'शिव' दुर्ग

Submitted by आशुचँप on 20 February, 2012 - 08:43

दुर्ग गणेश (http://www.maayboli.com/node/28677) आणि दुर्गे दुर्घट भारी (http://www.maayboli.com/node/29506) यानंतर त्याच मालिकेतील शिवदुर्ग हा पुढचा भाग सादर करण्यात फार समाधान वाटत आहे. शंकर हा खरा निसर्गातला देव. रानावनात, दर्याखोर्यात, जिथे निरव शांतता आणि घनदाट जंगल असेल अशा ठिकाणी विसावलेला. त्यामुळे दुर्गभटक्यांना अनेक अनघड ठिकाणी या रुद्राचे दर्शन घडत राहतेच.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने या शिवदुर्गांचे प्रचि सादर करत आहे. गेल्यावेळेप्रमाणेच मायबोलीकर त्यांच्याकडील प्रचि टाकतीलच याची खात्री आहे. केवळ प्रचि न टाकत त्या बरोबर काही वेगळी माहीती असेल तर ती सुद्धा टाकल्यास चांगले होईल.

ओम नमं शिवाय

हरिश्चंद्रगडावरील या शिवपिंडीचा फोटो टाकल्याशिवाय या मालिकेला सुरुवातच करता येणार नाही. माझ्या माहीतीनुसार गडावर असलेल्या शिवपिंडींपैकी आकाराने सर्वात मोठी पिंड हीच आहे. कंबरभर गारठणक पाण्यातून या पिंडीला प्रदक्षिणा घालणे हा एक मोठा अद्भुत अनुभव आहे. असे म्हणतात की या गुहेला पूर्वी चार खांब होते. प्रत्येक युगाचा एक असे. त्यापैकी तीन खांब पडून गेले आहेत. कलीयुगाचा खांब शिल्लक आहे. तो पडल्यावर जगप्रलय होणार आहे.

२. सुधागडावरील मंदिराचे प्रवेशद्वार..याच मंदिरात हिस्स प्रकरण घडल्याने तिथल्या पिंडीचा फोटो घेऊ शकलो नाहीये. कुणाकडे असेल त्याने कृपया शेअर करावा.

३. सरसगडावरील केदारेश्वराचे मंदिर

४. कावनई गडावरील उघड्यावर स्थापन केलेले शंभु महादेव

५. कावनई गावाजवळ कपीलधारातीर्थ म्हणून एक देवस्थान आहे. त्यातील एक छायाचित्र

६. कोल्हापूराजवळील गगनगडावरील शिवपिंड

७. कोल्हापूराजवळील रामलिंग आश्रम

८ .मधुमकरंदगडावरील शिवपिंडीजवळील तांब्याचे नाग

गुलमोहर: 

मस्त! हरिश्चंद्रगडावरची गुहा तर केवळ थरारक आहे! माझ्याकडचा एक खास फोटो. आमच्या गोव्यातल्या हरवळे इथे पुरातन मानवनिर्मित गुहा आहेत. विशेष म्हणजे तिथल्या ईश्वराची पिंडिका चौकोनी आहे.

PC250926-1.JPG

सहीच रे Happy

मल्हारगड उर्फ सोनोरी किल्ला येथील मंदिरे. एक खंडोबाचे आहे आणि एक शंकराचे.
आत जाउन फोटो नाही काढलेले. Sad

From Sonori fort and jejuri trip" alt="" />

हा शिव शंभु आपल्याला कडेपठारला जायच्या पायर्‍यांच्या सुरवातीलाच आशिर्वाद देतो.

From Sonori fort and jejuri trip" alt="" />

घोराडेश्वर येथील शिवलिंग.

From Ghoradeshvar" alt="" />

हा कन्हेरी मठाच्या जवळचा शिव शंभु.

From kanheri math" alt="" />

पुरंदरावरच्या मंदिरातील शिवलिन्ग..

From purandar" alt="" />

फोटो आणि माहीती दोन्ही सुंदर.

माझ्या माहेरी शिवमंदीर आहे. त्याची अख्याईका आहे. ती मी देवळाचे फोटो काढून नंतर लिहीते.

.

शिव ज्याचा तिसरा नेत्र वाईटाचा विनाश करतो
या भुतली शिवराय त्याच शिवाचा अवतार आहेत जे शत्रुंचा,अन्यायाचा नाश करतात, अशी समजुत होती याच मुळे शिवरायांना नवस केले जायचे याच्या खुणा आजही रायगडावर मिळतात,शिवसदनाच्या उंबरठ्यावर ठोकलेल्या नाण्याच्या खुणा आजही दिसतात.

कवी भुषणाने शिवपार्वतीचा संवाद या छंदात वर्णिलेला आहे.

