Submitted by पुरंदरे शशांक on 9 April, 2012 - 03:34
सरसर सर्सर झाडावर
सरसर सर्सर फांद्यांवर
तुर्तुर तुर्तुर पळते खार
शेपूट उडवत झुबकेदार
लुकलुकते काळे मणी
दिसते कशी गोजीरवाणी
पुढचे पाय उंचाऊन
हातात जणू खाऊ धरुन
खाते कशी कुरुम कुरुम
खार बघा जरा दुरुन
जवळ जाताच पळते लांब
खारुताई भित्री जाम
सेतूमधले काम जाणून
श्रीरामाने हात फिरवून
आशीर्वाद दिला भरभरून
मिरवते अजून पाठीवरुन .......
सरसर सर्सर झाडावर
सरसर सर्सर फांद्यांवर
तुर्तुर तुर्तुर पळते खार
शेपूट उडवत झुबकेदार
लुकलुकते काळे मणी
दिसते कशी गोजीरवाणी
पुढचे पाय उंचाऊन
हातात जणू खाऊ धरुन
खाते कशी कुरुम कुरुम
खार बघा जरा दुरुन
जवळ जाताच पळते लांब
खारुताई भित्री जाम
सेतूमधले काम जाणून
श्रीरामाने हात फिरवून
आशीर्वाद दिला भरभरून
मिरवते अजून पाठीवरुन .......
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सुंदर प्रचि आहेत.
सुंदर प्रचि आहेत.
शशांकजी किती सुरेख टिपल्यात
शशांकजी किती सुरेख टिपल्यात तिच्या सर्व मुद्रा. कुठे मिळाली एवढावेळ? खूप छान.
मला ही सध्या, नेहमी उंबराची फ़ळे खाताना दिसते.
मस्तच..
मस्तच..
मस्तच आहे.........माझ्या
मस्तच आहे.........माझ्या घरातल्या गॅलेरीत एक येते सारखी.....पण फोटो काढायला गेले की इतक्या वेगात लांब जाते..की कॅमेरात पकडता ही येत नाही...
माझी सगळ्यात आवडती पेट आहे ही
माझी सगळ्यात आवडती पेट आहे ही चिटुकली
एकदम मस्त!!!
एकदम मस्त!!!
व्वा. खुपच छान
व्वा. खुपच छान
शशांकजी मस्त आहे खारूताई !
शशांकजी मस्त आहे खारूताई !
प्रचि आणि शब्दांकन ....
प्रचि आणि शब्दांकन .... दोन्ही छान.
सुरेख भाव टिपलेत प्रचि आणि
सुरेख भाव टिपलेत
प्रचि आणि शब्दांकन .... दोन्ही छान.>>>+१
मस्त
मस्त
किती सुंदर आहेत फोटो. खारीचे
किती सुंदर आहेत फोटो.
खारीचे पुढचे नी मागचे पाय एकाच लांबीचे असतात ना?? मला खारीला बगितले की मिनिएचर कांगारु पाहिल्यासारखेच वाटते. इतर कोणीच प्राणि असे माग्च्या दोन पायांवर बसुन पुढच्या पायांचा हातासारखा वापर करत नसतील.
सुंदर.
सुंदर.
शशांक मस्त आहे खारूताई! कशी
शशांक मस्त आहे खारूताई! कशी काय पकडली कॅमेर्यात?
सर्वांनी खारुताईवर जे प्रेम
सर्वांनी खारुताईवर जे प्रेम व्यक्त केले त्याबद्दल खारुताईकडून - दोन कोलांटउड्या आणि एक चिर्र.......
खारूताई गोड आहे एकदम.
खारूताई गोड आहे एकदम.
मस्तच टिपल्या आहेत. कायम
मस्तच टिपल्या आहेत.
कायम घाईगडबड असते तिची. निवांतपणे फोटो काढू दिलेत म्हणजे नवलच.
मस्तच आहे.....
मस्तच आहे.....
मस्तच आहे खारुताई पण तिने हे
मस्तच आहे खारुताई पण तिने हे सगळे फोटो काढायला कसे दिले? हा प्रश्न पडलाय
कायम घाईगडबड असते तिची.
कायम घाईगडबड असते तिची. निवांतपणे फोटो काढू दिलेत म्हणजे नवलच.>>>>>
मस्तच आहे खारुताई पण तिने हे सगळे फोटो काढायला कसे दिले? हा प्रश्न पडलाय >>>>>>
नीट पाहिलंत तर लक्षात येईल की तिच्या पुढच्या पायात तिने काही तरी खाऊ धरलाय - मी इकडे तिकडे पहात नकळत तिच्या जवळ गेलो तर ती सुळकन पळाली - तो खाऊ टाकून एका झाडाच्या दिशेने - त्या झाडाच्या बुंध्यावर ती असताना मी तिचे दोन फोटो काढले व शांतपणे हालचाल न करता तिथेच उभा राहिलो - काही वेळाने त्या खाऊच्या आकर्षणाने ती परत पहिल्या जागेवर आली - मी फक्त कॅमेर्याने क्लिक करण्यापुरती अगदी मोजकी हातांची हालचाल करत होतो - त्या खाऊचे आकर्षणच जबरदस्त असणार की मी एवढा जवळ असतानाही ती खाऊ सोडू शकत नव्हती - तो खाऊ संपल्यावरच ती झाडावर पळून गेली......... योगायोगच हा दुसरे काय !!!
सर्वांचे मनापासून आभार........
सुंदर फोटो! कविताही छान
सुंदर फोटो!
कविताही छान
फारच मस्तं आहेत फोटो...
फारच मस्तं आहेत फोटो...
शशांक मस्त फोटो खारीचे फोटो
शशांक मस्त फोटो
खारीचे फोटो काढणं जरा कठीणच कारण सतत पळत असते
अप्रतिम snaps .!!!!
अप्रतिम snaps .!!!!