"स्वरार्थरमणी" (किशोरीताई) ची उत्सुकता..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

स्वरार्थरमणी या संगीतविषयक ग्रंथाचे नुकतेच प्रकाशन झाले. किशोरीताई आमोणकरांन्नी लिहीलेला हा ग्रंथ मला वाटतं आधुनिक जगतात संगीत क्षेत्रातील ज्ञानेश्वरी इतका महत्वपूर्ण ठरेल यात शंका नाही. कधी एकदा वाचतो असं झालय..

पण अशा गानसम्राज्ञीवर दाजी पणशीकरांन्नी लिहीलेला चतुरंग पुरवणीतील हा छोटासा लेख जणू या ग्रंथाची प्रस्तावनाच वाटतो. एका महान कलाकाराने तितक्याच महान कलाकाराबद्दल इतक्या आत्मीयतेने अन सचोटीने केलेले भाष्य ऐकायला वा वाचायला मिळणे तसे दुर्मिळच झाले आहे.
http://www.loksatta.com/daily/20090405/lr05.htm

आपल्यापैकी कुणी संगीतप्रेमिन्नी हा ग्रंथ इतक्यात वाचला असेल, किमान त्यातील काही पाने, तर अभिप्राय कळवा.

विषय: 
प्रकार: 

योग,
या पुस्तकातील काही भाग आपल्याला 'अक्षरवार्ता' या सदरात पुढच्या आठवड्यात वाचायला मिळेल.