प्रेतिनी पिसाच रु निसाचर निसाचरि हू, मिलि मिलि आपुसमे गावत बधाई है ।
भैरों भूत प्रेत भूरी भूधर भयंकर से, जुत्थ जुत्थ जोगिनी जमाती जुरि आई है ।
किलकि किलकि कै कुतूहल करति काली, डिमडिम डमरू दिगंबर बजाई हैं ।
सिवा पूंछै सिव सों "समाजु आजु कहा चली", काहू पै सिवा नरेस भ्रकुटी चढाई है ॥


भाषांतर :
प्रेते, पिशाच्चे, राक्षस, राक्षसी जमून आपापसात आनंदाने गात आहेत. पर्वताप्रमाणे धिप्पाड शरीरे धारण करणारे भैरव, तसेच भूते, प्रेते यांच्या झुंडीच्या झुंडी जमू लागलेल्या आहेत, कालीदेवता किल किल शब्द करून जमलेल्या समाजाचे कौतुक करीत आहे, आणि महादेव आनंदाने डमरू वाजवत आहे. हा शिवगणाचा आनंद पाहून पार्वतीने महादेवास विचारले, आज आपले गण खुष होऊन कुठे निघाले आहेत? "आज, शिवराज कोणा शत्रुवर कृद्ध झालेले आहेत." ( म्हणजे तेथे युद्ध होऊन शत्रुंच्या प्रेतांवर ताव मारण्यासाठी हे चाललेत.)

कुशावर्त महादेव रायगड

मानगड पायथा

छत्रपती शाहुमहाराज जन्मस्थळ

कोराईगड पायथा

कुर्डुगड पायथा

कनकेश्वर गडाच्या वाटेवरील..

- - -
श्रीकनकेश्वर

----
हरिश्चंद्रगड

----
कोहोजगड

-- - - -
गुप्तभीमाशंकर

- - -- - - -
हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेले एक प्राचीन शिवमंदीर

- - - --
गोरखगड

- - - - -
माहुली

-- - - -
माहुलीच्या पायथ्याशी असलेले महादेव मंदीर

--- ----
मुल्हेरवर जाताना वाटेत लागणार्‍या गणेशमंदीरातील..

- - - --
मुल्हेरगड- माची (मंदीरात भुयारात आहे )

- - - - - - -
याच मंदीराच्या बाहेर असलेली ही पिंड

- - - - - - -
तोरणा

- - - - - -

- - - - -
ब्रम्हागिरी डोंगरावरील जटामंदीर

- - - - - -
नागेश्वर

- - - - -
वासोटा (नविन)

- - --

चंदेरी

धन्यवाद चॅंप... सगळ्यांचेच प्रचि सुंदर आहेत.

महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी माहुली वरुन परतीचा प्रवास करायचा होता. पण काही कारणाने गडावरच रहावे लागले... आमच्या सोबत आलेल्या गुरू (वाटाड्या)ने सकाळी गडावरील पिंडीला जलाभिषेक केला.

गड उतरून खाली आल्यावर पायथ्याला महादेवाचे मंदिर आहे. तिथे शिवरात्री निमित्त उत्सव होता. देवळा समोरील विहिरीवर आंघोळ करून महादेवाचे दर्शन घेतले.

मदन गडा वरील पिंडी

त्रंबकेश्वर - हिवरे (सासवड)

हरिश्चंद्रगड

२६ जानेवारीच्या थंडीत पिंडीला प्रदक्षिणा घालणारे भाविक

सगळ्यांचेच खूप भारी फोटो...यो ने तर नुसता दणका केलाय...
मुल्हेर मंदिराच्या बाहेरची पिंड जबरदस्तच आहे...
इंद्रा - फारच खल्लास फोटो आणि माहीती

सर्वांचे खूप खूप धन्यवाद

आशु परत एकदा मस्तच मालीका....

माझ्याकडून काही ...

१. खिरेश्वर देवळाबाहेरील शिवपिंडी

२. किल्ले हरगड

३. किल्ले हरीहर

४. पांडवलेणी - नाशिक येथील शिवपिंडी

५. किल्ले शिवनेरी

६. कुकडेश्वर

७. नाणेघाट

७. किल्ले नांदगिरी

अजूनही काही अनगड जागी असलेल्या शिवमंदीराचे प्रची असतील..शोधावे लागतील आता..

सगळ्यांना खुप खुप धन्स...
घरबसल्या सगळीकडचे महादेवांचे दर्शन घडवल्याबद्द्ल...
खुपच भार्री भारी फोटो आहेत ...:) आवडले...:)

आशु, मस्तच रे Happy

माझ्याकडुन हा खारीचा वाटा Happy

दिनेशदा, माझ्याकडे भिमाशंकर मंदिरातील मुख्य गाभार्‍यातला फोटो नाही, पण बाहेर असलेल्या शिवलिंगाचा आणि नंदीचा फोटो आहे.

श्री जगदिश्वर (किल्ले रायगड )
गोरखगड
तिकोना
कर्नाळा किल्ला
खरंतर हे शिवलिंग नाही, पण जेंव्हा पहिल्यांदा मी भर पावसात कर्नाळ्याला गेलो आणि मुख्य सुळका पाहिला तेंव्हा मला शिवलिंगाचाच भास झाला. कुणाला हा सुळका थंब पॉईंट वाटला, तर कुणाला लिंगोबाचा डोंगुर, तर कुणाला एखाद्या स्थितप्रज्ञ साधूसारखा. मला मात्र याला पाहताच शिवलिंगाचाच भास झाला. त्यावरून वाहणारे पांढरे ढग/धुके म्हणजे शिवलिंगावरील दुधाच्या धारा!!!!! Happy

(इतर फोटो इथे असल्याने रीपीट करत नाहीए. Happy )

Pages