मायबोली पुस्तकखुणा (बूकमार्क)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

Bookmark 1.jpg

मायबोलीचा आणि मायबोलीकरांचा साहित्याशी बराच जुना संबंध आहे. तो अजून दृढ कसा करता येईल, या विचारात असताना पुस्तकखुणा (bookmarks) तयार करण्याचे सुचले.

या पुस्तकखुणांवर मायबोलीकर कवींच्या कविता असणंच उत्तम, असं वाटलं आणि मायबोलीकर कवींना याबद्दल विचारल्यावर त्यांनीही लगेच परवानगी दिली. त्यातून तयार झाला पुस्तकखुणांचा हा पहिला संच.

या उपक्रमात आपल्या कवितांचा समावेश करू दिल्याबद्दल पेशवा, मिल्या, नीधप, जयवी, श्यामली आणि बेफिकीर यांचे मनःपूर्वक आभार.

Bookmark 4.JPG

विषय: 
प्रकार: 

अरे वा! फार सुंदर.
नुसते बुकमार्क पण विकत घेता यायला हवेत.
माझ्या बुकमार्क संग्रहात अगदी हवेहवेसे आहेत हे.

पेशवा, मिल्या, नीधप, जयवी, श्यामली आणि बेफिकीर यांचे मनापासून अभिनंदन > अनुमोदन..
सुंदर कल्पना....

बूकमार्क बनवायची कल्पना अतिशय आवडली. सगळे बूकमार्क मस्त झालेत. कालच कार्टमध्ये काही पुस्तकं टाकून ठेवलीत, आता लगेच ऑर्डर करते Happy

सुंदर!!

छान दिसतायत बुकमार्क्स. Happy
(पण ते उलटे का वाटतायत मला? म्हणजे तो दोरा बुकमार्कच्या डोक्यावर नसतो का? की मी काही चुकीच्या पद्धतीने वापरते बुकमार्क्स?

सुंदर बूकमार्क्स! कल्पना फारच आवडली.

पण उलटे छापलेत असं वाटतंय. आपल्याच पाहण्या-वापरण्यातली गडबड की काय म्हणून नेटावर आणखी बूकमार्क्स धुंडाळले. जिथेकुठे अक्षरांमुळे उलटं-सुलटं बघावं लागणार तिथे ते असे आहेत.

असंच आता मायबोलीकरांनी घेतलेल्या फोटोंची कॅलेंडरं करता येतील का? मागच्या पानांवर द्यायला भरपूर पाककृती आहेत, लेख पण आहेत. राशीभविष्य सांगायला लिंबू आहे. Happy

मायबोलीवर पुस्तक खरेदी करताना शेवटच्या टप्प्यात "customer note" इथे तुमच्या सुचना नोंदवण्याची सोय आधीच आहे. त्या भागात तुम्ही तुमचा पसंतीक्रम (preference) लिहलात तर आम्ही आमच्या वतीने शक्यतोवर ते बुकमार्क द्यायचा प्रयत्न करू. एकापेक्षा जास्त सूचना लिहल्यात तर बरे होईल. हे बुकमार्क मुद्दाम संग्रही ठेवता यावेत (collector's edition) अशा अर्थाने केले आहेत आणि म्हणूनच मर्यादित आहेत. एकाच कवीचे तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बुकमार्क झाले तर पुढच्या गटगला दुसर्‍या कुणाबरोबर अदलाबदल करून पूर्ण सेट जमवता येईल.

त्यामुळे बुकमार्क संपायच्या आत पुस्तके घ्या Happy

उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल मायबोली प्रशासनाचे आभार. मस्तच झाले आहेत बुकमार्क्स.

एक प्रश्ण व सुचना आहे.

कस्टम बूक्मार्क करुन देण्यासाठी काही करता येइल का? म्हणजे डिझाईन हेच पण मजकुर माय्बोली युजरला हवा असलेला. व ह्या मुळे तयार झालेला बुकमार्क पीडीएफ स्वरुपात डाउनलोड करता येइल व घरी प्रींट करता येइल. हे विक्री सुभिधेशी सलग्न करता येइल. म्हणजे पुस्तक विकत घेतलेत तर कस्टम बुकमार्कची पिडीएफ करून ती इ-मेल वर पाठवता येइल. बर्‍याच लोकांकडे आजकाल फोटो पेपर व प्रिन्टर असतात त्यावर उत्तम प्रिंटाऊट घेऊन घरच्या घरी अवडीचे वा गइफ्ट साठिचे बुकमार्क सहज बनतील.

मस्त आहेत बूक मार्क. पेशवाची आयडिया पण चांगली आहे.
ग्रीटिंग कार्डस पण तयार करता येतील येथील काही मजकुर/फोटो वापरुन.

सही दिसताहेत बुकमार्क्स Happy
सहभागी केल्याबद्दल तहे दिल से शुक्रिया Happy
मायबोलीने आतापर्यंत खूप काही दिलंय. स्वतःची आयडेंटीटी सुद्धा सर्वप्रथम मायबोलीनेच दिली. कशाकशाबद्दल आभार मानायचे आपल्या मायबोलीचे....... !!
मायबोली चिरायु होवो Happy

सुंदर कल्पना आणि सगळ्या सहभागींचे मनापासून अभिनंदन..
आणखी एखादा भाचेकंपनीला पुस्तक बक्षीस देताना देता येईल अशा प्रकारच्या संदेशाचाही बुकमार्क बनवणार का?

बूकमार्क मस्त..

मृण्मयी ची कल्पना मस्त आहे.

भविष्य, मेन्यू, आरोग्यं, ज्ञानं, ऊपयुक्त साहित्य (? Uhoh ) प्रत्येक पानं, पंचाग वगैरे पण आहेच की माबो वर.. असं कॅलेंडर काढलं की प्रत्येक वर्षी माबो मेंब्रांच्या संख्येएवढी विक्रीतर निश्चितंच होणार आणि घरात लावल्यावर माबोची जाहिरात पण आपोआपच होईल.

Pages