भीमरूपी महारुद्रा...

Submitted by आशुचँप on 6 April, 2012 - 09:33

मनोजवम् मारुततुल्यवेगम्, जितेन्द्रियम् बुदि्धमताम् वरिष्ठम् ।।
वातात्मजम् वानरयूथमुख्यम्, श्रीरामदूतम् शरणम् प्रपद्ये ।।
जय हनुमान...!!....जय श्रीराम......!!

समर्थ रामदासांनी शक्तीबरोबर बुद्धिचीही देवता म्हणून गौरवले असले तरी भूतप्रेतसमंधादी शक्तींना दूर ठेवण्यासाठीच जास्त करून मारूतीरायांची स्थापना होत असे. यामुळेच अनेक ठिकाणी गावाच्या वेशीपाशी हनुमानाचे मंदिर आढळून येते. किल्ले विशेषत तट, बुरुज येथे अनेकदा युद्धादी प्रसंग घडलेले. अनेकांनी तिथे प्राण गमावलेले. त्यामुळे अशा ठिकाणी, मूळ किल्ल्यापासून दूरवर पहारा करणार्या सैनिकांचे मनोधैर्य टिकून रहावे यासाठी हटकून मारूतीरायांची शिल्पे कोरलेली आढळतात. ही शक्तीची देवता शत्रुबरोबरच अमंगळापासून संरक्षण देत असल्याने या देवतेला आगळेच महत्व प्राप्त आहे. अर्थात, अशा अनघड ठिकाणी सुबक मंदिर वगैरे बांधणे शक्यच नसल्याने बरेचदा कातळात कोरलेल्या मूर्तीला शेंदूर फासून भीमरूपाची स्थापना करण्यात येत असे.
दुर्ग गणेश (http://www.maayboli.com/node/28677) दुर्गे दुर्घट भारी (http://www.maayboli.com/node/29506) आणि शिवदुर्ग (http://www.maayboli.com/node/32819) या मालिकेतील पुढचा भाग आजच्या हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर सादर करण्यात खूप समाधान वाटत आहे. नेहमीप्रमाणेच मायबोलीकर याचेही स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

पहिले मारूतीराय राजगडावरील...सुवेळा माचीकडे जाताना

तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी एका मंदिरात स्थापन झालेले मारुतीराय...गंमत म्हणजे यांना छानपैकी भरघोस मिश्या आहेत..असे मिश्या कोरलेले मारूतीराय पहिल्यांदाच पाहिले

कावनई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कपीलधारातीर्थ मंदिरातील भव्य मूर्ती

रामशेज किल्ल्यावर तर मारूतीराय असणारच असणार..दासहनुमान मुद्रेतील मारूतीराय

आंबोळगड किल्ल्याच्या सुरुवातीला

किल्ले देवगड

कर्नाळा किल्ला

यशवंतगड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे किती उशीर धागा टाकायला... Happy

ॐ पंचमुखी प्राणेश्वर श्री वीर हनुमंताय नम:

तिकोना... २०१० साली..

तिकोना... २००२ साली..

विसापूर... २०१० साली..

नाणेघाट.. २००५ साली..

_/\_

वसई किल्ल्यात समुद्र दरवाज्याजवळ चिमाजी आप्पा यांनी बांधलेले मारुतीचे सुंदर मंदिर आहे. त्याचा फोटो आहे का कोणाकडे? त्या मारुतीला सुद्धा सुंदर मिश्या कोरलेल्या आहेत.. Happy

सीता शोक विनाशचंद्रा, जय बल भीमा महारुद्रा|
राम, लक्ष्मण, जानकी, जय बोलो हनुमान की|
मारुतीराया बलभीमा, शरण आलो तुझिया पाया|

प्रबळगड माची

कनिफनाथ गड

सिंहगड

वासोटा

हरिहर

मस्त रे भटक्या आणि इंद्रा....

सही झब्बू देता राव तुम्ही लोक्स...

इंद्रा - सिंहगडावर कुठे आहे रे हा मारूती...मला काही लक्षात येईना झाले आहे...

बोल बजरंगा.. हुप्पा हैय्या.. Happy

कलावंतीण दुर्ग...

वासोटा (नविन)

मुल्हेरमाचीच्या टाकीत कोरलेले मारुतीराय.. (दिसताहेत का Happy )

मुल्हेरगडाच्या दरवाज्यापाशी असलेले मारुतीराय

तुंग किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी

ब्रम्हागिरी डोंगरावर चढताना सुरवातीलाच आशिर्वाद देणारे..

भिमरुपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती.........

उत्तम संकल्पना. वरचे फोटोहि उत्तम.

हा विसापुरचा हनुमंत.

From Visapur" alt="" />

हा लोहगडच्या दरवाज्यावरील रक्षक हनुमान

From lohagad" alt="" />

मस्त रे..
चँपा, ही गडकोटांवरील देवांचे फोटोची ही थीम मस्त रंगात यायला लागली आहे. Happy

मी शोधतो माझ्याकडे आहेत का...
सध्या गडबडीत आहे. पुढच्या आठवड्यात देतो.

आशुचँप खूप सुंदर आहेत फोटो...
रोहन्,इंद्रा,यो,झकासराव.. सर्वांनी शेअर केलेले फोटोज ही छानैत..

आहाच ...

मनोजवं मारुततुल्य वेगम ..........

घर बसल्या आज अनेक मारुतिच्या रुपान्च दर्शन झाल.
सर्वांचे आभार..

वर दिलेल्या आणि सध्या जगदीश्वर मंदिराच्या आत असलेल्या रायगडावरील मारुती मूर्तीचे गडावर मूळ स्थान कोठे होते कोणी सांगू शकेल का?

जय मारुती
वर्सोवा किल्ल्याशेजारील राम मंदिर

कोराईगड महाद्वारावरील मारुती

इथे नावात जरी महारुद्र असले तरी महाराष्ट्रात आपण साधारणपणे हनुमान किंवा मारुती असाच शब्द वापरतो. गोव्यात म्हापश्याला महारुद्र संस्थान असे देवालय आहे.
अगदी रस्त्यावरच आहे, बसमधून पण दिसते. तिथली मूर्ती धातूची असून खुपच सुंदर
आहे. देवालयही सुंदर आहे. (गोव्याला जाताना म्हापसा बस स्टॅंडच्या आधी जी गोलाकार बाग दिसते, तिच्या उजव्या बाजूला आहे.)

गोव्यात म्हापश्याला महारुद्र संस्थान असे देवालय आहे.
अगदी रस्त्यावरच आहे, बसमधून पण दिसते. तिथली मूर्ती धातूची असून खुपच सुंदर
आहे. देवालयही सुंदर आहे.
>>> ज्योती ताईना विनंती आहे की शक्य असल्यास त्यांनी ह्या मूर्तीचे दर्शन आम्हाला घडवावे...

Pages