खारूताई....

Submitted by पुरंदरे शशांक on 9 April, 2012 - 03:34

सरसर सर्सर झाडावर
सरसर सर्सर फांद्यांवर

k13.jpgतुर्तुर तुर्तुर पळते खार
शेपूट उडवत झुबकेदार

k2.jpgk3.jpgलुकलुकते काळे मणी
दिसते कशी गोजीरवाणी

k11.jpgk12.jpgपुढचे पाय उंचाऊन
हातात जणू खाऊ धरुन
खाते कशी कुरुम कुरुम
खार बघा जरा दुरुन

k5.jpgk6.jpgk8.jpgk9.jpgk10.jpgजवळ जाताच पळते लांब
खारुताई भित्री जाम

सेतूमधले काम जाणून
श्रीरामाने हात फिरवून
आशीर्वाद दिला भरभरून
मिरवते अजून पाठीवरुन .......

k4.jpgसरसर सर्सर झाडावर
सरसर सर्सर फांद्यांवर

तुर्तुर तुर्तुर पळते खार
शेपूट उडवत झुबकेदार

लुकलुकते काळे मणी
दिसते कशी गोजीरवाणी

पुढचे पाय उंचाऊन
हातात जणू खाऊ धरुन
खाते कशी कुरुम कुरुम
खार बघा जरा दुरुन

जवळ जाताच पळते लांब
खारुताई भित्री जाम

सेतूमधले काम जाणून
श्रीरामाने हात फिरवून
आशीर्वाद दिला भरभरून
मिरवते अजून पाठीवरुन .......

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

शशांकजी किती सुरेख टिपल्यात तिच्या सर्व मुद्रा. कुठे मिळाली एवढावेळ? खूप छान. Happy
मला ही सध्या, नेहमी उंबराची फ़ळे खाताना दिसते. Happy

मस्तच आहे.........माझ्या घरातल्या गॅलेरीत एक येते सारखी.....पण फोटो काढायला गेले की इतक्या वेगात लांब जाते..की कॅमेरात पकडता ही येत नाही... Happy

किती सुंदर आहेत फोटो.

खारीचे पुढचे नी मागचे पाय एकाच लांबीचे असतात ना?? मला खारीला बगितले की मिनिएचर कांगारु पाहिल्यासारखेच वाटते. इतर कोणीच प्राणि असे माग्च्या दोन पायांवर बसुन पुढच्या पायांचा हातासारखा वापर करत नसतील.

सुंदर.

सर्वांनी खारुताईवर जे प्रेम व्यक्त केले त्याबद्दल खारुताईकडून - दोन कोलांटउड्या आणि एक चिर्र.......

कायम घाईगडबड असते तिची. निवांतपणे फोटो काढू दिलेत म्हणजे नवलच.>>>>>

मस्तच आहे खारुताई पण तिने हे सगळे फोटो काढायला कसे दिले? हा प्रश्न पडलाय >>>>>>

नीट पाहिलंत तर लक्षात येईल की तिच्या पुढच्या पायात तिने काही तरी खाऊ धरलाय - मी इकडे तिकडे पहात नकळत तिच्या जवळ गेलो तर ती सुळकन पळाली - तो खाऊ टाकून एका झाडाच्या दिशेने - त्या झाडाच्या बुंध्यावर ती असताना मी तिचे दोन फोटो काढले व शांतपणे हालचाल न करता तिथेच उभा राहिलो - काही वेळाने त्या खाऊच्या आकर्षणाने ती परत पहिल्या जागेवर आली - मी फक्त कॅमेर्‍याने क्लिक करण्यापुरती अगदी मोजकी हातांची हालचाल करत होतो - त्या खाऊचे आकर्षणच जबरदस्त असणार की मी एवढा जवळ असतानाही ती खाऊ सोडू शकत नव्हती - तो खाऊ संपल्यावरच ती झाडावर पळून गेली......... योगायोगच हा दुसरे काय !!!

सर्वांचे मनापासून आभार........