळत झालेली ?

ओरडतील का परत टिचर ?
चिडवाचिडवी करताना
खेचेल का कुणी माझी वेणी
रस्त्यावरून जाताना ?

देईल का आता आई
नवी बॅग, नवा पेन ?
येईल का परत बनवता
पुठ्ठ्यांची ती छोटीशी ट्रेन ?

खोटं-नाटं कारण सांगून
दांडी मारायचे पहिले
पण आता तर कायमची सुट्टीच झालीये
कारण मुलं मोठी नाही, पण वर्ग लहान झालेत !

- मृण्मयी शैलेंद्र

(फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आमच्या शाळेच्या दहावीच्या बॅचचा सेंड-ऑफ झाला. त्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आम्ही, म्हणजे नववीच्या मुलांनी केले होते. त्या दिवशी त्या भावपुर्ण सोहळ्यामधे काही स्टुडंट्सनी त्यांना शाळेबद्दल काय वाटतं, शाळा सोडून जाताना त्यांच्या मनात काय भावना येतायत या बद्दल छोटी छोटी स्पिचेस दिली. ती ऐकताना माझ्या मनात आलेले विचार - कारण दहा महिन्यांनी हा प्रसंग आमच्या वर पण येणार आहे ना - मी काही ओळीत मांडायचा प्रयत्न केला. पण सुरवातीच्या तिन कडव्यांनंतर ती कविता अपूर्णावस्थेतच होती. आता सध्या परीक्षा संपल्यानंतर मी परत एकदा तो प्रसंग आठवून ही कविता पुर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.) Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वर सई साठे खाली मृण्मयी शैलेन्द्र हे नाव मी कन्फ्यूज्ड आहे .

बाय द वे ;
सईताई तू फक्त नववीत आहेस...........?
या लहानग्या वयात ( हो......माझ्यासाठी लहानगे वयच !) कवितेवर खूप छान कमान्ड प्राप्त केली आहेस बाळा!! अभिनन्दन !!
उज्ज्वल भवितव्यासाठी अनेकानेक शुभेच्छा!!

असो
आता दहावीच्या अभ्यासावरही अशीच कमान्ड मिळव...........

मला वाटतंय कि मृण्मयी सईची relative आहे.

खरोखरच मृण्मयी, तुझ्यासारखी पिल्ले पाहिली कि आमचाच ऊर अभिमानानी भरून येतो. Happy

तुला खूप साऱ्या शुभेच्छा ... कवितांसाठी आणि १० वी च्या अभ्यासासाठी सुद्धा !!

चित्रा :मला वाटतंय सई हे मृण्मयी चे घरातले /शाळेतले नाव असावे शैलेन्द्र हे तिच्या बाबान्चे नाव असावे !!!
असो !! जे असेल ते ....मला दोन्ही नावे आवडली फार गोड आहेत नै !

वैभवजी तुमचा अंदाज बरोबर आहे. सई ही आपल्या माबोवरील 'एकमेव टवाळ' उर्फ शैलेंद्र साठे यांची मुलगी आहे.
सईबाई, मोठी होतेयस हळु हळु... छान वाटलं , अभिनंदन Happy

योगुली, प्रिया, वैभवकाका, चित्रा ताई, वर्षामावशी आणि अबोव्ह ऑल विशाल काका !
सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद ! Happy

@ वैभवकाका / चित्रा ताई - सई हे माझं (खरंतर जन्मापुर्वीचंच) टोपणनाव आहे. मृण्मयी या नावाचा अपभ्रंश होऊ नये म्हणून त्यांनी ही दोन्ही नावं आधीच ठरवली होती. Happy

मृण्मयी: कविता सुंदर. अभिनंदन. दहावीसाठी शुभेच्छा.
दुस-या कडव्यात थोडी चूक वाटली. इतर कडव्यांत प्रत्येकी एकच किंवा सुसंबद्ध विचार आहेत. मात्र या कडव्यात 'शाळेतील भांडणे' व 'पहिला नंबर येणे' असे एकमेकांशी संबंध नसलेले दोन वेगवेगळे विषय दिसतात.
तसेच शेवटच्या कडव्यात यमकाची थोडी गडबड आहे. व वर्ग लहान होण्याचा मुद्दाही जुळत नाही. कारण दहावीची मुले वर्ग लहान होण्यामुळे नव्हे तर शाळेतील वर्ग दहावीनंतर संपल्यामुळे शाळेबाहेर गेली असावीत.